शिष्यवृत्ती परीक्षेची तात्पुरती उत्तरसूची संकेतस्थळावर प्रसिद्ध; आक्षेप नोंदवण्यासाठी २३ फेब्रुवारीपर्यंत मुदत

249 0

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १२ फेब्रुवारी २०२३ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ.५ वी) आणि पूर्व माध्यमिक (इ.८ वी) परीक्षेची इयत्तानिहाय व पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे, असे परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी कळविले आहे.

ही उत्तरसूची www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप परिषदेच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईनरित्या २३ फेब्रुवारी २०२३ पर्यंत नोंदवता येतील. ऑनलाईन निवदेन पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये नोंदवता येईल. मुदतीनंतर त्रुटी, आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही. ऑनलाईन निवेदनाशिवाय टपाल, समक्ष अथवा ईमेल आदी कोणत्याही प्रकारे नोंदवलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

ऑनलाईन निवेदनपत्रातील माहितीत दुरुस्ती करण्याची कार्यपद्धती
विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन निवेदनपत्रातील माहिती व शाळा माहिती प्रपत्रात विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, लिंग आदी दुरुस्ती करण्यासाठी २३ फेब्रुवारी २०२३ पर्यंत शाळांच्या लॉगीनमध्ये अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. अन्य कोणत्याही पद्धतीने तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असेही उपायुक्त श्री. राठोड यांनी कळविले आहे.

Share This News

Related Post

Indian Passport

Indian Passport: भारतात ‘या’ 3 रंगाचे पासपोर्ट वापरले जातात; जाणून घ्या प्रत्येक पासपोर्टचे महत्व

Posted by - July 5, 2023 0
मुंबई : आपल्या देशात पासपोर्ट (Indian Passport) हा एक महत्त्वाचा डॉक्यूमेंट मानला जातो. या पासपोर्ट (Indian Passport) शिवाय तुम्ही परदेशात…

महाराष्ट्रात विद्यापीठ खुल्या निवडणुका पुन्हा सुरू कराव्यात- अभाविपची मागणी 

Posted by - March 18, 2023 0
पुणे: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल दिनांक १७ मार्च २०२३ ला पुणे शहरात प्रवासासाठी आले. यावेळी, भारतातील…
Birds

पक्ष्यांचा थवा व्ही आकारातच का उडतो..? कारण ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Posted by - June 1, 2023 0
मुंबई : लहानपणी संध्याकाळ झाली आणि पक्ष्यांचा थवा आकाशात उडताना दिसला की एक आख्यायिका होती पक्षांची शाळा सुटली आणि पक्षी…

शिक्षक दिन विशेष : आज प्रत्येक क्षेत्रातील गिरुजनांचा आदरसत्कार करण्याचा दिवस …

Posted by - September 5, 2022 0
शिक्षक दिन विशेष : शिक्षक दिन हा शिक्षकांच्या कौतुकाचा एक विशेष दिवस आहे आणि एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील त्यांच्या विशेष योगदानाबद्दल…

सावित्रीबाई फुले यांची प्रतिकात्मक स्वरूपाची शाळा(व्हिडीओ)

Posted by - March 10, 2022 0
‘खामोशी से जब भर जाओगे, तभी थोडा चीख लेना, वरना मर जाओगे!’ स्त्रीमनातील काळानुकाळ झालेली घुसमट दूर करून त्यांना व्यक्त…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *