नोकरदार आणि गृहिणींसाठी खास BEAUTY TIPS

299 0

नोकरदार आणि गृहिणींसाठी खास ब्युटी टिप्स असं म्हणण्याचं कारण , या महिला खरंतर तारेवरची कसरत करत असतात. घरातल्यांच्या पोटापासून ते मनापर्यंत प्रत्येक गोष्ट या जाणून असतात . अशावेळी घरातील प्रत्येकाच्या आरोग्याची , आर्थिक गरजांची , घरातील प्रत्येक व्यक्तीच्या बारीक-सारीक सामानापासून किराण्याच्या अशा अनेक गोष्टींची काळजी गृहिणींना असतेच . अशातच घर सांभाळून नोकरी करणाऱ्या महिलांचा ताण खूपच जास्त वाढतो आहे.

अशावेळी अनेकींना स्वतःला आरशात पाहणं देखील दूरच राहिला आहे . मग जेव्हा सणवार येतात एखादी पार्टी ठरते अशावेळी सर्वच जण छान तयार होतात . पण नेमकं यांच्यात खांद्यावर असलेल्या जबाबदाऱ्यांचा ताण यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो . यासाठीच आज मी तुम्हाला काही अशा ब्युटी टिप्स देणार आहे, ज्या तुम्हाला घरातली काम करतानाच करता येणार आहेत.

१. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुरेशी झोप घ्याच . रात्री दोन कामं कमी करून वेळेत झोपा . प्रत्येक काम रोजच पूर्ण झालंच पाहिजे हा अट्टाहास टाळा.

२. एकंदरीत कोणत्याही गृहिणीचे वय पाहता तिला सात ते आठ तासाची झोप अत्यावश्यक आहे. सामान्यतः वय वर्ष 18 ते वय वर्ष 60 या वयोगटातील स्त्री आणि पुरुष यांना सात ते आठ तास झोप घेणे गरजेचे आहे.

३. तुमची झोप जर पूर्ण झाली तर बऱ्याच समस्या सुटतील . हा प्रयोग अवश्य करून पहा आणि त्यासह आणखीन एक गोष्ट करा . झोपताना मोबाईल समोर न ठेवता कापसाच्या दोन पट्ट्या थंडगार दुधामध्ये भिजवून किंवा एलोवेरा जेल आणि रोज वॉटर एकत्र करून त्यात या कापसाच्या पट्ट्या भिजवून डोळ्यावर ठेवा. त्याने तुम्हाला लवकर झोपही लागेल डोळ्यांची आग होणार नाही . आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोळ्यांनी खालची वर्तुळ अगदी आठ दिवसात कमी दिसायला लागतील.

४. दिवसातून तीन वेळा चांगल्या फेसवॉशने स्वच्छ चेहरा धुवून कोरडा करा . त्यासाठी तुम्हाला कोणते फेस वॉश सूट होते हे तपासा. रात्री झोपताना चेहरा आवश्य स्वच्छ धुवाच

५. आठवड्यातून कमीत कमी २ वेळा तरी मुलतानी माती रोज वॉटर मध्ये कालवून चेहऱ्यावर १५ मी तरी ठेवा. काम करताना लावून ठेवली तरी चालेल.

६. भरपूर पाणी प्या . त्यासह वेगवेगळी सरबते करुनठेऊं शकता या मध्ये कोकम , लिंबू सरबत , आवळा सरबत , खस शरबत , कोरफट सरबत , त्यासह ताक , दही यांचे सेवन देखील शरीराला थंडावा देण्यासाठी , सी व्हिटॅमिन साठी उपयुक्त आहेत .

७. रोज रात्री बदाम भिजवा आणि संपूर्ण ककुटुंबासह तुम्हीही खा

८. ३ महिन्यातून १ वेळा तरी स्वतःसाठी वेळ काढून पार्लर ला जा . योग्य फेशियल चेहऱ्याच्या स्वच्छतेसाठी उपयोगी ठरेल . अचानक एखाद्या कार्यक्रमासाठी ऐनवेळी पार्लर ला जाण्याने लगेच रेसुलत मिळत नाही.

९. ऑनलाईन योग , किंवा झुंबा करू शकता त्यामुळे तुमचे शरीर तर फिट राहिलच . त्यासह मन देखील ताजेतवाने होईल.

Share This News

Related Post

तुमचा मनस्ताप वाढवणाऱ्या लोकांना कसे हँडल करावे ? फक्त फॉलो करा ‘या’ पाच टिप्स

Posted by - January 14, 2023 0
असं कोणी नसतच ज्याच्या आयुष्यात मनस्ताप वाढवणार नाही. असे लोक नसतात पण बऱ्याच वेळा असं होतं की यातल्या अनेक लोकांपासून…
Goat Milk

Goat Milk : गाईच्या दुधापेक्षा जास्त फायदेशीर आहे बकरीचं दूध; जाणून घ्या फायदे

Posted by - August 1, 2023 0
आरोग्यासाठी अनेक जण गाईचं दूध पितात. पण तुम्हाला माहित आहे की गाई आणि म्हशीच्या दूधापेक्षा बकरीचं दूध (Goat Milk) आरोग्यासाठी…
Skin Care

Skin Care: तुमच्या कपाळाच्या काळेपणामुळे हैराण आहात? तर ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय

Posted by - December 6, 2023 0
आजकाल क्लीन आणि चमकदार त्वचा (Skin Care) प्रत्येकाला हवी असते. पण आजच्या काळात असे खूप कमी लोक असतात ज्यांना अशी…

सन पॉयझनिंग म्हणजे काय ? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

Posted by - April 1, 2023 0
सध्या विचित्र हवामान पसरले आहे सकाळी आणि संध्याकाळी थंडावा असतो तर दुपारच्या उन्हाने जिवाजी तगमग होते. दुपारच्या कडक उन्हात फिरल्यामुळे…
Ear Tips

Ear Tips : तुम्ही कॉटन बड्सने कान साफ करता का? ‘हे’ आहेत त्याचे दुष्परिणाम

Posted by - July 27, 2023 0
आपल्या 5 ज्ञानेंद्रियामध्ये कान (Ear Tips) हे एक महत्वाचे ज्ञानेंद्रिय आहे. पाणी, हवा, धूळ किंवा माती यामुळे कानात (Ear Tips)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *