Weight Loss And Tea

Weight Loss : चहा प्यायल्यानं कमी होऊ शकतं वजन; काय म्हणतात तज्ञ?

353 0

सध्या धकाधकीच्या जीवनात लोकांना आपल्या आरोग्याकडे जास्त लक्ष देता येत नाही. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात आजार जडतात. त्यातलीच एक समस्या म्हणजे वाढते वजन (Weight Loss) . या समस्येमुळे अनेक लोक मोठ्या प्रमाणात परेशान (Weight Loss) असतात. अनेकजण यावर उपाय म्हणून खाण्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात. अनेकजण वजन कमी करण्यासाठी चहा पिणं सोडतात; पण तुम्हाला माहिती आहे का, चहाने तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता. होय चहामुळे तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता. कसे ते जाणून घेऊया….

चहामुळे वजन (Weight Loss) वाढतं, असं अनेकदा म्हटलं जातं. त्यामुळे जेव्हा वजन कमी करण्याचा विचार येतो, तेव्हा बरेचजण चहा पिणं बंद करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, तुम्ही चहानं वजन कमी करू शकता? खरं तर चहा हे कमी उष्मांक असलेलं पेय असल्यानं त्याच्या सेवनानं थेट वजन वाढत नाही. मात्र,चहामध्ये असणारे इतर घटक काहीवेळा वजन वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात.

‘या’ तीन कारणांमुळे वाढू शकते तुमचे वजन
पहिलं कारण म्हणजे चहामध्ये वापरलं जाणारं फूल क्रीम दूध. चहामध्ये फूल क्रीम दूध घातल्यानं त्यातील कॅलरीज वाढतात. दुधामध्ये फॅट असतं आणि ते जास्त प्रमाणात सेवन केल्यानं वजन वाढू शकतं.
दुसरं कारण म्हणजे चहामध्ये मिसळलेली साखर हे देखील वजन वाढण्याचं कारण आहे.
तिसरं कारण म्हणजे चहासोबत बिस्किटं किंवा स्नॅक्स घेतल्यामुळे वजन मोठ्या प्रमाणात वाढते.

वजन कमी करण्यासाठी प्रमाणात घ्या चहा
‘तुमच्या चहाचे सेवन दिवसातून दोन कपांपर्यंत मर्यादित ठेवा. जेणेकरून तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल आणि तुमचं वजन नियंत्रणात राहील.’

झोपण्यापूर्वी चहा पिऊ नका
झोपण्यापूर्वी चहा प्यायल्यास झोपेची पद्धत आणि पचन बिघडतं. वजन नियंत्रित करण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. कारण झोपेत तुमच्या शरीरातील हॉर्मोन्स चांगलं काम करतात, जे तुमच्या एकूण आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे. चांगल्या झोपेसाठी झोपण्यापूर्वी काही तास अगोदर चहा पिणं टाळा.

चहा आणि जेवणाच्या वेळेत अंतर ठेवा
जेवणाच्या आधी किंवा नंतर लगेच चहा प्यायल्यानं पचन आणि पोषकतत्त्वांचं शोषण होण्यास अडथळा निर्माण होतो. तुमचं वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना अनुकूल करण्यासाठी चहा पिणं आणि तुमचं जेवण यामध्ये किमान 30 मिनिटांचं अंतर ठेवा. या उपायांमुळे तुम्ही चहाचा आनंददेखील घेऊ शकता आणि तुमचे वजनदेखील नियंत्रणात ठेवू शकता.

Share This News

Related Post

Summer Health Tips

Summer Health Tips : उन्हाळ्यात शरीराला आहारापेक्षाही जास्त असते ‘या’ गोष्टींची गरज

Posted by - March 30, 2024 0
उन्हाळा सुरु झाला आहे. बऱ्याच जणांना उन्हाळ्यात वेगवेगळे त्रास होतात. जसं की उन्हाळी लागणे, फारच गरम होणे, फार घाम येणे,…

Fungal infection : पावसाळ्यात ‘त्या’ जागी होणारे इन्फेक्शन टाळण्यासाठी करा हे घरगुती उपाय

Posted by - September 7, 2022 0
पावसाळ्यात अनेक आजार पसरतात त्यापैकी एक म्हणजे अवघड जागेचे दुखणे अर्थात प्रायव्हेट पार्ट जवळ होणारे फ़ंगल इन्फेक्शन… सर्वप्रथम फ़ंगल इन्फेक्शन…

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी पीच फळाचे करा नियमित सेवन

Posted by - February 3, 2022 0
कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी जीवनसत्त्व आणि फळांचे तसेच भाज्यांचे सेवन करणे आवश्यक आहे. रोग…
Tadasana

Tadasana : ताडासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Posted by - March 11, 2024 0
ताडासन करताना शरीराची स्थिती ताडीच्या झाडाप्रमाणे ताठ होते त्यामुळे या आसनाच ताडासन असे नाव आहे. ताडासन करण्याची पद्धत ताडासन हे…

#CORONA UPDATES : राज्याचं टेन्शन वाढलं ! कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ

Posted by - March 13, 2023 0
देशभरात इन्फ्ल्यूएंझा वाढत असताना काही राज्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी रेटही वाढत असल्याने चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्राकडून राज्यांना सतर्कतेचे निर्देश…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *