Salt

Salt : महिनाभर मीठ खाणं बंद केलं तर…; तर तुम्हाला जाणवू शकतो ‘हा’ त्रास

471 0

आपल्या जीवनात मिठाला (Salt) अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या जेवणाच्या प्रत्येक पदार्थामध्ये मीठ असल्याशिवाय आपण ते खात नाही. इतकंच नव्हे तर काही पदार्थ मीठाशिवाय बेचव लागतात. मिठाचे (Salt) सेवन मर्यादित प्रमाणात केल्यास त्याचा आरोग्याला फायदा होतो. मात्र याच मिठाचा अतिवापर तुम्हाला तुम्हाला आजारी पाडू शकतो. जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि पक्षाघात या आजरांचा धोका उद्भवू शकतो. तसेच मिठाच्या अतिसेवनामुळे किडनीच्या कार्यावर देखील मोठा परिणाम होतो.

जास्त मीठ खाल्ल्याने किडनी स्टोन आणि किडनी निकामी होण्याची शक्यता असते. त्यामुळे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मीठाचं सेवन योग्य प्रमाणात करणं गरजेचं आहे. अशातच काही लोकं डाएटचा भाग म्हणून मीठाचं प्रमाण कमी करतात किंवा पूर्णतः बंद करतात. दररोज तुम्ही मीठाचं सेवन करत असाल आणि ते अचानक बंद केलं तर त्याचा काय परिणाम होतो हे आज आपण जाणून घेणार आहोत…

तब्बल एक महिना मीठ खाल्लं नाही तर…
1) सुरुवातीच्या काळात शरीरात सोडियमचं सेवन कमी झाल्याने बॉटर रिटेंशनमध्ये कमतरता जाणवते. यावेळी तुमच्या ब्लड प्रेशरचा स्तरही खालावू शकतो.
2) शरीरात मीठाचं प्रमाण कमी झालं की, इलेक्ट्रोलाईटचं असंतुलन होऊ शकतो. ज्यामुळे स्नायूंच्या कार्यामध्ये अडथळा, मज्जातंतूंचे संक्रमण, मळमळ होण्याची शक्यता असते
3) याशिवाय मीठाचं सेवन बंद केल्यानंतर तुम्हाला उल्टी होणं, चक्कर येण्याची समस्या जाणवू शकते.
4) शरीरात मिठाच्या कमतरतेमुळे व्यक्ती कोमात देखील जाऊ शकते.

एका सामान्य व्यक्तीला दररोज 5 ग्रॅम म्हणजेच 1 चमचे मीठ (Salt) आवश्यक असतं. जर व्यक्तीला किडनी, लिव्हर किंवा डायलेटेड कार्डिओमायोपॅथी सारख्या समस्या नसतील तर आहारात मीठाचे सेवन कमी करू नये असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.

Share This News

Related Post

अस्थमा असलेल्या रुग्णांनी होळी खेळताना अशी खबरदारी घ्यावी, धोका होणार नाही

Posted by - March 17, 2022 0
होळीच्या निमित्ताने सर्वजण रंगांची उधळण करतात आणि गुलालाची उधळण करतात. पण, कधी कधी असं होतं की हा रंग तुमच्यासाठी अडचणीचा…
Sayaji Shinde

Sayaji Shinde : हृदयात ब्लॉकेज, सर्जरी होताच सयाजी शिंदेंनी पोस्ट केला चाहत्यांसाठी व्हिडिओ

Posted by - April 12, 2024 0
मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती समोर येत…
lemon leaves

Lemon Leaves : फक्त लिंबूचं नाहीतर त्याची पाने देखील असतात फायदेशीर

Posted by - August 18, 2023 0
लिंबाच्या पानांमध्ये (Lemon Leaves) अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ज्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. आपण दैनंदिन जीवनात जेवढा वापर लिंबूचा…

मानसिक आरोग्य : पतिपत्नीच्या नात्यामध्ये सातत्याने भांडणे होऊन दुरावा येतोय ? या गोष्टी करून पहा, नक्की फरक जाणवेल

Posted by - February 3, 2023 0
स्वतःला वेळ द्या तुम्ही स्वतः खुश आणि समाधानी असाल तर तुम्ही दुसऱ्याला खुश ठेऊ शकता हे सत्य आहे. १ दिवस…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *