Deepak Kesarkar

Teacher Recruitment : शिक्षणमंत्री केसरकरांची मोठी घोषणा; राज्यात लवकरच 50 हजार शिक्षकांची भरती

431 0

कोल्हापूर : शिक्षकांसाठी (Teacher Recruitment) एक आनंदाची बातमी समोर आली आहे. यामध्ये शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मोठी घोषणा करत राज्यात लवकरच 50 हजार शिक्षकांची भरती (Teacher Recruitment) केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्रातल्या इतिहासातील ही मोठी शिक्षक भरती (Teacher Recruitment) असेल, शिक्षकांची कमतरता भासणार नाही असं केसरकर म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणाले केसरकर?
राज्यात लवकरच 50 हजार शिक्षकांची भरती (Teacher Recruitment) केली जाणार असल्याची मोठी घोषणा दीपक केसरकर यांच्याकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्रातल्या इतिहासातील ही सर्वात मोठी शिक्षक भरती असणार आहे. केसरकर यांच्या या घोषणेमुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे. याचबरोबर राज्यातील शिक्षकांच्या सगळ्या बदल्या रद्द केल्याचेदेखील दीपक केसरकर यांनी जाहीर केले आहे.

Maharashtra Talathi Bharti 2023: राज्यात तलाठी भरतीला आजपासून सुरुवात; जाणून घ्या महत्वाच्या तारखा आणि लागणारी कागदपत्रे

शालेय गणवेशावर दिली ‘ही’ प्रतिक्रिया
विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत बोलताना केसरकर यांनी म्हटलं की, विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याची जबाबदारी ही स्थानिक शालेय समितीवर असणार आहे. गणवेश अगोदरच शिवले होते, आता एकसारखा गणवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे गणवेश मिळण्यास विलंब होत आहे. आधी एका गणवेशाचं वाटप करण्यात यावं, नंतर दुसरा गणवेश देण्यात यावा. गणेवशावाचून एकही विद्यार्थी रहाता कामा नये, अशा सूचनादेखील दीपक केसरकर यांनी दिल्या आहेत.

Share This News

Related Post

ऊर्जा विभागातील कामगारांना वाऱ्यावर सोडणार नाही, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची ग्वाही

Posted by - April 5, 2022 0
शिर्डी- ऊर्जा विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या हिताला बाधा येणार नाही याची पालक या नात्याने पूर्ण काळजी घेणार असून ऊर्जा विभागातील कर्मचाऱ्यांना…

एमपीएससीच्या पोलीस उपनिरीक्षक पदाचा निकाल जाहीर; विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण

Posted by - March 8, 2022 0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2019 च्या पोलीस उपनिरीक्षकच्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला आहे. तब्बल 3 वर्षानंतर हा निकाल…

मनोरंजन : रितेश-जेनेलियाच्या ‘वेड’ने महाराष्ट्राला लावले वेड; सैराटचाही मोडला विक्रम, तुम्ही पाहिलात का ?

Posted by - January 9, 2023 0
महाराष्ट्र : रितेश आणि जेनेलियाच्या वेड या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. या चित्रपटाने सैराट या मराठी चित्रपटाचा देखील…

नाशिकमध्ये पदवीधर निवडणुकीवर दाट धुके; मतदारांचा सकाळच्या वेळेत अल्प प्रतिसाद

Posted by - January 30, 2023 0
नाशिक : आज नाशिकमध्ये पदवीधर मतदार संघासाठी २९ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडते आहे. दरम्यान वातावरणातील गारवा पाहता मोठ्या प्रमाणावर…
Mhada

Mhada : सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या गिरणी कामगारांसाठी म्हाडाने घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

Posted by - September 14, 2023 0
मुंबई: गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठी (Mhada) मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *