HEALTH WELTH : पावसाळी वातावरणामुळे घरात सारखे कुणीतरी आजारी पडते ; ‘या’ सामान्य घरगुती उपायांनी कुटुंबाला ठेवा सुरक्षित

238 0

HEALTH WELTH : पावसाळा म्हटलं की घरातील ओलावा ओले कपडे दूषित पाणी पावसात भिजल्यामुळे येणारे आजारपण अशा एक ना अनेक कारणामुळे घरात सातत्याने कोणी ना कोणी आजारी पडतच असतो. ऋतुमान बदललं की फ्लू ,सर्दी ,ताप असे सामान्य आजार होतच असतात . त्यासाठी खरं तर घाबरण्याची आवश्यकता नाही .ऋतुमानानुसार बदलणारे बाहेरील वातावरण शरीराच्या अंतर्गत प्रक्रियेला बदलण्यास भाग पाडते .त्यामुळे किरकोळ आजार पण होतच असते .पण जेव्हा संपूर्ण कुटुंबातच व्हायरल सारखे आजारपण पसरते ,तेव्हा मात्र कुटुंब सांभाळणे जड जाऊ शकते .मग अशावेळी काही सामान्य टिप्स फॉलो करून किरकोळ आजारांना दूर ठेवता येऊ शकते.

1.पावसाळ्यात सर्वात जास्त जपायचं आहे ते पिण्याच्या पाण्याचे मूळ आरोग्य अर्थात.. घरात जर लहान मुले असतील तर त्यांना आवश्यक पाणी उकळूनच द्यावे. पावसाळ्यात पाणी गाळून घेऊन कमीत कमी त्यामध्ये पाणी शुद्ध करण्याचे औषध पाण्याच्या क्षमतेनुसार टाकावे. घरात एक्वागार्ड असेल तर उत्तम ,अन्यथा एक तांब्याचा जग किंवा भांड्यामध्ये पाणी पिण्याचे साठवावे तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे

2.कपडे कोरडेच अंगावर घाला पावसाळ्यात कपडे वाळवण हे गृहिणींसाठी सर्वात अवघड काम ठरतं ,पण कमीत कमी कपडे धुवून जास्तीत जास्त त्यांना कोरडे ठेवणं आवश्यक आहे. ओले कपडे अंगावर घातल्याने स्किन एलर्जी सह सर्दी ,ताप यांसारखे आजार ओढाऊ शकतात.

3.अन्न गरम करूनच खावे, पावसाळ्यात अन्नपदार्थ लवकर खराब होणार नाहीत .वातावरणातील थंडावा अन्नपदार्थ खराब होऊ देत नसतील ,तरीही घरातील ओल यामुळे माशा ,चिलटे यांचे प्रमाण घरामध्ये वाढते त्यामुळे अन्नपदार्थ नेहमी गरम करूनच खा

4. आंघोळीच्या पाण्यामध्ये डेटॉल किंवा अर्धा चमचा मीठ घालून आंघोळ करा

5. दिवसभरातून दोन वेळा तवा कडकडीत गरम करून त्यावर ओवा मूठभर घाला .घराचे सर्व खडकी दरवाजे बंद करून भाजलेल्या ओव्याचा सुवास घरभर पोहोचू द्या. या वासाने सर्दी सारखे आजार दूर राहतील ,त्यासह घरातील चिलटे माशा देखील दूर राहतील.

6. घरातील वृद्धांना आणि पाच वर्षा आतील लहान मुलांना पायात सॉक्स आणि कान बंद राहण्यासाठी कान टोपीचा अवश्य वापर करा. यामुळे सर्दी सहजासहजी होणार नाही.

7. घरात डासांची उत्पत्ती होईल असा पाण्याचा संचय करू नका ,जर असेलच तर घरात डास राहणार नाहीत याची प्रकर्षाने काळजी घ्या. डेंग्यू ,मलेरिया सारखे आजार पावसाळ्यात डासांच्या उत्पत्तीमुळेच अधिक वाढतात.

8. अत्यावश्यक नसेल तर पावसात घरातून बाहेर पडू नका. पावसात भिजणे टाळा भिजण्याचा आनंदच घ्यायचा असेल तर पावसात भिजले असाल त्यानंतर लगेचच गरम पाण्याने स्वच्छ आंघोळ कराच

9. घरात सकाळ संध्याकाळ दोन कापूर वड्या तरी जाळाच कापराच्या वासाने कीटक जीव जंतू माशाची दूर राहतातच त्यामुळे वातावरण शुद्ध होऊन शरीर निरोगी राहण्यास मदत होईल

Share This News

Related Post

#HEALTH WEALTH : साखरेची पातळी अचानक कमी होते का ? या टिप्स ताबडतोब रक्तातील साखरेची पातळी वाढवतील

Posted by - March 24, 2023 0
काम करण्यासाठी, खेळण्यासाठी किंवा अगदी सरळ विचार करण्यासाठी आपल्याला आपल्या रक्तातील साखर म्हणजेच रक्तातील ग्लुकोजमधून ऊर्जा आणि ऊर्जा आवश्यक असते.…

भारताच्या शत्रूच्या छातीत धडकी भरवणारी पाणबुडी INS वागशीर आहे तरी कशी ?

Posted by - April 16, 2022 0
नवी दिल्ली- भारताच्या शत्रूंची झोप उडवण्यासाठी देशाची सागरी सीमा अभेद्य आणि अखंड ठेवणारी आतापर्यंतची सर्वात आधुनिक पाणबुडी INS वागशीर लवकरच…

अफजलखानाच्या कबरीजवळील ‘त्या’ तीन कबरी कुणाच्या ?

Posted by - November 13, 2022 0
प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरी जवळ आणखी तीन कबरी आढळून आल्यानं खळबळ उडालीये. या तीन कबरी नेमक्या कुणाच्या आहेत,…

सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘दर्यासारंग’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

Posted by - April 3, 2023 0
फर्जंदच्या यशानंतर डॉ. अनिरबान सरकार निर्मित आणि डेक्कन एव्ही मीडिया प्रस्तुत ‘दर्यासारंग’ या चित्रपटाचा मोशन पोस्टर आणि पोस्टर अनावरण सोहळा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *