Eye Irritation

Eye Irritation : डोळे येण्याची कारणे कोणती आहेत? त्यांची काळजी कशी घ्यायची ?

435 0

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईमध्ये डोळे येण्याच्या (Eye Irritation) प्रमाणात वाढ झाली आहे. ह्यामध्ये डोळ्यातील (Eye Irritation) पांढऱ्या भागाला तसेच पापण्यांच्या अंतर्गत पृष्ठभागाला आच्छादणाऱ्या कंजक्टिव्हा ह्या पातळ पडद्यावर दाह निर्माण होतो. हा प्रादुर्भाव समुदायातील अन्य व्यक्तींमध्ये वेगाने पसरू शकतो. त्यामुळे जागरूकता व प्रतिकाराचे उपाय त्वरित करण्याची गरज भासते. धक्कादायक म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत कंजंक्टिव्हायटिसच्या प्रमाणात चिंताजनक म्हणजेच 10.15% वाढ झाली आहे.

हा आजार (Eye Irritation) खूप गंभीर स्वरुपाचा समजला जात नाही. पण हा संसर्गजन्य आजार असल्याने, डोळ्यांसारख्या नाजूक अवयवावर त्याचा परिणाम होत असल्याने आणि तो बरा व्हायला बराच कालावधी लागत असल्याने तो होऊ नये याची काळजी घेणं योग्य ठरतं. डोळे येणे म्हणजे काय? हा आजार कसा होतो? त्याची लक्षणं काय? त्यावर उपचार कोणते? आणि त्यापासून बचाव कसा करायचा, हे आपण जाणून घेऊया.

डोळे येणे म्हणजे काय?
खरं तर हा आजार एक प्रकारचं संसर्ग किंवा अ‍ॅलर्जी आहे. ज्या व्हायरसमुळे सहसा आपल्याला सर्दी होते, त्या व्हायरसमुळे हा आजार संभवतो. बॅक्टेरियल किंवा व्हायरसमुळे डोळे आलेले असल्यास एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतो, तर अ‍ॅलर्जीमुळे डोळे आलेले असल्यास त्याचा दुसऱ्यांना संसर्ग होत नाही.

डोळे येण्याची लक्षणं काय आहेत?
डोळे हलके लाल होऊ लागतात.
डोळ्यातून पाणी यायला लागतं.
खाज येऊ लागते.
डोळ्यात थोडी चिकटपणा येतो.
डोळ्यात वारंवार खाज येते.
तज्ज्ञ सांगतात की, कधीकधी यासोबत सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणेही जाणवू शकतात.

संसर्ग होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी?
डॉक्टर सांगतात की, कोणताही संसर्ग जन्य आजारापासून बचाव करण्यासाठी जी काळजी घेणं गरजेचं असतं, ती घेतल्याने या आजारापासून बचाव केला जाऊ शकतो.
संसर्ग झालेल्या व्यक्तीने वापरलेले रुमाल, टावेल वापरणं टाळावं.
हात स्वच्छ धुवावेत.
डोळ्यांना सारखा हात लावू नये.

Share This News

Related Post

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे आरोग्यास चांगले, पण…..

Posted by - June 24, 2022 0
पाणी ही शरीरासाठी अत्यावश्यक गोष्ट असते. शिवाय हे पाणी तांब्याच्या भांड्यातून प्यायल्यास त्याचा शरीराल खूप फायदा होतो हे सिद्ध झाले…
Turmeric Water

Turmeric Water : शरीरात वाढलेल्या चरबीवर हळदीचे पाणी ठरते गुणकारी

Posted by - August 17, 2023 0
सध्याच्या जीवनात सांधेदुखी, कंबरदुखी, अंगदुखीच्या तक्रारी या अनेक वाढलेल्या दिसत आहेत. त्यामुळे अशावेळी आपण आयुर्वेदाचेही उपचार घेतो. परंतु या मध्ये…
Honeymoon

हनिमूनला अधिक रोमँटिक बनवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Posted by - June 9, 2023 0
सध्या सगळीकडे लग्नसराई सुरु आहे. या लग्नानंतर सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे हनीमून. पण अनेकवेळा हनिमूनला जायची तयारी उत्तम…

Parenting Tips : मुलांच्या रागावर नियंत्रण ठेवायचं असेल तर फॉलो करा या सोप्या टिप्स

Posted by - March 16, 2023 0
Parenting Tips : मुले मनाशी प्रामाणिक आणि हृदयाने अत्यंत भावनिक असतात. मात्र इच्छा पूर्ण न झाल्यास मुलांच्या चेहऱ्यावर राग दिसू…
parvatasana-mountain-pose-steps-benefits

Parvatasana : पर्वतासन म्हणजे काय ? काय आहेत त्याचे फायदे?

Posted by - March 21, 2024 0
पर्वतासन हा संस्कृत शब्द आहे. हा शब्द प्रामुख्याने 2 शब्दांनी तयार झाला आहे. पहिला शब्द पर्व म्हणजे पर्वत (अर्धा). तर दुसरा शब्द आसन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *