Hairfall

Hair Oil : पावसाळ्यात केसगळतीमुळे त्रस्त आहात, ‘हे’ घरगुती तेल ट्राय करा समस्या होईल दूर

356 0

पावसाळ्यात आरोग्यासंबंधित आपल्याला अनेक समस्या उद्भवतात. पावसाळ्यात दमट वातावरणामुळे इन्फेक्शन आणि आजारांचा धोका जास्त असतो. यासोबत केसांच्या (Hair Oil) समस्याही मोठ्या प्रमाणात जाणवतात. पावसाळ्यात केस गळणे (Hair Oil) आणि तुटणे या त्रासाला सगळेचजण वैतागतात. तुम्हीही केस तुटणे आणि केस गळती यासारख्या समस्यांनी त्रस्त असाल तर, यापासून आराम मिळवण्यासाठी बाजारात उपलब्ध वेगवेगळ्या प्रकारच्या केसांच्या तेल आणि प्रोडक्ट उपलब्ध आहेत. अशा वेळी तुम्ही घरच्या घरी तेल तयार करुन केसांच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता. आता हे तेल कसे बनवायचे चला पाहूया….

भृंगराज कडुनिंब तेल (साहित्य)
1 कप नारळाचं तेल
2 कप तीळ तेल
1/2 कप एरंडेल तेल
4 चमचे ब्राह्मी पावडर
3 चमचे भृंगराज पावडर
7 ते 8 कडुलिंबाची पाने ठेचून
7 ते 8 कढीपत्ता पाने ठेचून किंवा चूर्ण
1 टीस्पून मेथी दाणे
2 चमचे आवळा पावडर
4 जास्वंदाची फुले
2 दोन चमचे मेथी दाणे

तेल कसे तयार करावे (कृती)
तेल बनवण्यासाठी सर्वात आधी जाड तळ असलेली कढई घ्या आणि गॅसवर ठेवा. यासाठी लोखंडी कढई घेतल्यास अधिक फायदेशीर ठरेल.
आता यात खोबरेल तेल, तिळाचे तेल, एरंडेल तेल घालून थोडा कोमट होऊ द्या. आता यामध्ये मेथी दाणे घाला.
त्यानंतर इतर सर्व साहित्य एक-एक करून तेलात टाका.
मंद आचेवर हे तेल 10 मिनिटे ठेवा.
तेलाचा रंग बदलल्यावर गॅस बंद करा.
आता हे तेल गाळून काचेच्या बाटलीत ठेवा.
केसांच्या समस्येवर रामबाण उपाय असणारं घरगुती केसांचे तेल तयार आहे.

‘हे’ तेल कशा पद्धतीने वापरावे
हे तेल वापरण्याआधी डबल बॉयलर पद्धतीने कोमट करा आणि त्यानंतर केसांना लावा. किमान पाच मिनिटे केसांना हलक्या हाताने मालिश करा. त्यानंतर किमान 45 मिनिटे ते एक तास हे तेल केसांना लावून ठेवा. यानंतर तुम्हील शॅमपूने केसं धुवू शकता. तुम्ही हे तेल रात्री केसांना लावून रात्रभर ठेवू शकता, त्यानंतर सकाळी उठल्यावर शॅम्पूने केस धुवा.

(वरील सर्व माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आम्ही याला कोणताही दुजोरा देत नाही. वरील कोणताही उपाय करण्याच्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

Share This News

Related Post

Bath In Bathroom

Health Tips : बाथरूममधील ‘या’ 5 गोष्टी आरोग्यासाठी ठरू शकतात घातक

Posted by - July 17, 2023 0
बाथरूममध्ये वापरल्या जाणार्‍या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष दिले पाहिजे. कधी कधी या गोष्टी (Health Tips) आपल्यासाठी घातक ठरतात. त्यामुळे या…
Monsoon News

IMD Monsoon Update : महाराष्ट्रावर दुहेरी संकट; हवामान खात्याने वर्तवला धडकी भरवणारा अंदाज

Posted by - June 11, 2024 0
मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनची (IMD Monsoon Update) दमदार वाटचाल सुरू आहे, मान्सूननं सोमवारपर्यंत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भाग व्यापला…

HEALTH WEALTH : हिवाळ्यात करू नका ‘या’ चुका; अन्यथा, त्वचेवर होईल वाईट परिणाम

Posted by - December 20, 2022 0
हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडणे, ओठ फाटणे, शरीराला खाज येणे, चेहरा काळवंडणे अशा समस्या हमखास जाणवतात. ऋतुमानानुसार त्यात पुन्हा फरक पडतो.…
Hair Beauty

ओल्या केसांवर कधीही गुंडाळू नका टॉवेल! नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

Posted by - June 15, 2023 0
अनेक महिलांना केस धुतल्यानंतर ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळण्याची सवय असते. पण केस धुतल्यानंतर लगेच त्यावर टॉवेल गुंडाळल्याने तुम्हाला कोंडा किंवा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *