High Cholesterol

High Cholesterol : रक्तात कोलेस्ट्रॉल वाढलं तर शरीरात दिसू लागतात ‘हे’ 4 बदल

5308 0

प्रत्येकाची इच्छा असते की, आपण फीट आणि फाईन रहावं. शरीर निरोगी ठेवण्यासाठी हृदय निरोगी ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र चुकीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येक व्यक्तींला व्यायाम करणे शक्य होत नाही. अशातच चुकीच्या आहारामुळे कमी वयातच अनेकांमध्ये वाढत्या कोलेस्ट्रॉलची (High Cholesterol) समस्या दिसून येते. कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे हार्ट अटॅकसोबत स्ट्रोक, मधुमेह यांसारख्या आजारांचा धोकाही अनेक पटींनी वाढतो. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल असतात. यामध्ये एक चांगलं कोलेस्ट्रॉल आणि दुसरं वाईट कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरात ज्यावेळी वाईट कोलेस्ट्रॉल वाढतं, तेव्हा आपल्या शरीरात काही बदल दिसून येतात ते कोणते आहे जाणून घेऊया….

कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात दिसतात ‘हे’ 4 बदल
1) शरीरातील कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे अनेकदा डोकेदुखीची समस्या उद्भवते. त्यामुळे जर सतत तुम्हाला तुमचं डोकं जड वाटत असेल तर हे कोलेस्ट्रॉल वाढण्याचं लक्षण असू शकतं.
2) जर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला किंवा सतत श्वास फुलू लागला तर ते उच्च कोलेस्ट्रॉलचे लक्षण असू शकते.
3) जर तुम्हाला अचानक तुमचं वजन वाढलेलं वाटत असेल तर हे देखील वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचं लक्षण असू शकतं. यामुळे तुम्हाला सतत थकवा देखील जाणवू शकतो.
4) छातीत अचानक भरपूर वेदना होणं वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचं लक्षणं असू शकतं.

आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवा
ओट्स – उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येवर ओट्स फायदेशीर ठरतात. ओट्समध्ये बीटा ग्लुकन असते जे शरीरात खराब कोलेस्ट्रॉल जमा होऊ देत नाही.

अक्रोड – कॅल्शियम, मॅग्नेशियम, ओमेगा-3, फायबर, कॉपर आणि फॉस्फरस यांसारख्या पोषक घटक अक्रोडमध्ये असतात. त्यामुळे अक्रोड खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वितळण्यास सुरुवात होते.

लिंबू – व्हिटॅमिन सी समृद्ध लिंबू एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयुक्त ठरतं. लिंबूवर्गीय फळांमध्ये काही फायबर असते, जे खराब कोलेस्टेरॉलला रक्तात जाण्यापासून रोखते.

लसूण – कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी लसूण प्रभावी ठरते. अनेकदा संशोधनातून असं दिसून आलंय की, दररोज लसूण खाल्ल्याने एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी 9 ते 15 टक्क्यांनी कमी होते.

Share This News

Related Post

उन्हाळ्यात कशा प्रकारे घ्यावी स्वतःच्या आरोग्याची काळजी, जाणून घ्या..

Posted by - March 7, 2022 0
उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे रक्तदाबाचा त्रास, चक्कर येणे, डोके दुखणे, थकवा जाणवणं, पायात गोळा येणे, चिडचिड व राग…

HEALTH WEALTH : ‘ या ‘ सोप्या उपायांनी डोळ्यांचे आरोग्य आणि सौंदर्य राखा अबाधित

Posted by - September 1, 2022 0
हे सुंदर जग अनुभवण्यासाठी , पाहण्यासाठी निसर्गाने दिलेला सुंदर अवयव म्हणजेच डोळे आहेत . डोळ्यांचा रंग कोणताही असू द्या परंतु…

HEALTH WEALTH : मुळव्याधीने त्रस्त आहात? ही पथ्य अवश्य पाळा; नक्की मिळेल आराम

Posted by - October 25, 2022 0
मुळव्याध हा उष्णतेने होणारा आजार आहे. खरं तर हा सामान्य आजार आहे. परंतु काही जणांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन…
Uttanasana

Uttanasana : उत्तानासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Posted by - April 2, 2024 0
उत्तानासन (Uttanasana) हा संस्कृत शब्द आहे. याचा शब्दशः अर्थ जोरदार स्ट्रेचिंग असा होतो. या आसनाच्या सरावाने शरीराला काही आश्चर्यकारक फायदे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *