Belly Fat

Belly Fat : व्यायाम आणि डाएटशिवाय पोटावरची चरबी ‘या’ प्रकारे करा कमी

820 0

वजन कमी किंवा अतिरिक्त चरबी (Belly Fat) कमी करण्यासाठी बाजारात भरपूर प्रकारचे औषधे किंवा साहित्य उपलब्ध आहेत पण ह्या सर्व गोष्टींचा शरीरावर (Belly Fat) वाईट परिणाम होऊ शकतात. आज आपण व्यायाम आणि डाएटशिवाय पोटावरची चरबी कशी कमी करावी याबद्दल जाणून घेणार आहोत.

1] चांगली आणि गाढ झोप
आधुनिक काळात अनेकांना निद्रानाशाच्या तक्रारीचा सामना करावा लागत आहे. अशावेळी शरीराचे वजन झपाट्याने वाढत आहे. जर तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर दररोज चांगली आणि गाढ झोप घ्या. चांगल्या आणि गाढ झोपेने शरीराचे वाढते वजन झपाट्याने कमी करता येते. रोज किमान 7 ते 8 तासांची झोप घ्या. त्यामुळे तणाव आणि लठ्ठपणा नियंत्रणात येऊ शकतो.

2] झोपायच्या 3 तास आधी खा
जेवल्यानंतर थेट झोपी जात असाल तर वजन खूप वेगाने वाढू शकते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर झोपण्याच्या दोन ते तीन तास आधी अन्न खा. यानंतर थोडा वेळ शतपावली करा. यामुळे लठ्ठपणावर नियंत्रण येईल. यासोबतच तुमचे शरीरही फिट राहील.

3] पाणी पिणे
वजन कमी करण्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे आहे. यासाठी दर तासाला पाणी प्यावे. यासोबतच जेवण करण्यापूर्वी आणि त्यानंतर थोड्या वेळाने पाणी प्यावे. यामुळे तुमच्या शरीराचे वजन नियंत्रणात राहील. तसेच, मेटाबॉलिझमला चालना मिळते, ज्यामुळे कॅलरी जलद बर्न होण्यास मदत होते.

4] भुकेपेक्षा कमी खा
आपल्यापैकी बरेच जण भूक लागल्यावर एकाच वेळी खूप खातात, त्यामुळे शरीराचे वजन वाढते. तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर भूकेपेक्षा कमी खाण्याची सवय ठेवा. म्हणजेच 4 चपात्यांची भूक लागली असेल तर फक्त 3 चपात्या खा. कोशिंबीर, भाज्या, डाळी यांचाही आहारात समावेश करा.

5] दिवसाच्या आहाराचे प्लानिंग
एकाच वेळी खूप खायचं आणि नंतर उपाशी राहायचं असं करु नका. असे केल्यास तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. दिवसभरात तुमचा आहार 6 भागांमध्ये विभागण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचे वजन संतुलित राहील आणि भूकदेखील नियंत्रणात राहील.

6] शरीराची हालचाल करा
शरीर अ‍ॅक्टीव्ह ठेवा. याचा अर्थ तासनतास व्यायाम करा, असा होत नाही. एका जागी बराच वेळ स्थिर बसण्याऐवजी वेळोवेळी उठून हलका व्यायाम करा. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.

Share This News

Related Post

तुम्हीही चहाप्रेमी आहात ? थांबा… ही माहिती अवश्य वाचा, अति चहा प्यायल्याने होणारे दुष्परिणाम !

Posted by - October 7, 2022 0
चहा म्हणजे भारतीय लोकांचे सर्वात आवडीचे पेय …. खूप कमी लोक असे आहेत ज्यांना चहा आवडत नाही किंवा चहा ऐवजी…

लतादीदींनी ज्या न्युमोनियाशी झुंज दिली तो वयोवृद्धांसाठी किती घातक आहे ? जाणून घ्या

Posted by - February 7, 2022 0
कोरोना काळात मोठ्या प्रमाणात लोकांना न्यूमोनियाचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी तर कोविडमधून बरे झालेले रुग्ण नंतर न्यूमोनियाचे बळी ठरल्याचीही…

तुमच्या आरोग्यासाठी सुक्या खोबऱ्याचे फायदे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल

Posted by - May 17, 2022 0
तुमच्या घरात नेहमी सुके खोबरे असते. मात्र, तुम्हाला या सुक्या खोबऱ्याचे फायदे किती आहेत, हे बऱ्यादा माहीत नसते. सुके खोबरे…

लम्पी आजाराने पशुंना ग्रासले : लम्पी आजारापासून पशुधन वाचविण्यासाठी यंत्रणेने तातडीने पाऊले उचलावीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - September 12, 2022 0
मुंबई : पशुधन ही आपली संपत्ती त्याची जपणूक करणे आवश्यक असून सध्या राज्यात लम्पी आजाराने पशुंना ग्रासले आहे. या आजारावर…

रिकाम्या पोटी डाळिंब खाणे फायदेशीर ! जाणून घ्या कारणे

Posted by - April 1, 2023 0
आरोग्याच्या बाबतीत आता प्रत्येकजण खूप काळजी घेताना दिसतो. आरोग्यासाठी फळे खाणे चांगले असते. असे डॉक्टर सांगतात. म्हणून बरेच लोक फळे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *