इन्फ्लुएंझाची लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार करून घ्यावेत; सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे आवाहन

534 0

मुंबई : राज्यात इन्फलुएंझा आजाराबाबत सतर्क राहण्याच्या सूचना सर्व जिल्हयातील आरोग्य यंत्रणांना देण्यात आलेल्या असून राज्यस्तरावरून नियमितपणे सनियंत्रण करण्यात येत आहे. नागरिकांनी लक्षणे दिसल्यास दवाखान्यात जावून उपचार घ्यावे अंगावर काढू नये, असे आवाहन आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी केले.

एच३एन२ फ्ल्यू सदृश्य साथरोगाबाबत आरोग्य मंत्री श्री सावंत यांनी विधानसभेत निवेदन केले.

मंत्री सावंत म्हणाले, एच३एन२फ्ल्यू सदृश्य साथरोगाचे रुग्ण रोज वाढत आहेत. अहमदनगर आणि नागपूरमध्ये एका व्यक्तीचा H3N2 ने मृत्यू झाला आहे. इन्फ्लूएंझा ए आजार विषाणूमुळे होणारा आजार आहे. इन्फ्लूएंझा ए चे वेगवेगळे उपप्रकार आहेत. उदा. एच१ एन १ एच३एन२ इ. या आजाराचे सर्वसाधारण लक्षणे ताप, खोकला घशात खवखव धाप लागणे, न्यूमोनिया आढळून येतात. इन्फ्लूएंझा ए बाबत रुग्ण सर्वेक्षण मुख्यतः लक्षणाधारीत आहे. याबाबत सर्व आरोग्य केंद्रात रुग्णाची तपासणी करण्यात येते व मार्गदर्शक सूचना नुसार उपचार करण्यात येतात. १३.०३.२०२३ अखेर एच१ एन१ बाधित ३०३ रुग्ण आणि एच३एन२ बाधित ५८ रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात इन्फ्लूएंझा आजार मुख्यत्वेकरुन पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर जिल्हयातील शहरी भागात दिसून येत आहे. या आजाराचे लक्षणे तसेच उपचार पध्दती या बाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेले आहेत. राज्यातील रुग्णालयात संशयीत रुग्णांना आवश्यकतेनुसार विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येतात. तसेच आरोग्य संस्थेत आजारावरील उपचारासाठी लागणारी औषधे उपलब्ध असल्याचे डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.

यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य सर्व प्रमुख अधिकारी यांची आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली व यावेळी सर्वांनी सतर्क
राहण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत तसेच काळजी घेण्यात येत आहे .

– प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राज्यात उपाययोजना राबवण्यात येत आहेत.

-फ्ल्यू सदृश रुग्णांचे नियमित सर्वेक्षण करण्यात येत आहे.

-फ्ल्यू सदृश रुग्णांवर वर्गीकरणानुसार विनाविलंब उपचार केले जात आहेत.

-राज्यातील उपजिल्हा रुग्णालयात तसंच वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

-सर्व खाजगी रुग्णालयांना देखील याबाबतीत सूचना देण्यात आल्या आहेत

-औषधे आणि इतर साधनसामुग्रीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.

Share This News

Related Post

अहमदनगर : विद्यार्थ्यांची पायपीट होणार बंद ; लायन्स क्लब पुणे व लायन्स क्लब तळेगावतर्फे विदयार्थ्यांना ७५ सायकलींचं वाटप (VIDEO)

Posted by - August 6, 2022 0
अहमदनगर , (अकोले) : अकोले तालुक्यात 6 किलोमीटर पायपीट करून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.खिरविरे येथील सर्वोदय विद्या…

SPECIAL REPORT : ‘शिवसेना’ नाव नक्की कुणी दिलं? प्रबोधनकार ठाकरे की प्र.के.अत्रे

Posted by - October 10, 2022 0
सध्या राजकीय वर्तुळात शिवसेना या चार अक्षरी नावाची जोरदार चर्चा सुरूयं मात्र तुम्हाला माहिती आहे का शिवसेना हे नाव नक्की…
Marathi Sahitya Sammelan

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर; जय्यत तयारी सुरू

Posted by - December 17, 2023 0
साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव): अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साने गुरुजींची…

मिस युनिव्हर्स आणि बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेनला हृदयविकाराचा झटका; इन्स्टा पोस्ट करून म्हणाली, ‘माझं हृदय…!’

Posted by - March 2, 2023 0
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिला दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्यावर एन्जिओप्लास्टी…

बोधी ट्री सिस्टीम व्हायकॉम18 मध्ये 13,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

Posted by - April 28, 2022 0
जेम्स मर्डॉकच्या लुपा सिस्टम्स गुंतवणूक उपक्रम बोधी ट्री सिस्टम्स आणि उदय शंकर यांनी ब्रॉडकास्टिंग सेवा कंपनी व्हायकॉम18 मध्ये 13,500 कोटी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *