Water Bottle

तुम्ही बाटलीने पाणी पित असाल तर सावधान! होऊ शकतो ‘हा’ आजार

430 0

उन्हाळ्याचे दिवस आहेत तसेच साथीच्या आजारांचेही. अशा स्थितीत जर घराबाहेर पडत असाल तर नक्कीच तुम्ही पाण्याची बॉटल घेऊनच बाहेर पडत असणार. मात्र तुम्हाला माहीती आहे का, की हीच पाण्याची बॉटल तुमच्या आजाराचं कारण ठरू शकतं कसे ते जाणून घेऊया…

एकच बॉटल जर तुम्ही वारंवार वापरत असाल तर त्यात टॉयलेट सीटपेक्षा(Toilet Seat)  40 हजार पट जास्त बॅक्टेरिया असतात. असं अमेरिकेतील एका रिसर्चमध्ये समोर आलं आहे. ज्यांना वाटत असेल की घरातून पाणी बॉटलमध्ये भरुन नेल्यानं तुम्हाला बाहेरचे रोग होणार नाहीत, तर ते साफ चुकीचं ठरु शकतं. आता तुम्ही रोज बॉटल स्वच्छ करुन भरत असाल असंही कारण दिलंत तरीही पाण्याच्या बॉटलमध्ये बॅक्टेरिया राहतातचं. पाण्याच्या बॉटल्सच्या झाकणामध्ये स्वयंपाकातील भांड्याच्या सिंकपेक्षा दुप्पट जिवाणू असल्याचे संशोधनातून आढळून आले आहे.

यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल ?
बॉटल वापरण्यापूर्वी वारंवार धुवून घ्या
धुतल्यानंतर ती उन्हात ठेवा
बॉटलला येणारा वास जाईल यासाठी उपाययोजना करा
दिवसातून एकदा तरी बॉटल साबण आणि गरम पाण्याने सॅनेटाईज करा
काचेच्या आणि प्लास्टिकच्या बॉटल लिंबानी आणि मिठानी धुवा
धुतलेली बॉटल उन्हामध्ये सुकवावी त्यामुळे या बॉटल मधील जिवाणू नष्ट होण्यास मदत मिळते
काचेची बॉटल ही सर्वात सुरक्षित आहेमात्र ती सोबत बाळगताना एखाद्या वेळेस फुटण्याचा धोका असतो
तर जी प्लास्टिक किंवा स्टीलची बॉटल सोबत बाळगाल ती तोंडाला लावून कधीही पाणी पिऊ नये
हलक्या दर्जाच्या प्लास्टिकची बॉटल कधीही वापरू नका

फ्रीजमधील पाण्याच्या बॉटल्सही हानिकारक ठरू शकतात. या जिवाणूमुळे होणाऱ्या आजारांमुळे शरीरावर काही परिणाम होता.रक्तदाब कमी जास्त होण्याचा धोका असतो हृदयविकार जडण्याची शक्यता असते.

हे बॅक्टेरिया बॉटल्समध्ये कशाप्रकारे जातात ते जाणून घेऊया
जेवताना उष्ट्या हाताने बॉटलला स्पर्श केल्याने, तोंडाला बॉटल लावून पिल्यानं लाळ जाते, खोकला किंवा शिंक आल्यास त्याच हातात बॉटल घेतल्यानं, जास्त दिवस बॉटलमध्ये पाणी भरुन ठेवल्यानं, अस्वच्छ हातांनी बॉटलला स्पर्श केल्यानं हे बॅक्टेरिया बॉटल्समध्ये जाऊ शकतात. तेव्हा या सगळ्या गोष्टींची दक्षता घेऊन तुम्ही ही या होणाऱ्या आजारांपासून वाचू शकता.

Share This News

Related Post

सन पॉयझनिंग म्हणजे काय ? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

Posted by - April 1, 2023 0
सध्या विचित्र हवामान पसरले आहे सकाळी आणि संध्याकाळी थंडावा असतो तर दुपारच्या उन्हाने जिवाजी तगमग होते. दुपारच्या कडक उन्हात फिरल्यामुळे…
Sabudana

Sabudana : साबुदाणा खाणं खरंच आरोग्यासाठी फायदेशीर की घातक?

Posted by - July 25, 2023 0
साबुदाणा (Sabudana) हा भारतीयांमध्ये एक अतिशय लोकप्रिय आणि आवडीचा खाद्यपदार्थ आहे. विशेषत: भारतामध्ये उपवासाच्या वेळी हा पदार्थ खाल्ला जातो. तर…

#HEALTH WEALTH : मुलांनाही होऊ शकतात हृदयाशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

Posted by - March 9, 2023 0
आजच्या युगात मुलांना काही गंभीर आजार होऊ लागले आहेत. काही वर्षांपूर्वी हृदयाशी संबंधित आजार प्रामुख्याने वयोवृद्ध आणि वृद्धांमध्ये दिसून येत…

Weight Loss : वजन कमी करणं झालं इतक सोपं ; वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ ५ सोप्या टिप्स

Posted by - May 16, 2024 0
तुम्ही अशा जगात वावरता की, जिथे अनेक फिटनेस ट्रेंड येतात आणि जातात; पण निरोगी जीवनशैली जगणे हेच आपले अंतिम ध्येय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *