ई-मान्यता प्रणाली राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल-शिक्षणमंत्री दिपक केसरकर

424 0

पुणे जिल्हा परिषदेने सुरू केलेली ई-मान्यता प्रणाली राज्यस्तरावरील एकात्मिक शाळा व्यवस्थापन प्रणाली सुरू करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. अशी प्रणाली विकसीत करताना सर्व प्रकारच्या सुविधा एकाच ठिकाणी आणणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी केले पुणे जिल्हा परिषदेच्या ई-मान्यता प्रणालीचे उद्घाटन दूरदृष्यप्रणालीद्वारे केसरकर यांच्या हस्ते  करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, योजना संचालक महेश पालकर, मुख्याध्यापक संघाचे महेंद्र गणपुले, गणेश घोरपडे, शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड आदी उपस्थित होते.

केसरकर म्हणाले, शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता महत्वाची आहे. शाळांना विविध मान्यता देतांना गैरप्रकार होऊ नये यासाठी ही प्रक्रीया ऑनलाईन करण्यात आली आहे. या प्रक्रीयेतील त्रुटी दूर करून ती अधिक सुटसुटीत करावी लागेल आणि त्यासाठी यंत्रणेला चांगले प्रशिक्षण द्यावे लागेल. ही प्रक्रीया अधिक पारदर्शक करण्याची गरज आहे. अधिकाऱ्यांनी संचमान्यता प्रणालीतील अडचणींचा आढावा घ्यावा.

राज्यस्तरावर सुरू करण्यात येणारी एकात्मिक शाळा व्यवस्थापन प्रणाली राबवितांना एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व सुविधा येणे गरजेचे आहे. पुण्यासारख्या प्रगत जिल्ह्याने अशी प्रणाली विकसीत करण्यासाठी पुढाकार घ्यावा. आरटीई २५ टक्के कोट्याअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नववी व दहावीच्या शिक्षण पुढे चालू राहावेत यासाठी सुविधा देण्याची बाब विचाराधीन आहे. नवे ॲप विकसीत करताना अनेक ठिकाणी ऑफलाईनचा आग्रह का धरण्यात येतो त्याची कारणे शोधून त्रुटी दूर कराव्यात, अशी सूचना त्यांनी केली.

शिक्षण क्षेत्रातील सुविधा निर्माण करताना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचाही विचार करावा आणि नव्या क्षेत्राविषयीची कौशल्ये शिकविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही दीपक केसरकर यांनी केले. नवी प्रणाली विकसित करण्याबाबत त्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे कौतुक केले.

Share This News

Related Post

पुस्तकासाठी बाबासाहेब पुरंदरे स्त्रोत नव्हते – जेम्स लेन

Posted by - April 17, 2022 0
मनसे विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष राज्यात सध्या सुरु आहे. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक भूमिका घेताना…

महत्त्वाची बातमी ! मुंबईत राज्यपालांच्या कार्यक्रमात वीजपुरवठा खंडित

Posted by - April 26, 2022 0
मुंबई- पडघा येथील वीजकेंद्रात बिघाड झाल्याने दादर, ठाणे, नवी मुंबई, बदलापूर भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. याचा फटका राज्यपाल भगतसिंह…

पुणे : खडकवासला धरणातून सायं. ६ वाजता मुठा नदी मध्ये २६ हजार ८०९ क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग ; नदी पत्रालगत राहणाऱ्या नागरिकांनी सावधानता बाळगावी

Posted by - August 11, 2022 0
पुणे : खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग वाढवून संध्याकाळी ६ वा. २६ हजार…

ठरलं! राहुल गांधी रायबरेलीतून खासदार राहणार; वायनाडच्या जागेबाबत काँग्रेसनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - June 17, 2024 0
नवी दिल्ली: काँग्रेस खासदार राहुल गांधी  केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा देणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे  यांनी…
Pan Card Money

PAN Card संबंधित ‘ही’ एक चूक तुम्हाला पडू शकते 10 हजार रुपयांना; जाणून घ्या त्याबद्दल

Posted by - June 22, 2023 0
पॅन किंवा परमानेंट अकाउंट नंबर हा 10 अंकी अल्फान्यूमेरिक आयडी (PAN Card) आहे. जो भारतीयांसाठी एक महत्त्वाचे कायदेशीर ओळखपत्र आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *