लेझर फेशियल करायचेय ? मग नक्की वाचा

212 0

असे म्हणतात की, आपला चेहरा ही आपली ओळख असतो. आणि या चेहऱ्यावर जर आत्मविश्वास असेल तर कुठलेही काम अगदी सोपे होऊ शकते. असा तुमचा चेहरा जर अजून चमकदार बनवायचा असेल तर तुम्ही लेझर फेशियल ट्रिटमेंटचा उपयोग नक्की करू शकता.चला तर जाणून घेऊया लेझर फेशियल म्हणजे नेमकं काय.

सध्याच्या धावत्या युगात स्वतःकडे वेळ द्यायला ‘वेळ’ मिळत नाही. बाहेरच्या धूळ ,माती आणि प्रदूषणाचा परिणाम हा चेहऱ्यावर होतो व चेहऱ्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यासाठी आपण पार्लर मध्ये जातो. पण त्याचा परिणाम जास्त काळ टिकत नाही.त्यासाठी आता ट्रेण्डमध्ये असलेली लेझर फेशियलचा उपयोग जास्त प्रमाणात होत आहे.लेझर फेशियल हे बाकी फेशियल (ट्रीटमेंट) च्या तुलनेत दिर्घ काळ टिकून राहते.आजकाल सेलेब्रिटी पासून महिला व पुरुषही सर्रास हे फेशियल करताना दिसत आहेत. हे फेशियल साधारणतः 15 मिनिटांचे असते. हे dermatologist किंवा प्लॅस्टिक सर्जन यांच्याकडून करून घेणे आवश्यक आहे. हे फेशियल केल्यानंतर लालसर चट्टे चेहऱ्यावर येऊ शकतात पण त्यामध्ये घाबरण्याचे काही कारण नाही.काही काळानंतर हे चट्टे नाहीसे होतात.या फेशियलचा उपयोग कोणीही घेऊ शकतात पण ज्या लोकांचा स्किन टोन डार्क असतो त्यांनी मात्र हे फेशियल टाळावे.

असे करतात लेझर फेशियल

सर्वप्रथम चेहरा मीठच्या पाण्याने धुतला जातो व त्यावर बर्फाचे खडे ठेवले जातात. त्यामुळे चेहऱ्यावरील स्किन पोर्स ओपन होतात.चेहऱ्याचे तापमान सामान्य ठेवण्यासाठी त्यावर जेल लावण्यात येत .त्यानंतर चेहऱ्यावर कमी वेळासाठी लेझर शॉर्टस दिले जातात.त्यामुळे ट्रिटमेंट दरम्यान त्रास कमी होतो.

हे फेशियल केल्यानंतर घ्यायची काळजी

-या फेशियल नंतर त्वचा नाजूक झालेली असते त्यामुळे उन्हात जाणे टाळा,कारण सूर्याच्या किरणांपासून चेहऱ्याचा बचाव होऊ शकतो.

-त्वचेवर मॉइश्चरायझर लावावे त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होईल.

-शक्यतो काही तास घरात थांबावे.

-लेझर फेशियल साठी साधारण 10 हजार पासून लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.

Share This News

Related Post

#BEAUTY TIPS : मानेच्या काळेपणामुळे सौंदर्य कमी होत असेल तर या 5 घरगुती उपायांनी मिळेल सुटका

Posted by - March 20, 2023 0
सौंदर्य ही प्रत्येकाची इच्छा असते. मुलगा असो वा मुलगी प्रत्येकालाच आपल्या चेहऱ्याची खूप काळजी असते. आपला चेहरा नेहमी चमकावा आणि…

HEALTH WEALTH : हिवाळ्यात करू नका ‘या’ चुका; अन्यथा, त्वचेवर होईल वाईट परिणाम

Posted by - December 20, 2022 0
हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडणे, ओठ फाटणे, शरीराला खाज येणे, चेहरा काळवंडणे अशा समस्या हमखास जाणवतात. ऋतुमानानुसार त्यात पुन्हा फरक पडतो.…
Hairfall

Hair Oil : पावसाळ्यात केसगळतीमुळे त्रस्त आहात, ‘हे’ घरगुती तेल ट्राय करा समस्या होईल दूर

Posted by - August 12, 2023 0
पावसाळ्यात आरोग्यासंबंधित आपल्याला अनेक समस्या उद्भवतात. पावसाळ्यात दमट वातावरणामुळे इन्फेक्शन आणि आजारांचा धोका जास्त असतो. यासोबत केसांच्या (Hair Oil) समस्याही…
Cataracts

Cataracts : डोळ्यात मोतीबिंदू होऊ नये म्हणून आहारात ‘या’ 4 गोष्टींचा करा समावेश

Posted by - November 20, 2023 0
डोळ्यांचे आरोग्य हे खूप महत्त्वाचे आहे. याकडे कधीही दुर्लक्ष करु नये. कारण डोळ्यांना काही झाले तर व्यक्तीला दैनदिन जीवनात अडचणीचा…

SKIN CARE : कोरियन मुलींसारखी चमकदार नितळ त्वचेसाठी ट्राय करा ‘हा’ घरगुती फेसपॅक

Posted by - January 17, 2023 0
SKIN CARE : नितळ स्वच्छ आणि चमकदार त्वचा असावी असं प्रत्येक मुलीचे स्वप्नच असतं आपण बऱ्याच वेळा पाहिला असेल की…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *