Aadhar Update

फ्रीमध्ये ऑनलाइन आधार अपडेटसाठी आज शेवटची संधी! उद्यापासून मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

546 0

नवी दिल्ली : मोफत आधार कार्ड अपडेट करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे जर तुम्ही आज आधार कार्ड अपडेट केले नाही तर तुम्हाला उद्यापासून अपडेट करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहे. आधार कार्ड हे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अपडेट करता येणार आहे. ऑनलाईन अपडेटसाठी आपण घरबसल्या करु शकतो. तर ऑफलाईन अपडेटसाठी ई-सेवा केंद्रात जावे लागते.

ऑफलाइन अपडेटसाठी आपल्याला आताही पैसे भरावे लागतात. फक्त ऑनलाइन आधार अपडेट मोफत ठेवण्यात आले होते. आज त्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उद्यापासून आता लोकांना अपडेटसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही 14 जून नंतर तुमचे आधार अपडेट केले तर तुम्हाला 50 रुपये अनिवार्य शुल्क भरावे लागेल. 15 मार्च ते 14 जून या कालावधीत UIDAI द्वारे ऑनलाइन आधार अपडेट मोफत ठेवण्यात आले होते.

आधार ऑनलाइन कसे अपडेट कराल?
1) सर्वात आधी आधारच्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा.
2) त्यानंतर वर myAadhaar हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
3) त्यानंतर तुम्हाला “Update Aadhar” विभागात जावे लागेल. यानंतर यूजरला आपला आधार क्रमांक आणि सुरक्षा कोड टाकावा लागेल.
4) त्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेल्या OTP च्या मदतीने लॉग इन करता येईल.
5) यानंतर पत्ता, फोन नंबर, नाव किंवा जन्मतारीख यांचा तपशील द्यावा लागेल.
6) मग अपडेट करायच्या डेटासंबधित इतर कागदपत्रांची हार्ड कॉपी अपलोड करावी लागेल.त्यानंतर कन्फर्म आणि सबमिट बटणावर क्लिक करा.अशा प्रकारे तुमचे ऑनलाइन आधार अपडेट होईल.

Share This News

Related Post

Nashik Dead

धक्कादायक ! विहिरीत पडून साडेचार वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 25, 2023 0
नाशिक : नाशिकमध्ये (Nashik) एक मन हेलावून टाकणारी दुर्दैवी घटना घडली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असलेल्या मोहाडी या ठिकाणी…

राज ठाकरे जिंदाबाद होते आणि जिंदाबाद राहतील – वसंत मोरे

Posted by - April 9, 2022 0
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवर भोंग्यांसदर्भात वक्तव्य केलं.त्या नंतर आपण आपल्या प्रभागात भोंगे लावणार नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर…

#HEALTH TIPS : झोपताना तुम्ही करताय का ‘या’ चुका ? आजच तपासा अन्यथा अनेक गंभीर आजारांना मिळते आमंत्रण

Posted by - March 27, 2023 0
झोप आपल्या आरोग्यासाठी आणि संपूर्ण आयुष्यासाठी खूप महत्त्वाची आहे, तरीही त्याकडे सर्वाधिक दुर्लक्ष केले जाते. जर एक रात्र पूर्ण झाली…

धक्कादायक : कोयता गॅंग मधील 7 अल्पवयीन मुलांची बाल निरीक्षण गृहात केली होती रवानगी; भिंतीला शिडी लावून असे झाले फरार

Posted by - January 31, 2023 0
पुणे : शहरातील कोयता गॅंग मधील सात अल्पवयीन मुलांची रवानगी येरवड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्राच्या बालनिरीक्षणगृहामध्ये करण्यात आली होती.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *