पुणे : जेव्हा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील बनतात शाळेचे शिक्षक; विद्यार्थिनींना दिले स्वच्छतेचे धडे !

193 0

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे नेहमीच लहान मुलांमध्ये रमून जातात. लहान मुलांशी संवाद साधताना, ते अतिशय आनंदी होतात. आजही त्यांचे एक वेगळे रुप सर्वांना पाहायला मिळाले. आज त्यांनी चक्क शाळेच्या शिक्षकाच्या भूमिकेतून विद्यार्थिनींना स्वच्छतेचे धडे दिले. तसेच सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून सर्व विद्यार्थिनींचे पालकत्व स्वीकारले. तसेच एक पालक असलेल्या विद्यार्थिनींचे शैक्षणिक पालकत्व स्विकारण्याची घोषणा केली.

कोथरूड मधील कर्वेनगर भागातील जिव्हाळा फाऊंडेशन संचालित अनुराधा पूर्व माध्यमिक शाळा आणि स्व. सुरेश मुठे मुलींचे वसतिगृह सुमन बालसंस्कार केंद्राला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. पुण्याच्या ग्रामीण भागातील या शाळेत भटक्या विमुक्त जाती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतात. तसेच या सर्व मुलीं शाळेच्या वसतिगृहात राहतात.

या शाळेला भेट दिल्यानंतर सर्वप्रथम मुलींनी ‘गुड मॉर्निंग’ म्हणत माननीय चंद्रकांतदादा पाटील यांचे स्वागत केले. यावर माननीय दादांनी गुड मॉर्निंगला मराठीत काय म्हणतात असा प्रश्न केला. त्यावर विद्यार्थ्यांनींना काही सांगणे शक्य झाले नाही, त्यामुळे प्रेमाने गुड मॉर्निंगच्या ऐवजी ‘सुप्रभात’ शब्द वापरत असल्याचे सांगितले. आणि सर्वांना चॉकलेट वाटप केले.

त्यानंतर माननीय दादांनी “माझ्याशी कोण बोलणार?” असे विचारताच, राजनंदनी नरेंद्रसिंह घोरपडे, रेखा भीमा शेट्टी आणि आरोही अविनाश तुपेकर या तीन मुले पुढे आल्या. माननीय दादांनी या तिन्ही मुलींची आत्मियतेने विचारपूस केली. तसेच मोठी झाल्यावर काय होणार? असा प्रश्न विचारला. दादांच्या या प्रश्नानंतर या तिन्ही मुलींनी आपल्या भावना व्यक्त करताना डॉक्टर, पोलीस अधिकारी, शिक्षिका असे सांगितले. त्यानंतर दादांनी ही तिघींचे आनंदाने कौतुक केले.

यानंतर माननीय दादांनी सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या स्वच्छ भारतच्या संकल्पाविषयी सर्व विद्यार्थिनींना सविस्तर माहिती दिली.‌ तसेच, “मी आता दिलेले चॉकलेटचा कागद खाली कुठेही न टाकता, कचरा पेटीतच टाकावा,” असे समजावून सांगितले.

विद्यार्थिनींशी संवादानंतर जिव्हाळा फाऊंडेशनच्या संचालिका ॲड. शर्वरी मुठे आणि अनुराधा शाळेच्या शिक्षिका सोनिया मारणे, निलिमा वाडकर, सुजाता जोशी, विनया चौधरी, योगिनी शिंदे, मोनिका कदम, दादांनी संवाद साधून, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर शिक्षिकांना सुकन्या समृद्धी योजनेची माहिती देऊन, सर्व‌ विद्यार्थिनींचे सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून पालकत्व घेतले.

तसेच, संस्थेच्या शिक्षिकांनी पुण्यातील शाळांचे सर्वेक्षण करावे, आणि ज्या विद्यार्थिंनीच्या एका पालकाचे निधन झाले आहे, अशा एक पालक असलेल्या विद्यार्थिनींची माहिती संकलित करावी. या सर्व विद्यार्थिनींचे शैक्षणिक पालकत्व स्विकारण्याची घोषणा माननीय चंद्रकांतदादांनी यावेळी केली.

Share This News

Related Post

#ACIDENT : गुगल मॅपने चुकवला रस्ता ! सिंहगडावर फिरायला गेलेल्या तरुण तरुणीवर काळाचा घाला, अपघातात तरुणीचा मृत्यू

Posted by - February 2, 2023 0
पुणे : योग्य मार्ग माहित नसला की आपण सर्रास गुगल मॅपची मदत घेत असतो. पण सिंहगडावर फिरायला गेलेल्या तरुण तरुणीवर…

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या तीन दिवसीय 12 व्या भारतीय छात्र संसदेचा आज समारोप

Posted by - September 17, 2022 0
पुणे: समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहचविण्याबरोबरच देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी आणण्यासाठी युवकांनी सहभाग वाढवावा. अशी अपेक्षा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र…

जनकल्याण रक्तपेढीच्या सेवानिधी (फंडरेझर) उपक्रमाचे उद्घाटन

Posted by - August 18, 2022 0
पुणे : जनकल्याण रक्तपेढीच्या सेवानिधी (फंडरेझर) या उपक्रमाचे उद्घाटन मा. श्री. सुधीरजी मेहता, ज्येष्ठ उद्योजक,यांचे हस्ते झाले. आधुनिक पद्धतीच्या सेवानिधी…

अनिल देशमुखांची मिरवणूक काढून राष्ट्रवादीकडून राजकीय संस्कृतीला काळीमा; भाजप आमदार माधुरी मिसाळ यांचा थेट आरोप

Posted by - December 29, 2022 0
पुणे : भ्रष्टाचारावर कठोर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार लोकायुक्त कायद्याचा मसुदा विधिमंडळात संमत करून घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *