Ghee Roti

Ghee Benefits : चपातीवर तूप लावून खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

714 0

सध्याच्या जीवनात आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आज आपण चपातीवर तूप (Ghee Benefits) लावून खाण्याचे फायदे काय आहेत हे जाणून घेणार आहोत. चपातीवर तूप घालून खाण्याचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात. आपल्याला अनेक पदार्थांमधून जीवनसत्त्वं आणि पोषकतत्त्वं मिळतात. तुम्हाला माहितीये का की पोळीवर तूप खाऊन पोळी खाल्ल्यानंही तुम्हाला आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. चाल तर मग ते फायदे कोणते आहेत ते जाणून घेऊयात…

तूपात अनेक खनिजे आणि सॅच्युरेटेड फॅट्स असतात. आपल्या मज्जासंस्था, हाडं आणि मेंदू तंदूरूस्त होण्यासाठा मदत होते. त्यातून आपल्या मेंदूसाठी फार उपयुक्त आहे. त्यातून आपल्याला उर्जाही मिळते. यामुळे आपलं मेटाबॉयलिझम खूप चांगले राहते. सोबतच आपली पचनक्रियाही सुधारते. पोळ्यातील ग्लुटन आणि फायबरमुळे पचनक्रिया सुधारण्यात मदत होते. तुपात बटरिक अ‍ॅसिड असते. ज्यामुळे टी सेल्स मोठ्या प्रमाणात वाढतात. सोबतच रोगप्रतिकारशक्तीही वाढते. तुपात फॅटी अ‍ॅसिड असते. सोबतच फॅट सोलेबल व्हिटॅमिन्स असतात. यात A,D,E,K अशी जीवनसत्त्वे असतात.

चपातीवर तूप लावून खाण्याचे फायदे
मुख्य म्हणजे आपले वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. आपल्याला रोज तूप लावून पोळ्या जेवणात खाणं जमणार नसेल तर आपण आपल्या सोयीनुसारही तूपाचे सेवन करू शकतो. तूप हे बनवायलाही फार कष्ट पडतात. त्याचसोबत तूप हे महागही असते.
जास्त प्रमाणात तूपाचे सेवन करू नका. त्यातून जास्त प्रमाणात तूप खाल्लानं उलटे परिणामही होऊ शकतात.
तुम्ही पराठ्यावरही तूप घालू शकता.
आपल्या जेवणात म्हणजे भाजीत किंवा दुसऱ्या पदार्थात जास्त प्रमाणात तूप असेल तर पोळ्यांना मग कमी तूप लावा. आहारात अतिप्रमाण तूप खाऊ नका.

Share This News

Related Post

‘आरोग्य हीच संपत्ती आहे ‘ : त्यासाठी ‘ या ‘ ९ सवयी अवश्य लावून घ्या

Posted by - August 29, 2022 0
‘आरोग्य हीच संपत्ती आहे’, तरीही आपल्यापैकी बहुतेकजण ही वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतरही दैनंदिन आरोग्याच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करतात. आपल्यापैकी कोणालाही आपल्या शरीरासाठी…

आरोग्य विशेष :पावसाळ्यात लहान मुलांची अशी घ्या काळजी;पावसात खेळूनही पडणार नाहीत आजारी

Posted by - July 11, 2022 0
आरोग्य विशेष : पावसाळा म्हटलं की निसर्गाची तहान भागणार असते. उन्हाळ्यामुळे तापून निघालेली धरणी पावसाच्या आगमनाने शांत होते. सुरुवातीला कोसळणारा…

पोटाच्या तक्रारींवर रामबाण उपाय आले लिंबू पाचक

Posted by - April 8, 2023 0
छोट्या मोठ्या शारीरिक व्याधींवर उगाचच गोळ्या आणि टॅब्लेट्स घेऊन साइड इफेक्ट करून घेण्यापेक्षा आयुर्वेदाची औषधे घेणे नेहमी फायदेशीर ठरते. विशेषतः…
Salt

Salt : महिनाभर मीठ खाणं बंद केलं तर…; तर तुम्हाला जाणवू शकतो ‘हा’ त्रास

Posted by - August 11, 2023 0
आपल्या जीवनात मिठाला (Salt) अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या जेवणाच्या प्रत्येक पदार्थामध्ये मीठ असल्याशिवाय आपण ते खात नाही. इतकंच नव्हे तर…
Honeymoon

हनिमूनला अधिक रोमँटिक बनवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Posted by - June 9, 2023 0
सध्या सगळीकडे लग्नसराई सुरु आहे. या लग्नानंतर सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे हनीमून. पण अनेकवेळा हनिमूनला जायची तयारी उत्तम…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *