Tanisha Bormanikar

Tanisha Bormanikar : बारावी परीक्षेत 100 टक्के गुण मिळवत तनिषा बोरामणीकर आली अव्वल

433 0

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर झाला. यात राज्यातील मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी मंगळवारी सकाळी 11 वाजता इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला. त्यात राज्यातील एकमेव विद्यार्थिनीने 100 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. तनिषा सागर बोरामणीकर असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. चला तर मग तिच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया…

तनिषा सागर बोरामणीकर असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी कॉलेजची विद्यार्थिनी आहे. तिला बारावीत एकूण 518 गुण मिळाले.तनिषाला बारावीतील 518 गुणांसह 18 क्रीडा गुण मिळाले आहेत. त्यामुळे ही विद्यार्थिनी 100 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. तनिषा ही जिल्हास्तरीय बुद्धीबळपटू आहे.

तिच्या मार्कांबद्दल बोलायचे झाल्यास ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, पाली व अर्थशास्त्र विषयात तनिषाला शंभर पैकी 100 गुण मिळाले आहेत. तर इंग्रजी विषयात 89, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी विषयात 95 तर सेक्रेटरियल प्रॅक्टिस या विषयात 98 गुण मिळाले आहेत. तनिषा बुध्दीबळ खेळाडू असून तिने आठ वर्षाखालील स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच ओपन नॅशनल्स आणि राज्यस्तरीय स्पर्धेतही तिने सहभाग घेतला होता. बुद्धीबळाचा पट गाजवणाऱ्या तनिषाने बारावीच्या परीक्षेत उत्तम कामगिरी करत राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Vishal Agrawal : पोराच्या कारनाम्यामुळे सध्या अटकेत असेलेले विशाल अग्रवाल नेमके कोण आहेत?

Nashik News : भाविकांना शिर्डीहून सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण आग

Solapur News : धक्कादायक ! सोलापुरात तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; तरुणाच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

HSC 12th Result 2024 : बारावीचा निकाल जाहीर; पुन्हा एकदा मुलींनीच मारली बाजी

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात आज कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला नवा अलर्ट

Pune Porsche Accident: ‘वडिलांनीच लायसन्स नसताना कार दिली’; अल्पवयीन आरोपीकडून धक्कादायक माहिती उघड

Pune Accident: फरार बिल्डर विशाल अग्रवालला छत्रपती संभाजीनगरमधून अटक

Share This News

Related Post

Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : शाळेतून पायी घरी जाताना घात झाला अन् 12 वर्षांचा चिमुरडा जीवानिशी मुकला

Posted by - August 25, 2023 0
सिल्लोड: छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) सिल्लोड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Chhatrapati Sambhajinagar) शाळेतून पायी घरी जाणाऱ्या एका…
Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवारांनी पुण्यात केली भूमिगत मेट्रोची पाहणी

Posted by - October 21, 2023 0
पुणे : माननीय उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांनी पुणे मेट्रोच्या स्वारगेट मल्टी मोडल हबची…
Pune News

Pune News : विद्यार्थी प्रश्नावर चर्चा व निवेदन देण्यासाठी विद्यापीठात विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या शिष्टमंडळाने घेतली कुलगुरुंची भेट

Posted by - August 22, 2023 0
पुणे : आज दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या शिष्टमंडळाने विद्वयापीठामधील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मा. कुलगुरू…
Pune Politics

Pune Politics : शरद पवारांचा वळसे पाटलांना मोठा धक्का ! ‘या’ मोठ्या नेत्याने दिला पवारांना पाठिंबा

Posted by - April 11, 2024 0
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे राजकारण (Pune Politics) मोठ्या प्रमाणात तापले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार…
Pune News

Pune News : दिवसभर अंगणात खेळला, रात्री अचानक 5 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

Posted by - August 11, 2023 0
पुणे : पुण्यामधून (Pune News) एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील (Pune News) भोर तालुक्यात ही दुर्दैवी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *