HEALTH TIPS : प्रेग्नेंसीमध्ये गुळ-पापडीचे लाडू आहेत वरदान ; हिमोग्लोबिनची राहणार नाही कमतरता ( Recipe )

189 0

HEALTH TIPS : प्रेग्नेंसीमध्ये अनेक महिला शरीरातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेची अनेक वेळा तक्रार करतात. त्यामुळे चक्कर येणे, थकवा जाणवणे अशा गोष्टी होत राहतात . बाळंतपणाची तारीख जसजशी जवळ येत जाते ,तसतसे पोटातील बाळाला देखील रक्तातून अनेक पोषक द्रव्य अधिकाधिक पोहोचवणं खूप गरजेचं असतं. अशावेळी गुळपापडीचे लाडू गरोदर मातांसाठी वरदान आहेत .

तुपाच्या रेसिपीस - 9 रेसिपीस - Cookpad

हे बनवण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे तुपाची बेरी , तर आता तुपाची बेरी ही तूप कढवताना मागे राहते तेव्हाच हे लाडू बनवाल तर जास्त उपयुक्त ठरतील . तूप कढवून घेतल्यानंतर मागे राहणाऱ्या बेरीमध्ये गव्हाची कणीक गुलाबी होईपर्यंत भाजून घ्या . हे सर्व मिश्रण थंड होण्यासाठी एका परातीमध्ये काढून घ्या. त्यानंतर तुपावर ओला काळा खजूर हलके काप करून भाजून घ्या. खजूर मऊ पडल्यानंतर तो मिक्सरमध्ये घाला . त्यानंतर काजू ,बदाम ,पिस्ता अक्रोड हे ड्रायफ्रूट्स घालून हे सर्व मिश्रण बारीक करून घ्या.

ओबडधोबड बारीक केले तरीही चालेल हे सर्व मिश्रण लाडूच्या मिश्रणामध्ये एकत्र करा. यानंतर गुळाची पावडर किंवा किसलेला गूळ यामध्ये घाला . हे सर्व मिश्रण एकजीव करताना दुधाचा शिपका मारून लाडू वळून घ्या . हे लाडू रोज सकाळी आणि संध्याकाळी खाल्ल्याने अगदी आठवड्याभरामध्ये रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास सुरुवात होते . लहान मुले ,वृद्ध व्यक्ती आणि आजारी व्यक्तींसाठी देखील हे लाडू खूप फलदायी आहेत.

Share This News

Related Post

World Kidney Day : मूत्रपिंड निकामी का होते? हा गंभीर आजार कसा टाळावा ? वाचा सविस्तर माहिती

Posted by - March 6, 2023 0
शरीरातील प्रत्येक अवयव चांगले काम करेल तरच आरोग्य चांगले राहील आणि जीवन सुखी होईल. रक्त स्वच्छ करण्यात आणि शरीरातील कचरा…
Weight Loss

Weight loss : ‘हेल्दी अँड फिट’ बॉडी मिळवण्यासाठी ‘ही’ योगासने नक्की ट्राय करा

Posted by - July 9, 2023 0
योग्य आहार आणि योगासन करून तुम्ही वजन कमी (Weight loss) करू शकता. योगासनामुळे तुम्ही शारीरिक व मानसिक दृष्ट्या निरोगी राहू…
Milk

दारूपेक्षा ‘या’ दुधात सर्वाधिक नशा; दोन घोट पिताच लागाल झिंगायला

Posted by - June 1, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपण दुधाकडे संपूर्ण आहार म्हणून पाहिलं जातं. दुधामध्ये शरीरालाआवश्यक सर्व पोषकतत्व जसे की प्रोटीन, अमीनो…

मुलं चिडचिड होत आहेत… मोबाईल हातातून सुटत नाही ? या समस्या तुम्हाला जाणवत असतील, तर हि माहिती अवश्य वाचा…

Posted by - July 28, 2022 0
आजकालच्या पालकांना मुलांचा चिडचिडेपणा, अभ्यास न करणे, मोबाईल-लॅपटॉप घेऊन बसणे, मैदानी खेळ खेळण्यास नकार देणे आणि जंक फूड खाणे अशा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *