सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया; प्रवेशासाठी उरले फक्त चार दिवस..!

217 0

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ची नियमित प्रवेश प्रक्रिया १५ जूनपासून सुरू झाली असून या प्रवेशप्रक्रियेअंतर्गत जवळपास ९५ ते १०० अभ्यासक्रमांना विद्यार्थी अर्ज करू शकतात. प्रवेश घेण्यासाठी आता केवळ चार दिवस उरले असून प्रवेशाची अंतिम मुदत १२ जुलै आहे. तर विलंब शुल्कासहित विद्यार्थ्यांना १७ जुलै पर्यंत अर्ज करता येणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध विभागांत चालणाऱ्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी, अंतरविद्याशखिय (इंटिग्रेटेड), बहुविद्याशाखिय (इंटरडिसिप्लीनरी) अभ्यासक्रमांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना याची संपूर्ण माहिती http://www.unipune.ac.in या संकेस्थळावर एडमिशन सेक्शनमध्ये मिळेल. किंवा https://campus.unipune.ac.in/ccep/login.aspx या लिंकवर लॉग इन करावे.

विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेच्या माध्यामातून हे प्रवेश दिले जातील. ही प्रवेश परीक्षा २१ ते २४ जुलैदरम्यान होणार आहे.

ही सर्व प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन असून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरून प्रवेश परीक्षा शुल्कही ऑनलाईन भरायचे आहे. तर प्रवेश परीक्षा देखील ऑनलाईन होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठात येण्याची गरज नाही.

दरम्यान ओपन अँड डिस्टंट लर्निग ची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नसून याचेही प्रवेश लवकरच सुरू होतील.

———-

Share This News

Related Post

आधी हकालपट्टी नंतर मलमपट्टी ! माजी खासदार शिवाजीराव आढळराव शिवसेनेतच

Posted by - July 3, 2022 0
शिवसेनेचे शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर पक्षाविरोधात कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी आली…
Yerwada Jail

Yerawada Jail : येरवाडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

Posted by - June 20, 2023 0
पुणे : पुण्यातील (Pune) येरवाडा कारागृहामधून (Yerawada Jail) एक मोठी बातमी समोर आली आहे. येरवाडा कारागृहात (Yerawada Jail) दोन गटात…

IMP NEWS : ‘ती’ कंपने भूकंपाची नाही ; लिंबारवाडी भूस्खलनाची कारणे शोधण्यासाठी सर्वेक्षणाबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची GSIला सूचना

Posted by - July 19, 2022 0
पुणे : मुळशी तालुक्यातील लिंबारवाडी आणि वडगाव (वाघवाडी) येथे झालेल्या भूस्खलनाचे नेमके कारण शोधण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भारतीय…

सुपर मार्केट मध्ये वाईन विक्री करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात शाहीर हेमंतराजे मावळे यांनी राज्य सरकारचा पुरस्कार केला परत (व्हिडीओ)

Posted by - January 31, 2022 0
राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईनची विक्री करता येणार आहे. तशा प्रकारचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याच्या निषेधार्थ शाहीर…

पुणे : मंत्री शंभूराज देसाई यांनी सहकुटुंब श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं घेतलं दर्शन

Posted by - September 6, 2022 0
पुणे : दरवर्षी प्रमाणे मी गणेशोत्सवामध्ये एक दिवस अभिषेकाला आणि आरतीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणरायाच्या चरणी येत असतो, मागचे २…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *