Loksabha Election

Loksabha Election : शाई लावायचं बोट नसेल किंवा दोन्ही हात नसतील तर मतदानाची शाई कुठे लावतात?

1996 0

मुंबई : महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांसाठी (Loksabha Election) एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. आजपासून मतनदाला संपूर्ण देशात सुरुवात झाली आहे. आज राज्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या जागांवर मतदान पार पडत आहे. या निवडणूकीच्या काळात लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. पण बहुधा त्या प्रश्नांची उत्तरे आपल्या मिळत नाही किंवा आपण ती जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. आज आपण अशाच एका प्रश्नाबद्दल जाणून घेणार आहोत…

मतदान केल्यानंतर आपल्या बोटाच्या तर्जनीला शाई लावली जाते. पण समजा एखाद्या व्यक्तीला तर्जनी नसेल तर? अशा वेळी काय करायचं? मग अशी व्यक्ती मतदान करु शकणार नाही का? भारतीय निवडणूक आयोगाच्या पुस्तकात याबद्दल माहिती आहे. मतदान केंद्राध्यक्षांसाठी निदेशपुस्तक 2023 मध्ये याबद्दल माहिती दिली आहे. एवढंच नाही तर व्यक्तींना दोन्ही हात नसेल तर अशा परिस्थीतीत काय करावं याबद्दल देखील माहिती देण्यात आली आहे. या सगळ्या प्रश्नांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत…

या पुस्तकानुसार, जर मतदान करणाऱ्या व्यक्तीच्या डाव्या हातीची तर्जनी नसेल तर ही शाई त्या व्यक्तीच्या डाव्या हाताच्या कोणत्याही बोटाला लावता येते. पण जर त्या व्यक्तीच्या डाव्या हाताला बोटच नसेल तर अशावेळी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावायची असे या पुस्तकात म्हंटले आहे. पण जर उजव्या हाताला देखील कोणतंच बोट नसेल तर? अशावेळी काय करायचं किंवा व्यक्तीला दोन्ही हात नसतील तर? तर या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार दोन्ही हात नसतील तर कोणत्या ही हाताचं बाहेर आलेलं टोक असेल त्या भागाला शाई लावली जाते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांवर कारवाई होणार? ‘ते’ वक्तव्य भोवण्याची शक्यता

Weather Update : ‘या’ जिल्ह्यांमध्ये होणार वादळी पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Lok Sabha Election : देशातील पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात; 21 राज्य, 102 मतदारसंघ; कुठे होणार काँटे की टक्कर?

Pune Firing : पुणे पुन्हा हादरलं ! येरवडा परिसरात पहाटे गोळीबार

Share This News

Related Post

ST Corporation

ST Corporation : ST महामंडळाची पुन्हा निवडणूक लागणार? 12 संचालकांचा तडकाफडकी राजीनामा

Posted by - December 26, 2023 0
मुंबई : एसटी महामंडळाच्या (ST Corporation) स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये महाभूकंप झाला आहे. एसटी बँकेच्या 19 पैकी 12…
EPFO Interest

EPFO Interest : PF खात्यात पैसे कधी येणार? EPFO ने दिली ‘ही’ मोठी अपडेट

Posted by - August 7, 2023 0
कोट्यवधी नोकरदारांच्या पगाराचा काही भाग कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत म्हणजेच त्यांच्या PF खात्यात (EPFO Interest) जमा केला जातो. ईपीएफओ…

HEALTH WEALTH : शरीरात व्हिटॅमिन-A च्या कमतरतेमुळे दिसून येतात ‘ही’ लक्षणे, हे पदार्थ आहारात वाढवा

Posted by - February 23, 2023 0
HEALTH WEALTH : व्हिटॅमिन आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे, जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. यापैकी एक म्हणजे व्हिटॅमिन-ए, जे…

निवृत्ती वेतनधारकांनो ! आता घर बसल्या काढा हयातीचा दाखला

Posted by - November 15, 2022 0
पुणे : पुण्यातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सेवानिवृत्त झालेल्या पेन्शन धारकांना आता घरबसल्या हयातीचा दाखला तयार करता येणार आहे.…

चंद्रग्रहण 2022 : विज्ञान काय सांगते? इतिहास, ज्योतिष वाचा सविस्तर माहिती

Posted by - November 8, 2022 0
जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण ही एक पूर्णतः वैज्ञानिक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *