मुंबई – उद्या महाशिवरात्र असल्यामुळे उपवासाला साबुदाण्याची खिचडी, किंवा अन्य पदार्थांचे सेवन केले जाते. अनेकांना खिचडी किंवा साबुदाण्यापासून तयार पदार्थ खायला आवडतात. मात्र काही व्यक्तींसाठी साबुदाणा हा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतो. त्यामुळे अशा व्यक्तींनी साबुदाणा खाताना विचार करुन सेवन केले पाहिजे. कोण आहेत या व्यक्ती ? जाणून घ्या
साबुदाण्यात असे अनेक घटक असतात जे काही वेळा आपल्या शरीराला नुकसान पोहचवू शकतात. त्यामुळे साबुदाणा वगळून सुकामेवा, भगर, फळे, राजगिरा, खजूर अशा पदार्थांचे सेवन करणे योग्य ठरत असते.
1) लठ्ठ व्यक्तींनी साबुदाणा टाळावा
ज्यांना लठ्ठपणाची समस्या असेल, त्यांनी आपल्या आहारातून साबुदाणा वगळणे योग्य ठरते. साबुदाणामध्ये भरपूर प्रमाणात चरबी आणि प्रथिने असतात. साबुदाणा खाल्ल्याने शरीरातील कॅलरीज् मोठ्या प्रमाणात वाढत असतात. त्यामुळे ज्या लोकांना लठ्ठपणाची समस्या आहे, ज्यांना आपले वजन कमी करायचे आहे. अशा लोकांना साबुदाणा व त्यापासून तयार होत असलेल्या पदार्थांचे सेवन करणे टाळले पाहिजे.
2) मधुमेही
ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी साबुदाणा अजिबात खाऊ नये, साबुदाणाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी अजून वाढू लागते. तज्ज्ञांच्या मते, साबुदाणामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स नसतो आणि जर त्याचे दररोज सेवन केले तर शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते.
3) मुतखडा
ज्या लोकांना आधीपासूनच मुतखड्याचा त्रास आहे, त्या लोकांनी साबुदाण्याचे सेवन करणे टाळले पाहिजे. तज्ज्ञांच्या मते साबुदाण्यामुळे ही समस्या आणखी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे साबुदाणा आपल्या आहारातून वगळणे योग्य.
4) मेंदूवर दुष्परिणाम
साबुदाणामध्ये सायनाईडचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले असले तरी त्याचे अतिसेवन केल्यास दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे याचा मेंदुवर वाईट परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, परिस्थिती आणखी बिघडली तर व्यक्ती कोमात देखील जाउ शकतो.
5) हृदयरोगी
साबुदाणामध्ये अतिरिक्त चरबी असल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते ज्यांना आधिच ह्रदयाशी संबंधित आजार आहे, अशा लोकांनी साबुदाणा खाल्ल्यास त्याना त्याचा दुष्परिणाम भोगावा लागू शकतो. त्यामुळे अशा वेळी ह्रदयाचा झटका येण्याचा प्रकारही वाढू शकतो.
6) छातीत जळजळ
ज्या लोकांना छातीत जळजळ होण्याचा त्रास आहे, अशा लोकांनी साबुदाणा खाण्यापासून लांब रहावे, कारण यामुळे त्यांची समस्या अधिकच वाढू शकते.
7) पोटाचे आजार
पचनासंबंधित आजार, किंवा वारंवार पोट खराब होण्याची तक्रार असलेल्यांनीही साबूदाणा न खाल्लेला बरा असतो. कारण साबुदाणा पचायला जड समजला होतो. त्यामुळे पोटाचे आजार असलेल्या लोकांनी त्याचे सेवन टाळले पाहिजे.