#BEAUTY TIPS : डोळ्याखालची काळी वर्तुळ अवघ्या आठ दिवसात जातील; करा फक्त हा घरगुती उपाय

990 0

आजच्या स्किन केअर टिपमध्ये आपण पाहणार आहोत डोळ्याखालची काळी वर्तुळ कमी करण्यासाठी घरगुती उपाय काय करावे. डोळे हा शरीराचा अत्यंत नाजूक अवयव आहे त्यामुळे डोळ्यांनी खालची त्वचा आणि त्यासाठी काही घरगुती उपाय आपण असे पाहणार आहोत ते करताना वैद्यकीय सल्ला अवश्य घ्या

दिवसभरातून कमीत कमी तीन ते चार वेळा थंड पाण्याचे शिपके डोळ्यांना मारावेत. डोळे स्वच्छ ठेवा. सातत्याने डोळ्यांना हात लावणे टाळा.

रात्री झोपताना रोज कापसाच्या पट्ट्या गुलाब पाणी, एलोवेरा जेल मिक्स करून डोळ्यांवर ठेवायचे आहेत. गुलाब पाणी आणि एलोवेरा जेल फ्रीजमध्येच ठेवा म्हणजे आणखी छान थंडावा मिळेल. हे रोजच करा म्हणजे दिवसभराचा थकवा देखील कमी होतो.

दुसरा उपाय आहे तो म्हणजे सहाणेवर बदाम आणि निरस दूध गरजेनुसार घेऊन उगाळणे. आणि ते डोळ्याच्या खाली पंधरा मिनिटे लावून ठेवणे. यामुळे अगदी आठ दिवसांमध्ये तुम्हाला खूप फरक दिसून येईल.

तिसरा उपाय आहे तो म्हणजे बदामाचं शुद्ध तेल . हे तुम्हाला बाजारात मिळेल. या बदामाच्या तेलाने संपूर्ण चेहऱ्यालाच मसाज करा. आंघोळीपूर्वी हा मसाज केला तर उत्तम, चेहऱ्यावर तेल ठेवायचे नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे चेहरा लगेच धुवायचा आहे. बदामाच्या तेलाने मसाज करताना गोलाकार चेहऱ्यावर मसाज करा. डोळ्यांवर मसाज करताना करंगळीच्या शेजारच्या बोटाने अलगद डोळ्याभोवती गोलाकार मसाज करायचा आहे. हा उपाय आठवड्यातून तीन ते चार वेळा करू शकता. याचा देखील संपूर्ण चेहऱ्यावरच खूप चांगला फायदा दिसून येईल.

Share This News

Related Post

दिलासादायक! पुणे कॅन्टोन्मेंट हद्दीत आता वाहन शुल्क माफ

Posted by - April 14, 2023 0
पुणे कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत एन्ट्री करण्यासाठी वाहन टॅक्सची वसुली आता बंद करण्यात आली आहे. दि १३ एप्रिल (मंगळवार) रोजी रात्री १२…

रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’ या सिनेमाचा टीझर प्रदर्शित, पाहा व्हिडिओ

Posted by - February 12, 2022 0
रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’ या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. यासोबतच या चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. चित्रपटाच्या…

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरावर ईडीचा छापा

Posted by - June 6, 2022 0
४ ऑगस्ट २०१७ रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात सत्येंद्र जैन यांनी हवालाद्वारे ४.८१ कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जैन…

लता दीदींच्या जयंती दिनी 28 सप्टेंबरला संगीत महाविद्यालय सुरू करावे ; आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

Posted by - August 16, 2022 0
मुंबई : भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू करण्यात येणारे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय हे त्यांच्या जयंती दिनी २८ सप्टेंबर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *