Momos Side Effect

Momos Side Effect : स्ट्रीट फुड म्हणून आवडीने मोमोज खाताय?; होऊ शकतात ‘हे’ आजार

468 0

स्ट्रीट फुड म्हणून मोमोज (Momos Side Effect) आता अल्पावधीतच लोकप्रिय झालं आहे. हिमालयाची फेमस डिश असलेल्या मोमोजचे (Momos Side Effect) स्टॉल आता मुंबईतील गल्लीगल्लीत सुरू झाले आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेल्या मोमोज अनेकांचे फेव्हरेट फुड झाले आहे. त्यात स्ट्रीट फुड म्हटले की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. पण हेच स्ट्रीट फुड खाणे तुम्हाला महागात पडू शकते. अतिप्रमाणात किंवा रोज रोज मोमोज खाणे शरीरासाठी हानिकारक ठरु शकतात.मोमोज खाल्ल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. मोमो अतिप्रमाणात खाण्याचे शरीरावर काय दुष्परिणाम होतात चला पाहूया…

मोमोज हे अ‍ॅल्युमिनियम स्टीमर्समध्ये शिजवले जातात आणि अ‍ॅल्युमिनियम हे शरीरासाठी हानिकारक असतात. तसंच, मोमोज मैद्यापासून बनवले जातात. मैदा हा आल्मयुक्त असतो. हे पीठ शरीरात जाऊन हाडांचे कॅल्शियम शोषून घेते. तसंच, मैदा नीट पचतही नाही. तसंच, मैदा खाल्ल्याने अ‍ॅसिटिडी, ब्लॉटिंग, बद्धकोष्टता असे आजार मागे लागू शकतात.

बाजारात बनवलेले मोमोज हे पांढरे असतात तर घरी बनवलेले मोमोज हे थोडेसे पिवळसर दिसतात. बाहेर बनवल्या जाणाऱ्या मोमोजमध्ये ब्लीच, क्लोरीन वायू, बेंझॉइल पेरोक्साइड, अझो कार्बामाइड युक्त असतात. त्यामुळं ते पांढरे आणि मऊ दिसतात. या रसायनांमुळे किडनी आणि स्वादुपिंडाचे नुकसान होते आणि मधुमेहाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

मोमोजसोबत दिली जाणारी लाल चटणीही आवडीने खाल्ली जाते. तिखट अशी ही चटणीदेखील शरीरासाठी हानिकारक असते. कारण या चटणीची गुणवत्ता कमी असते. ज्यामुळं मूळव्याध, जठराची सूज, पोट आणि आतड्यांमध्ये रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो.

काही मोमोज विक्रेते मोमोसमध्ये मोनोसोडियम ग्लूटामेट (MSG) आणि अजिनोमोटो नावाच्या रसायनाचा वापर करतात. यामुळे त्याची चव वाढते आणि ते सुगंधी बनते. या एमएसजीमुळे लठ्ठपणा वाढतो. मेंदू आणि मज्जातंतूंच्या समस्या, छातीत दुखणे, हृदय गती वाढणे, बीपी अशा तक्रारी निर्माण होतात. रोजच्या रोज मोमोजचे सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला काही ना काही शारीरिक समस्या उद्भवू शकतात.

Share This News

Related Post

उन्हाळ्यात पाळीव प्राण्यांची काळजी कशा प्रकारे घ्यावी

Posted by - March 21, 2022 0
* पाळीव प्राण्यांना पिण्यासाठी भरपूर थंड आणि ताजे पाणी द्यावे * पक्षांना थंड शांत ठिकाणी ठेवावे जिथे त्यांचे निरीक्षण करणे…

रुबी हॉल क्लिनिकमध्ये किडनी रॅकेट चौकशीसाठी समिती स्थापन; आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांची विधानसभेत माहिती 

Posted by - March 17, 2023 0
पुणे: रुबी हॉल क्लिनिक मध्ये किडनी रॅकेटची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली शासकीय आणि अशासकीय सदस्यांची समिती नेमून…

सन पॉयझनिंग म्हणजे काय ? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

Posted by - April 1, 2023 0
सध्या विचित्र हवामान पसरले आहे सकाळी आणि संध्याकाळी थंडावा असतो तर दुपारच्या उन्हाने जिवाजी तगमग होते. दुपारच्या कडक उन्हात फिरल्यामुळे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *