Ashadhi Ekadashi Upvas Recipe

Ashadhi Ekadashi Upvas Recipe : उपवासाला घरच्या घरी बनवा अशा प्रकारे कच्च्या केळ्याची टिक्की

308 0

रेसिपी : वारकरी,विठ्ठलभक्त ज्या सोहळ्याची, ज्या तिथीची अगदी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असतात, तो दिवस म्हणजे आषाढी एकादशी. यादिवशी अनेक वारकरी आपल्या लाडक्या विठूरायासाठी उपवास (Ashadhi Ekadashi Upvas Recipe) धरत असतात. उपवासानिमित्त साबुदाणाची खिचडी, साबुदाणाचे वडे, वरीचे तांदूळ अशाप्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपी आपल्या घरी तयार केल्या जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका रेसिपीबद्दल सांगणार आहोत. जी तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता. आज आपण उपवासासाठी लागणारी कच्च्या केळ्याची टिक्की कशी बनवायची हे सांगणार आहोत. चला तर त्याची रेसिपी जाणून घेऊया…..

#MARATHI RECIPE : तोच तोच वरण-भात खाऊन कंटाळा आलाय ? मसूर डाळी पासून बनवलेलं हे वरण नक्की ट्राय करा !

1. कच्च्या केळ्याची टिक्की बनण्यासाठी लागणारे साहित्य
कच्ची केळी (Banana) – 3
हिरव्या मिरच्या – 2
उकडलेला बटाटा (potato) – 1/4 कप
जिरे – 1 चमचा
मीठ – चवीनुसार
तळण्यासाठी तेल (Oil)- 1/2 कप
शिंगाड्याचे पीठ- 1/2 वाटी
तीळ – 1 वाटी

MARATHI RECIPE : पौष्टिक ‘मेथीचे पराठे’ बनवण्याची सोपी पद्धत

2. कच्च्या केळ्याची टिक्की बनण्यासाठीची कृती
कच्च्या केळीची टिक्की घरी बनवण्यासाठी सर्वप्रथम कच्ची केळी उकळून सोलून घ्या. यानंतर ते एका भांड्यात चांगले मॅश करा.
त्यानंतर हिरव्या मिरच्या, उकडलेला बटाटा मॅश करुन घ्या. तयार मॅश केलेली केळी देखील त्यात घालून मिश्रण एकजीव करा.
त्यानंतर यात मीठ, जिरे, शिंगाड्याचे पीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करा.
यानंतर कढईत तेल टाकून ती गॅसवर गरम होण्यासाठी ठेवा. आता भांड्यात ठेवलेले मिश्रण थोडेसे हातात घेऊन गोल टिक्की बनवा आणि प्लेटमध्ये ठेवा.
मिश्रणापासून बनवलेल्या या टिक्की एका भांड्यात ठेवा. त्यानंतर तयार टिक्कीला वरुन तीळ लावा व त्यानंतर तेलात लालसर होईपर्यंत तळून घ्या.
तेलात तळून घेतल्यावर टिक्कीची चव आणखी कुरकुरीत होईल. अशाप्रकारे एकदम सोप्या पद्धतीने तुमची कच्च्या केळीची टिक्की तयार होईल. ती तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता.

Share This News

Related Post

मधुमेहाच्या 43 टक्के रुग्णांना समजत नाही चव…!

Posted by - March 8, 2022 0
कानपूरच्या जीएसव्हिएम मेडिकल कॉलेजच्या एका संशोधनातून असे दिसून आले आहे की मधुमेहाच्या 43 टक्के रुग्णांना समजणे कठीण होते. लाइफस्टाइल सिंड्रोम…
Ashadhi Ekadashi 2023

Ashadhi Ekadashi 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब केली विठ्ठलाची शासकीय महापूजा

Posted by - June 29, 2023 0
पंढरपूर: आषाढी एकादशीच्या निमित्ताने (Ashadhi Ekadashi 2023) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब विठ्ठलाची शासकीय महापूजा केली (Ashadhi Ekadashi 2023) यावेळी…
Control Diabetes

Health Tips : मधुमेह होण्यापूर्वी ‘हे’ 6 अवयव देतात संकेत; चुकूनही करू नका दुर्लक्ष

Posted by - August 18, 2023 0
आजच्या काळात मधुमेह हा एक असा आजार झाला आहे, ज्यामुळे कोट्यवधी लोक त्रस्त आहेत. फक्त भारताची आकडेवारी पाहिली तर 10…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *