Tea Biscuit

चहासोबत बिस्कीट खाताय? मग आतापासूनच करा बंद, नाहीतर भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम

321 0

भारतात चहा प्रेमींची कमतरता नाही, जोपर्यंत चहा हातात येत नाही तोपर्यंत अनेकांची दिवसाची सुरुवातच होत नाही. मग त्यात अधिक भर म्हणून बिस्किटं. आता चहा आणि बिस्किटांची जोडी ही वर्षानुवर्षे जुनी,मात्र जर हीच मैत्री तुमच्या शरीरासाठी घातक ठरू शकते? तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. कसे ते आज आपण जाणून घेणार आहोत…

जर तुम्हाला देखील चहासोबत गोड बिस्किटे खाण्याची सवय असेल तर साधव व्हा. कारण यापासून होणारे दुष्परिणाम देखील तुम्हाला माहित हवे. बहुतेक लोकांसाठी, बिस्किट खाणे त्यांच्या रोजच्या आहाराचा एक भाग आहे, परंतु तज्ञांच्या मते, यामुळे तुमचे आरोग्य देखील बिघडू शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चहा आणि बिस्किटे एकत्र कधीही खाऊ नयेत. बिस्किटे बनवण्यासाठी रिफाइंड पीठ आणि हायड्रोजन फॅट्स वापरतात. त्यामुळे वजन आणि लठ्ठपणा दोन्ही वाढू लागतात. यामुळेच डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञ चहा आणि बिस्किट एकत्र खाण्याचा सल्ला देत नाहीत. चहा-बिस्कीट खाल्ल्याने काही क्षणांसाठी आपल्याला काही खाल्ल्याचा आनंद वाटू शकतो. मात्र, हे आपल्या शरीरासाठी हानीकारक आहे.

चहा सोबत बिस्किटं खाण्याचे दुष्परिणाम खालीलप्रमाणे:
1) लठ्ठपणा वाढतो
बिस्किटमध्ये हायड्रोजनेटेड फॅट्सचे प्रमाण असते. बिस्किट हे फॅट फ्री नसतात. त्यामुळे जर तुम्ही रोजच बिस्किटं खात असाल तर यामुळं लठ्ठपणा वाढू शकतो. तुम्हाला यामुळे त्वचेच्या समस्या देखील उद्भवू शकतात.

2) रक्तातील साखरेचं प्रमाण वाढते
चहासोबत गोड बिस्किटं जास्त दिवस खाण्याची सवय रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते. यात सोडियमचे प्रमाणही जास्त असते. मधुमेह आणि थायरॉईडच्या रुग्णांनी बिस्किटांचे सेवन करू नये.

3) रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते
बिस्किटमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्यानं रोगप्रतिकारशक्तीही कमी होऊ शकते. कोरोनानंतर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर विशेष भर दिला जात आहे.

4) बद्धकोष्ठता
बिस्किट हे मैद्यापासून बनवले जातात. त्यात फायबरचे प्रमाण नसते. ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. बीएचए आणि बीएचटी नावाचे दोन प्र‍िजर्वेट‍िव बिस्किटे किंवा कुकीजमध्ये टाकले जातात. यामुळं तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचते.

5) दात किडणे
बिस्किटात साखरेचे प्रमाण जास्त असते. जेव्हा तुम्ही ते रोज खाता तेव्हा ते दातांच्या इनॅमलला नुकसान पोहोचवते. त्यामुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होऊन दात खराब होऊ शकतात.

सध्याची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या दिसू लागतात. याकडे दुर्लक्ष करता कामा नये. चहा-बिस्किट हे कॉम्बिनेशन देखील या समस्येचे मुख्य कारण आहे. बिस्किटांमध्ये आढळणाऱ्या रिफाइंड साखरमध्ये कोणतेही पौष्टिक घटक नसतात. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. हेल्दी फॅट्सचा आहारात समावेश केल्याने चेहऱ्याला कोणतीही हानी होत नाही आणि त्वचाही चमकदार होते. यामुळे तुम्ही जर चहासोबत बिस्कीट खात असाल तर ही सवय आजच सोडून द्या.

Share This News

Related Post

सावधान ! राज्यासह पुण्यात गोवरचा धोका वाढतोय; डॉक्टरांनी काय दिला सल्ला ? पाहा

Posted by - November 30, 2022 0
पुणे : मुंबई पाठोपाठ आता पुण्यासह राज्यात गोवरचा उद्रेक झाला आहे. गोवर हा कोरोनापेक्षा पाच पट वेगाने पसरत आहे. गोवर…
Bakasana

Bakasana : बकासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Posted by - March 10, 2024 0
आशियामध्ये, बगळ्याला प्राचीन काळापासूनच समृद्धी आणि युवावस्थाचे प्रतीक मानले जाते. चीनमध्ये बगळे हे दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते. बकासन/काकासनात या तिन्ही…

Weight Loss : वजन कमी करणं झालं इतक सोपं ; वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ ५ सोप्या टिप्स

Posted by - May 16, 2024 0
तुम्ही अशा जगात वावरता की, जिथे अनेक फिटनेस ट्रेंड येतात आणि जातात; पण निरोगी जीवनशैली जगणे हेच आपले अंतिम ध्येय…

सब्जा पिण्याचे काय आहेत गुणकारी फायदे ? जाणून घ्या.

Posted by - May 22, 2022 0
तुळस भारतीय घरांतील पूजनीय झाड आहे. अनेक घरांमध्ये तुळशीचं रोपटं लावलेलं पाहायला मिळतं. तुळस अनेक आजारांवर औषधी म्हणून काम करते.…

#BREST CANCER : भारतासह जगभरात ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णसंख्येत वाढ ; काय आहेत कारणे आणि लक्षणे , महिलांनी अवश्य जाणून घ्या !

Posted by - February 13, 2023 0
#BREST CANCER : भारतासह जगभरात ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या वयाबरोबर महिलांमध्ये हा आजार दिसून येत आहे. स्तनाचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *