Eknath Shinde Call

स्पर्धा परीक्षा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शासन कटिबध्द 

1014 0

मुंबई: राज्य शासन अतिशय नियोजनबद्धरित्या नामांकित संस्थांच्या माध्यमातून विविध पदभरतीच्या परीक्षा घेत आहे. कुठलाही गैरप्रकार करण्यास वाव नसून परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना सुद्धा दक्ष राहण्याचे निर्देश आहेत, त्यामुळेच काल नाशिक येथे परीक्षा केंद्रावर तलाठी पदाच्या ऑनलाईन परीक्षेच्यावेळी तीन संशयितांना पकडण्यात यश आले. या परीक्षा व्यवस्थित पार पाडण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, याविषयी कुणीही संभ्रम निर्माण करू नये व अफवाही पसरवू नये असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

नाशिक शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल परीक्षा केंद्रावरून पोलिसांनी तीन संशयितांना पकडले आणि त्यांच्याकडून टॅब, वॉकी टॉकी, मोबाईल फोन, हेडफोन असे साहित्य जप्त केले आहे. त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडीही देण्यात आली असून कोणत्याही परिस्थितीत पारदर्शी आणि शिस्तबद्धरित्या पदभरतीच्या परीक्षा घेण्यात येत आहेत असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पूर्वीच्या काळात अशा स्पर्धा परीक्षांत काही गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले होते. सदोष भरती प्रक्रियेमुळं विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता. आणि म्हणूनच राज्य शासनाने टीसीएस आणिआयबीपीएस या कंपन्यांकडून या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि या संस्था काटेकोरपणे या परीक्षा घेतील. राज्य शासनाचे सर्व प्रक्रियेकडे बारकाईने लक्ष आहे असेही मुख्यमंत्री म्हणतात.

Share This News

Related Post

प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची नागपुरात बैठक; राज्यातील समस्या, संघटनात्मक बांधणी, आगामी निवडणुकांवर विचारमंथन

Posted by - January 9, 2023 0
नागपुर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक उद्या मंगळवार दि. १० जानेवारी रोजी नागपूर येथे होत आहे. पक्षाची…

संत बाळूमामा ट्रस्टचा वाद चव्हाट्यावर ! ट्रस्टमधील दोन गटांची भर रस्त्यात दे दणादण !

Posted by - April 3, 2023 0
कोल्हापूर जिल्ह्यातील बाळूमामा देवस्थान ट्रस्टचा गैरकारभार आणि ट्रस्टी नेमणुकीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली समृद्धी महामार्गाची पाहणी

Posted by - December 4, 2022 0
देवेंद्र फडणवीसांचा महत्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या समृध्दी महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आहे.मात्र, त्यापूर्वी आज (रविवार 4डिसेंबर)…
Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा तरुणालाच मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

Posted by - October 31, 2023 0
सोलापूर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जालन्यामध्ये मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे. तर दुसरीकडे, राज्यभरात मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक…

शनिवार वाड्याजवळील दर्गा कोणाचा? प्रतापगडानंतर आता पुण्यात नवा वाद पेटण्याची शक्यता

Posted by - November 16, 2022 0
पुणे : किल्ले प्रतापगडावर अफजलखानाच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवल्यानंतर या ठिकाणी आणखी तीन कबरी असल्याचे निदर्शनास आलं असून आता या कबरी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *