पुणे विद्यापीठाच्या आवारात फिरायला जाताय? मग ही आहे तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी 

324 0

तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात फिरायला जात असाल तर तुम्हाला आता फिरण्यासाठी, व्यायामासाठी नावनोंदणी करावी लागणार आहे. या माध्यमातून विद्यापीठाच्या आवारात येणाऱ्या नागरिकांची मूलभूत माहिती विद्यापीठ प्रशासन संकलित करणार आहे.

विद्यापीठ आवाराच्या आणि तिथे येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विद्यापीठात सकाळी आणि संध्याकाळी व्यायाम आणि फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
ही नोंदणी विनामूल्य असून नोंदणीसाठी विद्यार्थी सुविधा केंद्राजवळील सुरक्षा केबिनमध्ये आणि सुरक्षा विभागात डेस्क ठेवून स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
या डेस्कवर नोंदणी अर्ज ठेवला असून तो भरून नागरिकांना त्याठिकाणी जमा करायचा आहे.
ही नोंदणी 28 जानेवारीपर्यंत करण्यात येणार आहे.
नोंदणीधारकांना बायोमेट्रिक प्रवेश देणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.

औंध, रेंजहिल्स, सांगवी, पाषाण रस्ता, मॉडेल कॉलनी या भागातून दररोज सकाळी आणि संध्याकाळी फिरण्यासाठी आणि व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. सर्व नागरिकांनी नोंदणी त्वरित करून घ्यावी जेणेकरून पुढील गैरसोय होणार नाही , असं आवाहन विद्यापीठान केलं आहे.

Share This News

Related Post

#ACCIDENT : ड्रायव्हरला लागली डुलकी ; खंबाटकी घाटात कारचा भीषण अपघात ; पुण्यातील पाच जण गंभीर जखमी, दोघांचा मृत्यू

Posted by - January 30, 2023 0
पुणे : सातारा रस्त्यावर खंबाटकी घाटामध्ये सोमवारी पहाटे कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले…

ब्रेकिंग न्यूज ! भाटघर धरणात एकाच कुटुंबातील 5 महिलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 19, 2022 0
  भोर तालुक्यातील नऱ्हे गावाजवळील भाटघर जलाशयात दुपारी १२ वाजता पोहण्यासाठी गेलेल्या पाच विवाहित महिला बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.…

डॉ. कारभारी काळे पुणे विद्यापीठाचे नवे प्रभारी कुलगुरू

Posted by - May 18, 2022 0
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा कार्यकाल संपुष्टात आला आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र…
Sucide

आजारपणाला कंटाळून एकाच कुटुंबातील तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न

Posted by - May 23, 2023 0
पुणे : पुण्यातून (Pune) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आजारपणाला कंटाळून एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *