विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुन्हा मोफत बससेवा

100 0

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कोरोनानंतर विद्यार्थ्यांची वर्दळ वाढली असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठाने पुन्हा एकदा विद्यापीठ परिसरात मोफत बससेवा देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टळणार आहे.

विद्यापीठात सीएनजी बससेवा सुरू करण्यासंदर्भात व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीनुसार ही बससेवा २०१९ या वर्षात सुरू करण्यात आली होती. यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्ससिबिलिटी’ अंतर्गत विद्यापीठाला दोन बस उपलब्ध करून दिल्या होत्या. सुरुवातीला तीन महिने मोफत आणि त्यानंतर नाममात्र शुल्क आकारण्याची योजना होती. तशी ही बससेवा सुरूही झाली मात्र काही काळातच कोरोना आल्यामुळे ही बससेवा बंद करावी लागली होती. मात्र आता विद्यापीठ परिसर पुन्हा एकदा विद्यार्थी व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी फुलला असल्याने कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र – कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे व कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ प्रशासनाने पुन्हा एकदा बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता एक बस दर अर्ध्या तासाने परिसरात फेऱ्या करत आहे.

ही बस विद्यापीठाच्या मुख्य द्वारापासून ते विद्यापीठात असणाऱ्या सर्व मुख्य ठिकाणापर्यंत सेवा देते.

बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांची सोय होण्यासोबतच विद्यापीठातील प्रदूषण कमी व्हावे व तेथील अनावश्यक वाहतूक कमी व्हावी यासाठी ही बससेवा आपण सुरू केली आहे. या बससेवेचा सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आवश्यकता भासल्यास आणखीही बस विद्यापीठात सुरू केल्या जातील असं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांनी सांगितलं

Share This News

Related Post

चांगले काम करा ; महाविकास आघाडीचे सरकार तुमच्यासोबत – अजित पवार

Posted by - April 20, 2022 0
कोल्हापूर उत्तरच्या नवनिर्वाचित आमदार जयश्रीताई जाधव यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेतली. जनतेने तुमच्यावर मोठा…

वरंध घाट बंदचे आदेश झुगारणाऱ्या वाहनचालकांना रोखण्यासाठी प्रशासनाची अशीही युक्ती

Posted by - July 23, 2023 0
पुणे- पुण्याहून भोर मार्गे कोकणात जाण्यासाठी भोर तालुक्यातील वरंधा घाट हा जवळचा मार्ग आहे. त्याशिवाय वर्ष विहार करण्यासाठी या घाटात…

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम; 10 नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन

Posted by - October 18, 2022 0
पुणे : मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये १० नोव्हेंबर रोजी विशेष ग्राम सभेचे आयोजन करण्यात येणार…
Maharashtra Rain

Weather Update : हवामान विभागाने पावसासंदर्भात दिला ‘हा’ नवा अलर्ट

Posted by - April 20, 2024 0
हवामान विभागाने (Weather Update) दिलेल्या इशाऱ्यानुसार पुन्हा एकदा महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील…
CM EKNATH SHINDE

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘अक्षय तृतीया’ ‘रमजान ईद’च्या शुभेच्छा

Posted by - April 22, 2023 0
मुंबई: साडेतीन मुहूर्तांपैकी एक ‘अक्षय तृतीया’ अणि पवित्र अशा रमजान अर्थात ‘ईद-उल-फित्र’ या सणाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *