Breaking News

Mental Health : न्यूनगंड म्हणजे नक्की काय ?’अशी’ करा तुमच्यातील न्यूनगंडावर मात,नक्कीच वाढेल आत्मविश्वास…

236 0

Mental Health : आपण इतरांपेक्षा कमी आहोत,आपल्याला काहीच जमत नाही किंवा आपल्या मनात कमीपणाची भावना निर्माण होणं म्हणजे न्यूनगंड.आजच्या धावत्या युगात प्रत्येकाचं पाऊल हे जलद गतीने पडताना दिसत आहे.प्रत्येक गोष्ट ही कमी वेळात आणि अतिशय चोखपणे पार पाडायची क्षमता जवळ जवळ सर्वांमध्ये दिसून येते. पण काही लोकं असेही असतात ज्यांना आपण हे करू शकु की नाही यावर मनामध्ये प्रश्न असतात.

हे निर्माण झालेले प्रश्न नकारात्मक गोष्टींना प्राधान्य देतात आणि मग आपल्याया हे शक्य नाही या निष्कर्षापर्यंत अगोदरच पोचतात.ही भावना सतत मनात निर्माण होणं म्हणजेच न्यूनगंड असणे होय.न्युनगंड साधारणतः मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळुन येतो.आजकाल मुलांवर प्रत्येक क्षेत्रांत खुप व्याप आहे. मग तो खेळ असो किंवा डान्स,अभ्यास असो किंवा अजुन कोणत्या वेग-वेगळ्या स्पर्धा. यामध्ये काही मुलं खुप चांगली कामगिरी करतात. पण काही मुलांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते.बाहेर शाळेंमधून शिक्षकांच्या वेगळ्या अपेक्षा,तर घरी आईवडिलांच्या वेगळ्या अपेक्षा असतात. त्यामुळं काही मुलं ताण घेतात व त्यांचा असलेला आत्मविश्वाससुद्दा खचला जातो.परीणामी मुलं न्युनगंडची शिकार बनतात.
तसेच मोठ्या माणसांमध्येही न्युनगंड दिसुन येतो. बऱ्याच वेळेला नवीन काही काम चालु करायचं असेल तर लोकं काय म्हणतील असे प्रश्न निर्माण होतात. व त्यांच्या मनातही कमीपणाची भावना निर्माण होते.एका व्यक्तीची सतत दुसऱ्या व्यक्तीबरोबर होणारी तुलना आणि त्यातुन निर्माण होणारी अविश्वासाची भावना न्युनगंड निर्माण करते.

अशी करा न्युनगंडावर मात

१. न्युनगंडावर मात करायची असेल तर सर्वप्रथम मनातील भीती काढुन टाका

२. स्वतःतील ज्या उणिवा आहेत त्यावर काम काम करा.

३. तुम्ही केलेल्या प्रयत्नांना नेहमी यश येईलच असे नाही,पण यश मिळणारच नाही ही भावना मनातुन काढुन टाका.

४. स्वतःला इतरांच्या तुलनेत कमी लेखु नका.ज्याप्रमाणे हातांची सगळी बोटं सारखी नसतात,त्याप्रमाणं सगळी माणसं सुद्दा सारखी नसतात.आपले कौशल्य कशात आहे हे ओळखा आणि त्यावर काम करा.

५. तुमच्या मनात जे आहे ते बोलायला शिका, त्यामुळं आत्मविश्वास वाढेल.

या सर्व गोष्टी जर तुम्ही केल्या तर न्युनगंडावर नक्की मात करू शकता.हा लेख तुम्हाला कसा वाटलं हे आम्हाला सिमेंट करून नक्की कळवा.

Share This News

Related Post

Monkey Pox : घाबरू नका.., मंकी पॉक्सविषयी जाणून घ्या.., खबरदारी बाळगा..!

Posted by - July 25, 2022 0
पुणे : भारतात सर्वप्रथम केरळ राज्यात ‘मंकी पॉक्स’ आजाराचे रुग्ण आढळले आहेत. सर्वसाधारणपणे मंकी पॉक्स हा सौम्य स्वरूपाचा आजार असून…

तांब्याच्या भांड्यातील पाणी का प्यावे ? जाणून घ्या कारणे…

Posted by - April 15, 2022 0
धातूच्या भांड्यात खाणं-पिणं शरीरासाठी फायदेशीर असल्याचं प्राचीन काळापासून मानले जाते. त्यातही तांब्याचे भांडे अतिशय शुद्ध समजले जाते. अनेक घरांमध्ये लोक…

तुमच्यातल्या ‘या’ पाच सवयी तुम्हाला असफल होण्यास कारणीभूत ठरत आहे; आजच विचार करा !

Posted by - January 21, 2023 0
अनेक वेळा पण प्रचंड मेहनत करत असतो पण तरीही यश पदरी पडत नाही. हातातोंडाशी आलेला घास निघून जातो, मग आपण…

हृदयविकाराचा धोका स्त्रियांपेक्षा पुरुषांना का असतो ? जाणून घ्या कारणं

Posted by - July 6, 2022 0
आजची जीवन जगण्याची पद्धत ही पूर्वीपेक्षा खूप वेगळी आहे आणि त्यात शहरीभागातील तर अजुनच वेगळी आहे. आजच्या धावत्या युगात बहुतांश…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *