Diet

Diet : शरीर अ‍ॅक्टिव्ह आणि निरोगी ठेवण्यासाठी आहाराबाबतचे ‘हे’ नियम पाळा

364 0

आपले शरीर अक्टिव्ह आणि निरोगी ठेवण्यासाठी हेल्दी आहार (Diet) आवश्यक असतो. पण फक्त खाद्यपदार्थ जेवणाला हेल्दी बनवत नाहीत. हेल्दी अन्नपदार्थ म्हणजे योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने खाणे. अशा स्थितीत आयुर्वेदात खाण्याचे काही नियम आहेत ज्यांचे पालन करून तुम्ही तुमचे आरोग्य निरोगी व मजबूत राखू शकता.

जगण्यासाठी आहार खूप महत्त्वाचा आहे. संतुलित आहार आणि पौष्टिक पदार्थ खाल्ल्यानेच तुमच्या शरीराला त्याची कार्ये प्रभावीपणे करण्यासाठी ऊर्जा मिळते. पण गोष्ट इथेच संपत नाही तर सर्वात जुनी वैद्यकीय व्यवस्था आयुर्वेद हे अन्नाच्या निवडी बरोबरच खाण्याचे नियम फॉलो करण्याचा सल्ला देतं. खरंच आयुर्वेदातील शारीरिक आणि मानसिक आरोग्याला चालना देण्यासाठी पोषण ही प्राथमिक पद्धत आहे. अशा परिस्थितीत आयुर्वेदिक तज्ञांनी अन्नाशी संबंधित सर्व लहान-मोठ्या परिमाणांबाबत काही नियम बनवले आहेत, ज्यामुळे तुमचे अन्न शरीरासाठी औषध बनू शकते.

जर तुम्ही आयुर्वेदिक आहाराशी संबंधित काही सोप्या नियमांचे सातत्यपूर्ण पालन केले तर तुम्ही दीर्घकाळ रोगांच्या तावडीतून स्वतःला वाचवू शकता आणि निरोगी दीर्घायुष्य जगू शकता.

नियम 1- भूकेपेक्षा कमी खा
अन्न चांगल्या प्रकारे शरीराला मिळावे आणि पचावे याची खात्री करण्यासाठी नेहमी आपल्या भूकेपेक्षा कमी खाणे योग्य असते. भूक लागली असेल त्याच्या फक्त 70 ते 80 टक्केच खा. नेहमी 70-30 नियमांचे पालन करा, हा नियम असं सांगतो की, नेहमी तुमचे पोट 70% भरलेले पाहिजे आणि 30% रिकामी असावे.

नियम 2- हेवी लंच करा
दुपारचे जेवण हे दिवसातील सर्वात हेवी जेवण असावे. कारण पाचक अग्नी आणि मानवी शरीर सूर्याच्या गतीचे अनुसरण करत असते. म्हणून, यावेळी आपल्या शरीराला पुरेशा उर्जेसाठी अधिक पोषक घटकांची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत दुपारी हेवी जेवण खाण्याचा सल्ला आयुर्वेद देतं.

​नियम 3- रात्री उशीरा जेवू नका
रात्रीचे जेवण उशिरा खाणे ही आजकाल फॅशन बनली आहे. पण असे केल्याने तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. कारण जसजसे तुमचे शरीर रात्री विश्रांतीसाठी तयार होते, तसतशी आपली पचनक्रिया मंदावते. यामुळे तुम्ही खाल्लेल्या कॅलरीज चरबीच्या रूपात शरीरात साठवल्या जाण्याची शक्यता वाढते. त्यामुळे झोपण्यापूर्वी व रात्री उशीरा खाणे टाळा. झोपण्याच्या 3 तास आधी जेवण्याचा प्रयत्न करा.

​नियम 4 – ताजं जेवणच खा
आयुर्वेदानुसार जेवण पुन्हा गरम करणे योग्य नाही. अशा परिस्थितीत शिळे अन्न खाणे टाळा आणि जेवण पुन्हा पुन्हा गरम करणे टाळा. दिवसा तयार केलेले अन्न रात्री खाल्ले तरी चालेल पण फ्रीजमध्ये ठेवलेले आणि पुन्हा गरम केलेले पदार्थ तुमचे आरोग्य बिघडवू शकतात.

नियम 5- पहिलं जेवण पचल्यावरच परत काहीतरी खा
जर तुम्हाला अपचनाचा त्रास होत असेल तर उपवास करणे कधीही चांगले. जर पूर्वीचे जेवण पूर्णपणे पचले नाही आणि त्याचे ढेकर येणे थांबले नसेल तर कृपया जेवणं टाळा आणि सुंठ घालून गरम पाणी प्या. हे करताना आधीचे जेवण पचू द्या, मगच पुन्हा खा.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

MS Dhoni : धोनी वानखेडेवर उतरताच रचणार ‘हा’ खास विक्रम

Pune News : सदर्न स्टार आर्मी वाइव्ज वेल्फेअर असोसिएशनने पुणे येथे केले ‘अस्मिता’ चे (दक्षिणी कथन) आयोजन

MI vs CSK : मुंबईविरुद्धच्या सामन्याआधी चेन्नईला मोठा ! ‘हा’ खेळाडू सामन्याला मुकण्याची शक्यता

Vishal Patil : चर्चेतील चेहरा : विशाल पाटील

युवा उद्योजक पुनीत बालन यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीच्या निमित्ताने केले अभिवादन

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेची मोठी घोषणा ! ‘या’ दिवसापासून पुन्हा सुरु करणार आमरण उपोषण

Murlidhar Mohol : नवमतदारांनी भारताच्या विकासाचे भागीदार व्हावे : मुरलीधर मोहोळ

Salman Khan : सलमान खानच्या घरासमोर अंदाधुंद गोळीबार; CCTV फुटेज आले समोर

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेंवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

Accident News : पुण्याहून नाशिकला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात

Salman Khan : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार!’ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

Kati Chakrasana : कटिचक्रासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

#HEALTH TIPS : झोपताना तुम्ही करताय का ‘या’ चुका ? आजच तपासा अन्यथा अनेक गंभीर आजारांना मिळते आमंत्रण

Posted by - March 27, 2023 0
झोप आपल्या आरोग्यासाठी आणि संपूर्ण आयुष्यासाठी खूप महत्त्वाची आहे, तरीही त्याकडे सर्वाधिक दुर्लक्ष केले जाते. जर एक रात्र पूर्ण झाली…

उन्हाळ्याच्या दिवसांत नारळपाणी फायद्याचे ; काय आहेत फायदे जाणून घ्या

Posted by - April 22, 2022 0
उन्हापासून वाचण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयोग करत असतात. उष्णतेपासून बचावासाठी विविध प्रकारची शीतपेये घेतली जातात. कार्बोनेटेड पेये, फळांचे रस, आमरस, लस्सी…

#HEALTH WEALTH : मुलांनाही होऊ शकतात हृदयाशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

Posted by - March 9, 2023 0
आजच्या युगात मुलांना काही गंभीर आजार होऊ लागले आहेत. काही वर्षांपूर्वी हृदयाशी संबंधित आजार प्रामुख्याने वयोवृद्ध आणि वृद्धांमध्ये दिसून येत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *