PINK EYE : डोळे आले आहेत ? ‘या’ उपायांनी मिळू शकतो आराम वाचा कारणे आणि उपचार

217 0

PINK EYE : पावसाळ्यामध्ये संसर्गजन्य आजार देखील झपाट्याने वाढतात . असाच एक आजार आहे तो म्हणजे ‘डोळे येणे’… डोळे येणे हा संसर्गजन्य रोग असून अनेकदा याची साथ देखील वाढू शकते.  तर मग आज आपण पाहणार आहोत डोळे येणे म्हणजे नक्की काय ? डोळे येण्याची कारणे काय आहेत ? आणि त्यावरील उपचार काय आहेत ?

तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की डोळे येणे म्हणजे नक्की काय

तर डोळे येणे यास पिंक आय (PINK EYE) किंवा कॉन्जक्टिव्हिटीज असे देखील म्हणतात. यामध्ये डोळे जळजळणे, खूपणे ,डोळ्यातील पांढरा भाग लालसर होणे ,डोळ्यातून पाणी येणे, डोळ्यात भोवती खाज येणे ,तसेच डोळ्यातून सातत्याने घाण बाहेर येत राहते ही लक्षणे डोळे येण्याची आहेत.

आता पाहूयात डोळे येण्याची कारणे काय आहेत

तर डोळे येण्याचे प्रमुख कारण आहे डोळ्यात ‘इन्फेक्शन’ … बॅक्टेरिया किंवा व्हायरसचे इन्फेक्शन झाल्याने डोळे येण्याचा आजार उद्भवतो . हा संसर्गजन्य आजार असल्याने साथीचा प्रसार होऊन डोळे येऊ शकतात. त्याचप्रमाणे एलर्जीमुळे देखील डोळे येऊ शकतात . यामध्ये केमिकल्स , दूषित वायू आणि अल्ट्राव्हायोलेट रेज यामुळे डोळे येऊ शकतात.

डोळे आल्यानंतर उपचार आणि घ्यावयाची काळजी

  • सर्वात प्रथम आपल्या फॅमिली डॉक्टरचा किंवा योग्य वैद्यकीय सल्ला घ्यावा.
  • डोळे काही वेळाच्या अंतराने थंड पाण्याने स्वच्छ धुवावेत.
  • डॉक्टरांनी दिलेले ड्रॉप वेळच्यावेळी डोळ्यात घालून डोळे स्वच्छ ठेवावेत.
  • इन्फेक्शन आणि बॅक्टेरियाने पसरणारा हा आजार असल्यामुळे डोळेची जळजळ किंवा खाज जरी आली तरी थेट हाताने डोळे चोळू नका , हात स्वच्छ धूत रहा आणि डोळ्यांवर अशावेळी थंड पाण्याने शिपका मारा.
  • बाहेर पडणार असालच तर डोळ्यावर गॉगल अवश्य घाला.
  • डोळे आले असल्यास किंवा लक्षणे वाटत असल्यास सौंदर्यप्रसाधनांचा वापर कटाक्षाने टाळा.
  • घरात कोणाचे डोळे आले असल्यास एकमेकांचे रुमाल टॉवेल वापरणे कटाक्षाने टाळा.
  • “कोणत्याही आजारासाठी सर्वप्रथम वैद्यकीय सल्ला घेणे योग्य आहे .”
Share This News

Related Post

#PUNE : शरद पवार यांच्या हस्ते पुण्यात 300 खाटांच्या मेडिकव्हर रुग्णालयाचं उदघाटन

Posted by - January 21, 2023 0
तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी दैनंदिन आरोग्य सेवा पुरविण्याचं काम डाँक्टर करत असतो – शरद पवार पुणे : मेडिकव्हर रुग्णालयातफेँ पुण्यातील…
Ashadhi Ekadashi Upvas Recipe

Ashadhi Ekadashi Upvas Recipe : उपवासाला घरच्या घरी बनवा अशा प्रकारे कच्च्या केळ्याची टिक्की

Posted by - June 29, 2023 0
रेसिपी : वारकरी,विठ्ठलभक्त ज्या सोहळ्याची, ज्या तिथीची अगदी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असतात, तो दिवस म्हणजे आषाढी एकादशी. यादिवशी…

चांगल्या आरोग्यासाठी उन्हाळ्यात ह्या पाच गोष्टी खाणे टाळा

Posted by - April 2, 2022 0
उन्हाळ्याचा हंगाम सुरू होताच, जोरदार ऊन आणि गरम वारा यांनी लोक हैराण होऊन जातात. तापमानात वाढ झाल्यामुळे बऱ्याच लोकांना आरोग्य…

HEALTH WEALTH : कितीही टेन्शन असुद्या… झोप शांत लागेल, पूर्ण झोप होईल, सकाळी ताजेतवाने वाटेल, फक्त करा हे घरगुती उपाय

Posted by - November 4, 2022 0
रात्री शांत झोप लागत नाही , लवकर झोप लागत नाही किंवा सकाळी उठल्यावर पण ताजेतवाने वाटत नाही अशा समस्या अनेकांना…
Chickenpox New Variant

Chickenpox New Variant : भारतात आढळला कांजण्याचा नवा व्हेरिएंट

Posted by - September 14, 2023 0
कांजण्या (Chickenpox New Variant) हा मुळातच संसर्गजन्य रोग आहे. आपल्यापैकी अनेकांना कांजण्या येऊन गेल्या आहेत. मात्र आता एक चिंताजनक बातमी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *