तुम्हीही चहाप्रेमी आहात ? थांबा… ही माहिती अवश्य वाचा, अति चहा प्यायल्याने होणारे दुष्परिणाम !

370 0

चहा म्हणजे भारतीय लोकांचे सर्वात आवडीचे पेय …. खूप कमी लोक असे आहेत ज्यांना चहा आवडत नाही किंवा चहा ऐवजी ते कॉफी पिणं जास्त पसंत करतात. पण तरीही चहाप्रेमीच भारतामध्ये तुम्हाला जास्त सापडतील. पण प्रत्येक पदार्थाचा जसा शरीराला उपयोग होत असतो, तसाच कुठेतरी दुष्परिणाम देखील शरीराला भोगावा लागत असतो. अर्थात त्या कोणत्याही पदार्थाचे अतिसेवन किंवा व्यसन हे वाईटच …

See the source image

चहा प्रेमींचे सुद्धा प्रकार आहेत. काही जणांना सकाळी उठल्या उठल्या आधी चहाच लागतो. काही जणांना दिवसातून दोन वेळा तरी चहा लागतो. तर काहीजण असेही आहेत ,की जे दिवसभरातून अनेक वेळा तल्लफ होते म्हणून चहा पीत असतात. पण कोणत्याही गोष्टीचे व्यसन हे शरीरासाठी घातकच. तर आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत की, चहाच्या अति सेवनामुळे शरीराला नक्की काय परिणाम भोगावे लागतात.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे काही लोक हे सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा असाच चहा पितात… चहाने तरतरी येते हे नक्की पण लक्षात ठेवा सकाळी उठल्या उठल्या उपाशीपोटी चहा घेऊ नका. कमीत कमी त्या चहासोबत एखादी पोळी ,टोस्ट ,बिस्किट तरी आवर्जून खा. त्याहूनही चांगले म्हणजे सकाळी आधी भरपेट नाश्ता कराच.

उपाशीपोटी चहा प्यायल्याने मोठ्या प्रमाणावर ऍसिडिटी होण्याची समस्या वाढू लागते.

See the source image

सातत्याने चहा पिणाऱ्यांसाठी चहा हा खूप घातक ठरू शकतो ,यामुळे पोटासंबंधीचे मोठे आजार, हृदय विकार ,अनिद्रा असे आजार संभवू शकतात.

See the source image

जेवणानंतर जे लोक चहा पितात त्यांच्या शरीरामध्ये आयर्नची कमी भासू लागते. शरीराला जर आयर्नची कमी भासू लागली तर ऍनिमिया, सातत्याने थकवा येणे असे आजार संभवतात.

See the source image

सर्वात महत्त्वाचे म्हणजे सातत्याने चहा प्यायल्याने लठ्ठपणा ,शुगर ,हाय बीपी ,उष्णतेचे आजार मोठ्या प्रमाणावर होऊ शकतात.

See the source image

त्यामुळे जर तुम्ही अति प्रमाणावर चहा पीत असाल तर स्वतःच्या शरीरासाठीच मनावर नियंत्रण मिळवा. शरीराला तरतरी येण्यासाठी चहा पीत असाल तर शरीराला मरगळ आणणारा देखील चहाच आहे ही गोष्ट देखील लक्षात घ्या.

Share This News

Related Post

Ganpati Decoration

Ganpati Decoration : बाप्पासाठी कायपण ! बंगळुरूमध्ये 2 कोटींच्या नोटा आणि 50 लाखांची नाणी वापरून केली गणपतीची सजावट

Posted by - September 19, 2023 0
बाप्पाच्या आगमनाचा उत्साह आणि जल्लोष आज सर्वत्र दिसून येत आहे. सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. बाप्पाच्या सजावटीत (Ganpati Decoration) सगळ्यात…

इन्फ्लुएंझाची लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार करून घ्यावेत; सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे आवाहन

Posted by - March 16, 2023 0
मुंबई : राज्यात इन्फलुएंझा आजाराबाबत सतर्क राहण्याच्या सूचना सर्व जिल्हयातील आरोग्य यंत्रणांना देण्यात आलेल्या असून राज्यस्तरावरून नियमितपणे सनियंत्रण करण्यात येत…

पंढरीच्या वारीला वारकरी महिला डोक्यावर तुळशी वृंदावन घेवून का जातात ? जाणून घ्या

Posted by - July 9, 2022 0
आषाढी एकादशीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपुरात दाखल झाले आहेत. वारकरी संप्रदायासाठी पंढरपूर माहेरघर आहे. वारकरी विठ्ठल-रखुमाईला…
Clove

Clove : पोटाची समस्या असेल तर लवंग ठरत आहे गुणकारी

Posted by - November 3, 2023 0
लवंग (Clove) हा सर्वसाधारण मसाल्याचा पदार्थ. हा पदार्थ जवळपास सर्वच जेवणात वापरला जातो. बिर्याणी किंवा कोणताही पदार्थ बनवताना तो स्वादिष्ट…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *