Food and Drug Administration : आरोग्यास अपायकारक ‘ पफ वनस्पती ’चा साडेदहा लाख रुपयांचा साठा जप्त

292 0

पुणे : अन्न व औषध प्रशासन, पुणे कार्यालयातर्फे आरोग्यास अपायकारक ‘पफ वनस्पती’ विक्रेत्यांवर कारवाई करुन १० लाख ५८ हजार ३८० रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

मार्केट यार्ड पुणे येथे अचानक छापे टाकून घाऊक विक्रेत्यांकडून विश्लेषणासाठी घेण्यात आलेल्या वनस्पती हा अन्न पदार्थ आरोग्यास अपायकारक असल्याचा अहवाल प्राप्त होताच घाऊक विक्रेते व वितरकांकडील उर्वरित साठा जप्त करण्यात आला.

पफ वनस्पती (ग्रेड शेफ ब्रँड) या अन्न पदार्थाचे घाऊक विक्रेत्याकडे तपासणी करुन नमुना घेऊन उर्वरित ३ लाख ५२९ रुपये किंमतीचा १ हजार २८८ किलो साठा, तसेच वनस्पती पफ (सेंच्युरी ब्रँड) चा ४ जाख ३७ हजार ९६६ रुपये किंमतीचा २ हजार ५३ किलो साठा असा एकूण ७ लाख ३८ हजार ४९५ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

त्याच दिवशी सदर वनस्पतीच्या वितरकाकडे तपासणी केल्यानंतर पफ वनस्पती (ग्रेड शेफ ब्रँड) चा नमुना घेवुन उर्वरित ६६ हजार ९७६ रुपये किंमतीचा ४७८ किलो साठा तसेच पफ (सेंच्युरी ब्रँड)चा २ लाख ५२ हजार ९०९ रुपये किंमतीचा १ हजार ८७३ किलो साठा असा ३ लाख १९ हजार ८८५ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये सहायक आयुक्त (अन्न) बा. म. ठाकुर, ग. पां. कोकणे, अन्न सुरक्षा अधिकारी नि. बा. खोसे, अ. सु. गवते आदींनी भाग घेतली.

येणारे सण-उत्सवाचे दिवस लक्षात घेता प्रशासनातर्फे खाद्यतेल, वनस्पती, तूप, मिठाई, खवा, बेसन आदी अन्न पदार्थाच्या विक्रेत्यांवर लक्ष ठेऊन अयोग्य खाद्यपदार्थ आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे सह आयुक्त (अन्न) संजय नारागुडे यांनी कळविले आहे.

Share This News

Related Post

#PUNE : पोटनिवडणूक मतदानादिवशी अधिकारी, कामगारांना भरपगारी सुट्टी द्यावी; औद्योगिक आस्थापनांना उद्योग विभागाचे निर्देश

Posted by - February 16, 2023 0
पुणे : २१५-कसबा पेठ व २०५- चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीअंतर्गत रविवार २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे.…

PRASHANT JAGTAP : जगदीश मुळीकांची कर कपातीबाबत केलेली टीका म्हणजे तत्कालीन फडणवीस सरकारला घरचा आहेर …

Posted by - August 26, 2022 0
पुणे : पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी पुणेकरांची मिळकत कराची सवलत ही महाविकास आघाडी सरकारमुळे गेली,अश्या प्रकारचा खोटा…
Mira Road Murder Case

मीरा रोड हत्याकांडात मनोज सानेने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घेतला होता ‘या’ गोष्टीचा आधार

Posted by - June 10, 2023 0
ठाणे : श्रद्धा वालकरच्या हत्याकांडापेक्षाही भयंकर हत्याकांड हे मीरा रोडमध्ये (Mira Road Murder Case) घडलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र…

‘टिंगरेचे उपोषण म्हणजे एक नौटंकी’ आमदार सुनील टिंगरे यांच्या आंदोलनावर भाजपची प्रतिक्रिया

Posted by - April 6, 2023 0
आपल्या मतदारसंघावर प्रशासनाकडून अन्याय केला जात असल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाची…

भाजपा आमदार गिरीश महाजन यांची सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्याविरोधात पुणे पोलिसांत तक्रार

Posted by - March 23, 2022 0
भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस  ठाण्यात लेखी तक्रार    दाखल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *