अचानक शुगर लेव्हल वाढली ? शुगर नियंत्रणात आणण्यासाठी आहेत काही घरगुती उपचार

197 0

मुंबई – अनेकदा अचानकपणे वाढलेली शुगर अनेक समस्या निर्माण करते आणि यामुळे ब्लडप्रेशर वाढण्याची शक्यता असते. जर तुमची शुगर लेव्हल योग्य पद्धतीने नियंत्रणात येत नसेल तर अशा वेळी किडनीला मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतो किंवा अनेक समस्या देखील निर्माण होऊ शकतात. शरीरातील शुगर लेवल मर्यादेपेक्षा जास्त वाढली असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. काही घरगुती उपायाने आपण आपली शुगर नियंत्रणात आणू शकतो. काय आहेत हे उपाय ? जाणून घेऊयात..

पाणी पिणे

तज्ज्ञ मंडळींच्या मते जर तुमच्या शरीरातील शुगर लेव्हल खूपच मर्यादेपेक्षा जास्त वाढली असेल तर अशा वेळी आपल्या शरीरातील शुगर नियंत्रण करण्यासाठी आपल्याला जास्त प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. ज्या लोकांना शुगरचा त्रास आहे अशा व्यक्तींनी दिवसभरातून तीन ते चार लिटर पाणी आवश्य प्यायला हवे.

जांभूळ

जांभळामध्ये एंथोसायनिन, एलेजिक एसिड यासारखे अनेक गुणधर्म असतात आणि म्हणूनच हे पदार्थ आपल्या शरीरातील इन्शुलिनला नियंत्रित करते. जांभळीच्या बियांमध्ये विशेष करुन ग्लाइकोसाइड जम्बोलिन आणि अल्कलॉइड जंबोसीन हे घटक तत्त्व आपल्या शरीरातील ब्लड शुगरल लेव्हलला नियंत्रण करत असतात.

कारले

नियमितपणे कारले खाल्ल्याने तुमच्या शरीरातील शुगरची मात्रा हा मर्यादित राहते व त्याचबरोबर डायबिटीससुद्धा नियंत्रणात राहण्यास मदत होते. जर तुम्हाला शुगर सारख्या समस्येला सामोरे जावे लागत असेल तर अशा वेळी सकाळी उपाशीपोटी कारल्याचा रस अवश्य सेवन करावा. तुम्ही कारल्याची भाजी सुद्धा बनवून नियमितपणे खाऊ शकता असे केल्याने तुमची शुगर नियंत्रणात येईल.

नियमित व्यायाम

कोणत्याही प्रकारच्या आजारांना दूर ठेवायचे असेल तर आपल्याला नियमितपणे एक्ससाइज म्हणजेच व्यायाम करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. नियमितपणे केलेला व्यायाम, एक्सरसाइज तुमच्या शरीरातील अनेक आजार दूर करण्यास महत्त्वाची भूमिका बजावत असतात. ज्या व्यक्तींना डायबिटीज शुगरची समस्या आहे अशा व्यक्तीने सुद्धा नियमितपणे एक्ससाइज करणे गरजेचे आहे.

Share This News

Related Post

आता महापौर नाही पण कार्यकर्ता म्हणून पुणेकरांच्या पाठीशी !

Posted by - March 13, 2022 0
‘छत्रपती शिवरायांचं पुणं, फुलेंचं पुणं, टिळकांचं पुणं… आमचं पुणं, आपलं पुणं… पुणं तिथं काय उणं ! आम्ही पुणेकर एकत्र येऊन…
Heena Gavit

Heena Gavit : चर्चेतील महिला : हीना गावित

Posted by - April 2, 2024 0
लोकसभा निवडणुकीत नंदुरबारची जागा लढवण्याचा भाजपचा हक्क हा आधीचा निष्कर्ष असून पक्षाकडे विद्यमान खासदार हीना गावित आहेत ज्यांनी 2014 आणि…

राज्यातील सर्व दुकानं व आस्थापनांना मराठी नामफलक लावणं बंधनकारक ! शासनाकडून अधिनियम लागू

Posted by - March 30, 2022 0
राज्यातील सर्व दुकानं व आस्थापनांचा नामफलक मराठी देवनागरी लिपित लावण्याबाबतचा अधिनियम जारी झाला असून आता यापुढे महाराष्ट्रातील सर्व दुकाने तसेच…

शिवाजी पार्कवर लतादीदींचं स्मृतिस्थळ उभारा ; भाजपा आमदारांच्या पत्रावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

Posted by - February 7, 2022 0
मुंबई- गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर रविवारी शिवाजी पार्क इथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवाजी पार्क या ठिकाणी लता मंगेशकर यांचं…
Yami-Gautam

Yami Gautam : ‘काही जण एका रात्रीत…’, यामी गौतमचे ‘ते’ ट्विट चर्चेत

Posted by - August 14, 2023 0
मुंबई : ‘विकी डोनर’, ‘दसवी’, ‘बदलापूर’, ‘भूत पोलीस’, ‘काबील’, ‘सनम रे’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत बॉलिवूड अभिनेत्री यामी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *