Maharashtra Talathi Bharti 2023

Maharashtra Talathi Bharti 2023: राज्यात तलाठी भरतीला आजपासून सुरुवात; जाणून घ्या महत्वाच्या तारखा आणि लागणारी कागदपत्रे

620 0

मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकतीच महसुल आणि वन विभाग महाराष्ट्र तलाठी पदासाठीच्या (Maharashtra Talathi Bharti 2023)तब्बल 4644 जागांच्या आपदांसाठी मेगाभरती काही दिवसांपूर्वीच जाहीर केली होती. आजपासून तुम्ही या तलाठी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती (Maharashtra Talathi Bharti 2023) घेण्यात येणार आहे. या भरतीसाठीची नेमकी पात्रता काय? कोणते उमेदवार या पदभरतीचा फॉर्म भरण्यास कोण पात्र असणार आहेत? याची माहिती आज आपण जाणून घेणार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात…..

या पदांसाठी भरती
महसुल आणि वन विभाग महाराष्ट्र तलाठी (Talathi)
एकूण जागा – 4644

या पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
याचबरोबर उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.
तसेच राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केलेल्या असाव्यात.

Ram Gayte : सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी लढा देणारे राष्ट्र सेवादलाचे राम गायटे यांचे निधन

या पदासाठी लागणारी वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 18 ते 38 दरम्यान असणं आवश्यक आहे. SC/ST/PWD/OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी शिथिलता देण्यात येणार आहे.

एवढा मिळणार पगार
विविध जिल्ह्यांतील तलाठी – 25,500/- ते रु. 81,100/- रुपये प्रतिमहिना पगार असणार आहे.

अशाप्रकारे करा अर्ज
या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्जदाराचे स्वतःचे gmail account आवश्यक आहे.
अर्ज योग्यरीत्या भरून झाल्यावर submit हे बटन क्लिक करावे.
यानंतर अर्जाची प्रत आपल्या gmail account वर प्राप्त होईल.
सदर अर्ज प्रिंट करून मुलाखतीच्या दिवशी प्रिंट केलेल्या अर्जा सह उपस्थित असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रे आहेत आवश्यक
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो

महत्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 26 जून 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जुलै 2023

या भरतीसाठीची अधिकृत वेबसाईट
या पदभरतीसाठी (Maharashtra Talathi Bharti 2023) ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या लिंकवर क्लिक करा.

Share This News

Related Post

“नवे आदर्श सांगणं हा महापुरुषांचा अपमान कसा…?” राज्यपालांचं अमित शाहांना पत्र…

Posted by - December 12, 2022 0
महापुरुषांबाबत अवमान करण्याची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही. नवे आदर्श सांगणं हा महापुरुषांचा अपमान कसा काय? असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी…

धनुष्यबाण कुणाचा ? निर्णय लांबणीवर..! मग अंधेरी निवडणुकीचे काय ?

Posted by - October 7, 2022 0
मुंबई : निवडणूक आयोगामार्फत आज धनुष्यबाण हे चिन्ह नक्की कुणाचं हा महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता होती. मात्र सध्यातरी हा…
Accident News

Accident News : जवानांच्या बसचा भीषण अपघात; 10 जण गंभीर जखमी

Posted by - April 21, 2024 0
गडचिरोली : छत्तीसगडमध्ये मतदारांच्या सुरक्षेसाठी तैनात जवानांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात (Accident News) झाला आहे. चालकाचे गाडीवरील सुटल्यामुळे हा…

शिंदे गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; एकनाथ शिंदे यांचे मुख्य नेतेपदी निवड तर दीपक केसरकर मुख्य प्रवक्ते

Posted by - July 18, 2022 0
मुंबई: शिवसेनेच्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार असून या सुनावणीआधी शिंदे घटना मोठी खेळी खेळली असून…
Pankja And Dhananjay Munde

Pankaja Munde : वेड्या बहिणीची वेडी ही माया ! भावाला मंत्रिपद मिळाल्याच्या आनंदात बहिणीने केले औक्षण

Posted by - July 7, 2023 0
मुंबई : मुंडे भावा- बहिणींचा (Pankaja Munde) वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. ते एकमेकांवर टीका करण्याची एकपण संधी सोडत नाहीत.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *