Amravati Crime

Amaravati Crime : दुहेरी हत्याकांडाने अमरावती हादरलं ! तरुणानं मेडिकल टर्मिनोलॉजीचा अभ्यास केला, अन् आईसह भावाला संपवलं…

5922 0

अमरावती : आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना अमरावती जिल्ह्यतील (Amaravati Crime) मोर्शी येथे घडली आहे. अमरावती (Amaravati Crime) जिल्ह्यातील मोर्शी शहरात, संशयातून पोटच्या गोळ्याने, आपल्या आईची आणि भावाची हत्या केली आहे. या घटनेमुळे सगळेच हादरले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला हैदराबाद येथून अटक केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
सौरभ गणेश कापसे (24) रा. शिवाजीनगर, मोर्शी असे आरोपी मुलाचे नाव आहे. शुक्रवार, 1 सप्टेंबर रोजी शिवाजीनगर येथे राहणाऱ्या नीलिमा गणेश कापसे (48) आणि आयुष गणेश कापसे (20) या मायलेकाचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरी कुजलेल्या स्थितीत लाकडी दिवाणाच्या कण्यात आढळून आले होते. घटनेच्या दिवसापासून नीलिमा यांचा मोठा मुलगा बेपत्ता होता. त्याचा मोबाइलसुद्धा बंद होता. नीलिमा यांचे आई-वडील कोंढाळी येथे राहतात. ते सातत्याने नीलिमा आणि दोघाही नातूंच्या संपर्कात होते. पाच-सहा दिवसांपासून नीलिमा यांचा मोबाइल बंद दाखवित असल्याने नीलिमा यांचे आई-वडील मोर्शीत पोहोचल्यावर हे धक्कादायक हत्याकांड समोर आले होते.

नीलिमा यांच्या पतीचे यापूर्वीच निधन झाले होते. त्या कंत्राटी तत्त्वावर पंचायत समितीत काम करीत होत्या. सौरभ हा विद्युत अभियांत्रिकी पदविका पूर्ण करून अमरावतीत सार्वजनिक बांधकाम विभागात कंत्राटी तत्त्वावर काम करीत होता. तर आयुष हा अमरावतीत एका महाविद्यालयात शिकत होता. दोघेही भाऊ बराच काळ घराबाहेरच राहत असत.संसाराचा गाडा सुरळीत सुरू असताना, नीलिमा कापसे यांचा मुलगा सौरभला आपल्या आईचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता.यामुळे सौरभने कटकारस्थान रचून आपल्या आई आणि भावाला संपवण्याचा निर्णय घेतला.

यासाठी त्याने नवीन शक्कल लढवली. आधी खाण्याच्या भाजीमध्ये धोत्र्याच्या बिया टाकल्या. ज्याने आई आणि भावाची प्रकृती खालावली. त्यानंतर दोघांनाही घरी आणून सलाईन लावली. या सलाईनमध्ये गुंगीधारक आणि झोपेचे औषध इंजेक्शनने सलाईनमध्ये सोडले. औषधांच्या अतिडोसमुळे दोघांचाही झोपेतच मृत्यू झाला. त्यानंतर मृत्यू झाल्याची खात्री केल्यानंतर त्याने दोघांचे मृतदेह प्लास्टिकमध्ये बांधून दिवाणमध्ये टाकले. घराला बाहेरून कुलूप लावून तो घर सोडून निघून गेला. धक्कादायक म्हणजे आरोपीने हत्या करण्याच्या विविध पद्धतीचा इंटरनेटवर अभ्यास केला. काही वनौषधींच्या अतिसेवनामुळे विषामध्ये रुपांतर होते, अशी माहिती त्याने गोळा केली.या हत्याकांडामुळे सगळेच हादरले आहेत. पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला हैदराबाद येथून अटक केली आहे.

Share This News

Related Post

Mansoon Session

Monsoon Session : राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सोमवारपासून; ‘या’ 4 मुद्द्यांमुळे पावसाळी अधिवेशन ठरणारं वादळी

Posted by - July 16, 2023 0
मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) 17 जुलैपासून सुरुवात होत असून या अधिवेशनाकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. अजित पवार…
Old People

Property News : आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना प्रॉपर्टीतून बेदखल करणार; ‘या’ गावाने घेतला मोठा निर्णय

Posted by - January 29, 2024 0
सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील नरवाड ग्रामपंचायतीने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात…

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावाजवळ कार आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात

Posted by - January 30, 2022 0
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावाजवळ कार आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.…

समृद्धी महामार्गावर नागपूर-शिर्डी बससेवा आजपासून सुरू; तिकीट दर जाणून घ्या

Posted by - December 15, 2022 0
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले. यानंतर…

फिल्मी स्टाईल पळापळी : रस्त्यावर झाली वाहतूक कोंडी; नवरदेवाने काढला पळ

Posted by - March 10, 2023 0
बंगळुरू : बंगळुरूमध्ये एक विचित्र घटना घडली आहे, की ज्या घटनेवर हसावं की दुःख व्यक्त करावं असाच प्रश्न पडेल. तर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *