आजपासून पुन्हा शाळा सुरु, पालकांनी न घाबरता मुलांना शाळेत पाठवण्याचं आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

135 0

मुंबई- राज्यभरात आजपासून बालवाडी ते इयत्ता बारावी पर्यंतच्या शाळांची घंटा वाजणार आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढताना दिसत आहे. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र पालकांनी न घाबरता मुलांना शाळेत पाठवावे असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

चार दिवसांपूर्वी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन शाळा सुरु करण्या संधर्भात माहिती दिली होती. पहिली ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. शाळा सुरू करण्याच्या संदर्भात एसओपी (मार्गदर्शक सूचना) दिल्या आहेत त्याचे पालन करुनच शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शाळा सुरू करण्याच्या संदर्भातील सर्व निर्णय आम्ही स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. पहिली ते बारावी आणि शिशू वर्ग सुरू करण्यासही मान्यता असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

दरम्यान, युरोपात कोरोनाची लाट सुरु असताना शाळा सुरु आहेत. राज्यभरातील रुग्णालयात ९० ते ९५ टक्के बेड रिकामे असून रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या सर्व बाबींचा अभ्यास करूनच शासनाने शाळा सुरु केल्या सल्ल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे पालकांनी न घाबरता आपल्या पाल्यांना शाळेत पाठवावे असं आवाहन त्यांनी केलं. जालनामध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते.

ज्या जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या जास्त असेल अशा जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाने या संबंधीचा निर्णय घ्यायचा आहे. शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलाच्या आरोग्याकडे लक्ष ठेवण्याबाबत सूचना केल्या असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं.

Share This News

Related Post

Thane Crime News

Thane Suicide News : पोलीस भरतीचं स्वप्न राहिलं अधुरं; सुसाईड नोटमध्ये वाहतूक पोलिसांचे नाव लिहून तरुणाची आत्महत्या

Posted by - July 29, 2023 0
ठाणे : भारतीय लष्कर आणि पोलीस दलामध्ये भरती होण्याचे स्वप्न बघणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या (Thane Suicide News) केल्याची घटना ठाण्यामध्ये…

नवनीत राणा यांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी : राणा यांच्या वकिलाची मागणी

Posted by - May 2, 2022 0
मुंबई- नवनीत राणा यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी भायखळा कारागृह अधीक्षकांना पत्र पाठवून नवनीत राणा यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी…

मोठी बातमी! राणा दाम्पत्य उद्या दिल्लीत; लोकसभा अध्यक्षांची घेणार भेट

Posted by - May 8, 2022 0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हनुमान चालीसा चा मुद्दा लावून धरल्यानंतर मातोश्री समोर मान चालीसा करणारच असा निर्धार केलेल्या राणा दाम्पत्याला खार…

CRIME NEWS : शिरूर तालुक्यातील बलात्काराच्या घटनेत भाजप नेत्याचा संबंध नाही ; आरोपी अटकेत , शिक्रापूर पोलिसांचे स्पष्टीकरण

Posted by - September 11, 2022 0
शिरूर : शिरूर मधील एका फार्म हाऊसवर एका 12 वर्षी अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याच्या घटनेनें खळबळ उडाली आहे. या प्रकरणात…

CORONA UPDATES : कर्नाटकमध्ये नववर्षाची सुरुवात सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्तीने

Posted by - December 26, 2022 0
कर्नाटक : सध्या जगभराला पुन्हा एकदा कोरोनाने धोक्याची घंटी दिली आहे. जपान, चायना, ब्राझीलमध्ये कोरोनान थैमान घातल असतानाच भारत सरकारने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *