Skin Tips

Skin : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल ?

320 0

उन्हाळा म्हटला की, परीक्षा, सुट्टी, निवांत दुपारच्या गप्पा आणि भरपूर सूर्यप्रकाश असं समीकरण आपल्या मनात घट्ट बसलेलं आहे, मात्र गेल्या काही वर्षात सूर्यप्रकाशाचा दाह वाढायला लागला असून उन्हाळ्यात आग ओकणाऱ्या सुर्यामुळे आपल्या त्वचेचे कायमस्वरुपी नुकसान होण्याची भीती असते. याला फोटो एजिंग असंही म्हणतात.

यामुळे त्वचेचा रापलेपणा किंवा त्यावर उठणारे डाग थांबवणं शक्य होतं. यासाठी फार पैसा खर्च न होता करता येतील असे उपाय
1. शरीरातील पाण्याची पातळी
त्वचा तजेलदार दिसण्यासाठी महत्त्वाची बाब असते ती म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी. उन्हाळ्यामध्ये शरीराला असलेली पाण्याची गरज ही दीडपटीने वाढते. त्यामुळे आपण एरवी 2 लिटर पाणी पीत असू तर उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराची गरज ही 3 ते 4 लिटर इतकी असते. शरीराला असलेली पाण्याची ही गरज फळांच्या रसाने किंवा शीतपेयांनी भागवली जाऊ शकत नाही.

2. उन्हापासून बचाव करणे
कडक ऊन असताना बाहेर पडण्यापूर्वी मोठी टोपी, छत्री किंवा गॉगल घालणं अत्यावश्यक आहे. खासकरून सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत बाहेर पडणार असाल तर ही काळजी तुम्ही घ्यायलाच हवी.घराबाहेर पडल्यानंतर 30 पेक्षा अधिक एसपीएफ (Sun Protection Factor) असलेले सनस्क्रीन दर दोन तासांनी लावणे गरजेचे आहे. घरात असतानाही हा मार्ग अवलंबला तर उत्तम आहे. सनस्क्रीनचा वापर 2 वर्षांपेक्षा मोठ्या व्यक्ती करू शकतात.

3. त्वचेचा पोत ओळखून त्वचेची काळजी घेणे
एका अभ्यासातून असं दिसून आलं आहे की 88 टक्के लोक हे त्यांच्या त्वचेसाठी उचित नसली तरी उत्पादने वापरत असतात. सगळ्यांच्या वापरासाठी योग्य असतील अशी उत्पादने फार कमी असतात. त्यामुळे आपली त्वचा कशी आहे हे ओळखून तशी उत्पादने वापरणे गरजेचे असते.

4. त्वचेची स्वच्छता आणि पोषण
उन्हाळ्यामध्ये चेहरा सॅलिसिलीक अ‍ॅसिडच्या मदतीने दिवसातून दोनवेळा धुवावा. चेहरा, मान आणि छातीजवळची त्वचा ही नाजूक असते. अल्कलाईनचे प्रमाण जास्त असलेल्या साबणाने या भागाची त्वचा धुणे टाळावे.

उन्हाळ्यामध्ये अनेकजण आणखी एक चूक अनेकजण करतात, ती म्हणजे मॉईश्चरायझरचा वापर टाळतात. थंडीप्रमाणेच उन्हाळ्यामध्येही त्वचेतील आर्द्रता राखणे गरजेचे असते. मॉईश्चरायझर किंवा स्निग्धता असलेली क्रीम वापरल्याने त्वचेची छिद्र काही काळ बुजतात ज्यामुळे त्वचा काळवंडण्याची समस्या रोखता येते. हायलुरोनिक अ‍ॅसिड असलेली जेलबेस्ड मॉईश्चरायझर किंवा कोरफडीचा वापर करून तयार केलेली मॉईश्चरायझर वापरणे उन्हाळ्यात फायदेशीर ठरते. स्क्रबचा वापर करून आठवड्यातून दोनवेळा त्वचा स्वच्छ केल्यास त्वचा पुन्हा तजेलदार होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Danve- Khaire Battle : अखेर ! दानवे- खैरेंची दिलजमाई; दानवे- खैरेंच्या वादाचं नेमकं कारण काय ?

Accident News : भरधाव कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

Lok Sabha Elections : हर्षवर्धन जाधव पुन्हा छ. संभाजीनगरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

Sanjay Shirsat : संकटमोचकांनी शेपटीला चिंधी बांधून महायुतीत व्यत्यय आणू नये; शिरसाटांची महाजनांवर टीका

Yavatmal News : उष्णतेमुळे कोळसा डेपोला भीषण आग; 10 हजार टन कोळशाची झाली राख

Weather Update : महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाने ‘या’ जिल्ह्यांना दिला हाय अलर्ट

Clove Side Effects : ‘या’ लोकांनी उन्हाळ्यात चुकूनही करू नये लवंगाचे सेवन; होतील ‘हे’ दुष्परिणाम

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मिळाला दिलासा ! दानवे, खैरेंचं अखेर झालं मनोमिलन

Bank Fraud : राज्यातील ‘या’ बँकेतील घोटाळा उघड; ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Crime : पुण्यात देशी दारूच्या दुकानात तुफान राडा; ‘त्या’ व्यक्तीने वेधले सगळ्यांचे लक्ष

Share This News

Related Post

Back Pain

Health Tips : पाठदुखीच्या समस्येने तुम्ही त्रस्त आहात? ‘या’ 6 गोष्टींचा आहारात समावेश केल्याने पाठदुखी होईल दूर

Posted by - August 30, 2023 0
पाठदुखी ही आजकाल एक सामान्य समस्या (Health Tips) बनली आहे. आजकाल बहुतेक लोकांना पाठदुखीची (Health Tips) समस्या भेडसावत आहे. तासन्तास…
lemon leaves

Lemon Leaves : फक्त लिंबूचं नाहीतर त्याची पाने देखील असतात फायदेशीर

Posted by - August 18, 2023 0
लिंबाच्या पानांमध्ये (Lemon Leaves) अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ज्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. आपण दैनंदिन जीवनात जेवढा वापर लिंबूचा…
Control Diabetes

Health Tips : मधुमेह होण्यापूर्वी ‘हे’ 6 अवयव देतात संकेत; चुकूनही करू नका दुर्लक्ष

Posted by - August 18, 2023 0
आजच्या काळात मधुमेह हा एक असा आजार झाला आहे, ज्यामुळे कोट्यवधी लोक त्रस्त आहेत. फक्त भारताची आकडेवारी पाहिली तर 10…
Health Tips

Health Tips : चुकूनही ‘ही’ पाच फळं खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका; नाहीतर भोगावे लागतील ‘हे’ परिणाम

Posted by - August 25, 2023 0
फळे खाण्याचे शरिराला असंख्य फायदे (Health Tips) आहेत. फळांत व्हिटॅमिन, मिनरल्स, फायबर, कॅल्शियम आयरन सारखे पोषक तत्वे असतात. हे सर्व…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *