Chickenpox New Variant

Chickenpox New Variant : भारतात आढळला कांजण्याचा नवा व्हेरिएंट

252 0

कांजण्या (Chickenpox New Variant) हा मुळातच संसर्गजन्य रोग आहे. आपल्यापैकी अनेकांना कांजण्या येऊन गेल्या आहेत. मात्र आता एक चिंताजनक बातमी नुकतीच शास्त्रज्ञांनी दिली आहे. शास्त्रज्ञांना भारतात कांजण्याचा एक नवीन व्हेरिएंट सापडला आहे. मंकीपाॅक्सच्या संशयित रूग्णांची तपासणी करत असताना कांजण्याच्या या नव्या व्हेरिएंटचा प्रकार आढळून आला आहे. कांजण्याच्या या प्रकाराला ‘क्लेड 9’ म्हटले जात आहे. व्हेरिसेला झोस्टर व्हायरसमुळे पसरणारा हा आजार भारतापूर्वी अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनीसारख्या देशांमध्ये पसरला आहे. हा व्हेरिएंट ज्यावेळी भारतात आढळून आला आहे, तेव्हापासून हेल्थ एक्सपर्टच्या माध्यमातून या आजाराच्या उपचारांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे. क्लेड 9 हा व्हायरस खोकल्यातून आणि शिंकण्यातून देखील होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया क्लेड 9 व्हायरसची लक्षणे…

क्लेड 9 ची लक्षणे काय आहेत?
क्लेड 9 व्हायरसची लक्षणे लगेच दिसून येत नाहीत. कोणत्याही रूग्णाच्या शरीरावर ही लक्षणे दिसण्याकरता दोन-तीन आठवडे लागतात. सुरूवातीस फक्त छातीवर आणि चेहऱ्यावर लहान लहान पुरळ येतात. यानंतर संपूर्ण शरीरावर पुरळ दिसू लागतात. लालसर पुरळ येऊन ते थोडेसे मोठे होतात आणि काही दिवसांमध्ये त्यात पाणी भरलं जातं. काही दिवसांनी ते फुटून, सुकून जातात. या पुरळांमुळे सगळ्या शरीरावर खाज सुटते. तसेच रूग्णाला ताप देखील येतो. सोबतच अंग आणि डोकेदुखी सुरू होते. अशक्तपणा जाणवायला लागतो आणि भूक देखील लागत नाही. दोन ते तीन आठवडे हा संसर्ग राहतो. या कालावधीत संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना कांजण्या होऊ शकतात. अशी लक्षण दिसल्यास तात्काळ डाॅक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

काय काळजी घ्याल ?
क्लेड 9 टाळण्याचा उत्तम पर्याय म्हणजे लसीकरण करणे. याशिवाय स्वच्छता राखणे गरजेचे आहे. जेवण करण्यापूर्वी किंवा अन्न तयार करण्यापूर्वी हात धुवा. खोकताना आणि शिंकताना तोंडाला हात लावा. शरीरात लक्षणे दिसू लागताच डॉक्टरांशी संपर्क साधा.

Share This News

Related Post

लतादीदींनी ज्या न्युमोनियाशी झुंज दिली तो वयोवृद्धांसाठी किती घातक आहे ? जाणून घ्या

Posted by - February 7, 2022 0
कोरोना काळात मोठ्या प्रमाणात लोकांना न्यूमोनियाचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी तर कोविडमधून बरे झालेले रुग्ण नंतर न्यूमोनियाचे बळी ठरल्याचीही…
Platelet Count

Platelet Count : शरीरात ‘ही’ लक्षणे दिसल्यावर समजून जा शरीरात प्लेटलेट्सची संख्या कमी झाली आहे

Posted by - August 15, 2023 0
फीट आणि फाईन राहणं प्रत्येकाला आवडतं. चांगलं आरोग्य राहण्यासाठी तुमच्या शरीरात प्लेटलेट्सची संख्या (Platelet Count) पूर्ण असणं गरजेचं आहे. जर…

तुम्हीही चहाप्रेमी आहात ? थांबा… ही माहिती अवश्य वाचा, अति चहा प्यायल्याने होणारे दुष्परिणाम !

Posted by - October 7, 2022 0
चहा म्हणजे भारतीय लोकांचे सर्वात आवडीचे पेय …. खूप कमी लोक असे आहेत ज्यांना चहा आवडत नाही किंवा चहा ऐवजी…

सब्जा पिण्याचे काय आहेत गुणकारी फायदे ? जाणून घ्या.

Posted by - May 22, 2022 0
तुळस भारतीय घरांतील पूजनीय झाड आहे. अनेक घरांमध्ये तुळशीचं रोपटं लावलेलं पाहायला मिळतं. तुळस अनेक आजारांवर औषधी म्हणून काम करते.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *