शिक्षणाची चळवळ आणि मोहीम मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे – रामदास आठवले

130 0

पुणे: दलीत बहुजन समाजाचा विकास साधायचा असेल तर सर्वप्रथम शिक्षणाची चळवळ आणि मोहीम झोपडपट्टी आणि दलीत वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणत राबवली पाहिजे आणि तेच महान कार्य महात्मा फुले ,सावित्रीबाई फुले, महर्षी शिंदे यांनी केले होते .आणि हा वारसा आज शेवाळे परिवार मोठ्या हिंमतीने आणि जिद्दीने चालवत असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले .

ते महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांनी 1852 ला देशात पहिली शाळा सुरू केली त्याला 170 वर्ष पूर्ण झाल्याने सावित्रीबाई फुले ग्रंथालय व ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते आणि डी.सी.एम संस्थेचे माजी अध्यक्ष एम.डी.शेवाळे यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरण आठवले यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते .

पुढे ते म्हणाले की ,एम.डी.शेवाळे यांनी फुले ,आणि महर्षी शिंदे यांचा शैक्षणिक वारसा चालवत होते .झोपडपट्टी आणि दलीत समाजाला सेवाभावी वृत्तीने शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी केले आहे .

या कार्यक्रमाचे आयोजन डिप्रेस्ड क्लासेस मशीन या संस्थेच्या वतीने करण्यात आले होते .यावेळी संस्थेचे सचिव विशाल शेवाळे ,अध्यक्ष डि. टी.रजपूत ,आमदार सुनील कांबळे,माजी नगरसेवक अविनाश बागवे ,अजय भोसले ,राष्ट्रवादी पक्षाचे शहाध्यक्ष प्रशांत जगताप तसेच विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This News

Related Post

Pune News

Pune News : पुणे हळहळलं ! 8 व्या मजल्यावरून पडणाऱ्या मुलीला वाचवताना बापाचाही दुर्दैवी अंत

Posted by - August 29, 2023 0
पुणे : पुण्यातून (Pune News) एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये (Pune News) 8 व्या मजल्यावरुन पडून…

धर्माबाबत असलेल्या भावनांचं प्रदर्शन नको – शरद पवार

Posted by - April 25, 2022 0
राष्ट्रपती राजवट लावण्याच्या टोकापर्यंत कुणीही जाणार नाही, असा विश्वास व्यक्त करतानाच प्रत्येकानं आपल्या धार्मिक भावना स्वतःपर्यंत मर्यादित ठेवाव्यात. धर्माबद्दल असलेल्या…

ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा झटका, परमबीर सिंह यांच्या विरोधात दाखल सर्व प्रकरणं CBI कडे वर्ग

Posted by - March 24, 2022 0
मुंबई- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात दाखल असलेली सर्व प्रकरण आता राज्य सरकारकडून सीबीआयकडे वर्ग करण्यात आली…

राज्यसभा खासदार उदयनराजे यांनी घेतली नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट

Posted by - July 24, 2022 0
नवी दिल्ली: भाजपाचे राज्यसभा खासदार उदयनराजे यांनी भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  यांची भेट घेत. राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करत…
Pune Video

Pune Video : पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत ! ग्राहकांच्या डोळ्यादेखत वाईन शॉप लुटले

Posted by - November 21, 2023 0
पुणे : पुण्यात (Pune Video) पुन्हा एकदा कोयता गॅंगचा थरार पाहायला मिळाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हातात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *