Salabhasana-Yoga

Back Pain : सतत पाठदुखीचा त्रास जाणवतोय? तर घरीच सुरु करा ‘हे’ योगासन; लगेच मिळेल आराम

439 0

धकाधकीच्या जीवनामुळे आणि सततच्या कामामुळे अनेकांना पाठदुखीचा (Back Pain) त्रास जडतो. अनेक उपाय केल्यानंतरही काही परिणाम दिसून येत नाही किंवा तात्पुरता आराम मिळतो. पण योगासनं यावर चांगला उपाय ठरु शकतात. तर योगासनांमधील असंच एक आसन जे पाठदुखीवर उपाय ठरतं आणि ते म्हणजे “शलभासन”.

शलभासनाचे फायदे
शलभासन तुमच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी अनेक फायदे प्रदान करतं.
शलभासन केल्यामुळे पाठीच्या स्नायूंची ताकद वाढते, पाठदुखी दूर होते.
या आसनामुळे हाडं मजबूत होतात.
शलभासन केल्यामुळे पचन सुधारते, ओटीपोटात दाब पडल्याने पचन चांगलं होतं आणि बद्धकोष्ठता दूर होते.
ज्यांना चिंता किंवा नैराश्याचा सामना करावा लागतो, त्यांच्यासाठी शलभासन हे एक उत्तम आसन आहे. कारण ते छाती आणि उदर हळूवारपणे ताणतं, ज्यामुळे तणाव आणि चिंता दूर होते.

शलभासन नेमकं कसं करायचं?
प्रथम तुम्ही सामान्यपणे जसं पोटोवर झोपता, त्याच पद्धतीने झोपा.
तुमचे हात तुमच्या समोर पसरवा.
तुमचे पाय तुमच्या मागे सरळ ठेवा आणि त्यांना एकत्र ठेवा.
आता दीर्घ श्वास घ्या आणि त्याच वेळी तुमचे हात, छाती आणि पाय जमिनीपासून वर उचला.
नजर समोर ठेवून काही सेकंदांसाठी तीच स्थिती धरा.
आता एक श्वास घेऊन तुमचे हात, पाय आणि छाती परत जमिनीवर आणून होते त्या स्थिती सोडा.
हीच प्रक्रिया काही काळासाठी वारंवार करा.
आपले हात, पाय आणि छाती जमिनीवर परत आणताना आणि पोझ सोडताना श्वास सोडा.
हात, पाय आणि छाती वर करताना मोठा श्वास घ्या.
तुमची मान दुखू नये म्हणून, तुमची नजर पुढे ठेवा.

(टीप : वरील सर्व माहिती टॉप न्यूज मराठी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.याबाबत टॉप न्यूज मराठी कोणताही दावा करत नाही.)

Share This News

Related Post

Health Tips

Health Tips : पायाला मुंग्या आल्या तर चुकूनही करू नका दुर्लक्ष; नाहीतर उद्भवू शकतात ‘हे’ गंभीर आजार

Posted by - September 20, 2023 0
अनेकदा आपल्याला एका जागेवर बसून पायात मुंग्या येतात. दीर्घकाळ एकाच स्थितीत बसल्यानंतर ही समस्या (Health Tips) जाणवू लागते. मात्र तुम्हाला…
Phalakasana

Phalakasana : फलकासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Posted by - March 26, 2024 0
फलकासनाला (Phalakasana) इंग्रजीमध्ये प्लॅंक पोज असेही म्हणले जाते.हे आसन आडव्या पोझिशनमध्ये येऊन केले जाणारे प्राथमिक पातळीवरचे सोपे योगासन आहे. फलकासन…

उन्हाळ्यात पाळीव प्राण्यांची काळजी कशा प्रकारे घ्यावी

Posted by - March 21, 2022 0
* पाळीव प्राण्यांना पिण्यासाठी भरपूर थंड आणि ताजे पाणी द्यावे * पक्षांना थंड शांत ठिकाणी ठेवावे जिथे त्यांचे निरीक्षण करणे…
Sayaji Shinde

Sayaji Shinde : हृदयात ब्लॉकेज, सर्जरी होताच सयाजी शिंदेंनी पोस्ट केला चाहत्यांसाठी व्हिडिओ

Posted by - April 12, 2024 0
मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती समोर येत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *