Thane Crime News

Thane Suicide News : पोलीस भरतीचं स्वप्न राहिलं अधुरं; सुसाईड नोटमध्ये वाहतूक पोलिसांचे नाव लिहून तरुणाची आत्महत्या

439 0

ठाणे : भारतीय लष्कर आणि पोलीस दलामध्ये भरती होण्याचे स्वप्न बघणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या (Thane Suicide News) केल्याची घटना ठाण्यामध्ये घडली आहे. ड्रिंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल झाल्यामुळे आता आपलं करियर संपणार या भीतीतून या तरुणाने हे टोकाचे पाऊल (Thane Suicide News) उचलले आहे. त्याने आत्महत्या करण्याच्या अगोदर या तरुणानं सुसाईड नोट लिहून आपल्या आईच्या मोबाईलवर पाठवली आहे. त्यामध्ये त्याने काही वाहतूक पोलिसांची नावे लिहिली आहेत. मनीष उतेकर असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

सुसाईड नोटमध्ये पोलिसांची नावं
आत्महत्या करणारा तरुण मनीष उतेकर हा ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात राहात होता. त्याला पोलीसदल किंवा आर्मीमध्ये भरती होण्याची इच्छा होती. त्यासाठी त्याने तयारी देखील सुरू केली होती. तो स्पर्धा परीक्षा देत होता. मात्र या तरुणाने आपल्या राहात्या घरात आईच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. त्याने आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट देखील आपल्या आईला पाठवली आहे. या सुसाईड नोटमध्ये काही वाहतूक पोलिसांची नावे लिहिली आहेत. या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. प्रकरणाचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

नेमके काय लिहिले आहे सुसाईड नोटमध्ये?
मनीष याने आत्महत्या (Thane Suicide News) करण्यापूर्वी आपल्या आईच्या मोबाईलवर एक सुसाईड नोट पाठवली. या नोटमध्ये त्याने लिहिले कि, गटारी अमावस्याच्या दिवशी त्याने त्याच्या काही मित्रांसोबत मद्यपान केलं. त्यानंतर मद्यपान करून वाहनं चालवत असताना त्याला वाहतूक पोलिसांनी ठाणे पूर्वेतील कोपरी परिसरात अडवलं. त्याच्याविरोधात ड्रिंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने दोन दिवस पोलिसांना गुन्हा मागे घेण्याची विनंती केली तसेच दंड भरतो म्हणून सांगितले देखील, मात्र पोलिसांनी त्याला कोर्टात जाण्यास सांगितले. कोर्टात गेल्यास करिअर संपेल या भीतामधून त्याने आत्महत्या केली. एवढेच नाहीतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी तुझ करिअर बरबाद करणार अशी धमकी दिली असल्याचा दावा या तरुणाने आपल्या सुसाईड नोटमध्ये केला आहे.

Share This News

Related Post

EVM

Solapur Loksabha : खळबळजनक ! मतदाराने पेट्रोल टाकून EVM मशीन जाळली

Posted by - May 7, 2024 0
सोलापूर : सोलापूर व माढा लोकसभेसाठी (Solapur Loksabha) आज सकाळपासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. उन्हाळा असल्यामुळे सकाळी साडेसात वाजल्यापासूनच अनेक…
Kolhapur News

Kolhapur News : गणपतीचे स्वागत करताना काळाने केला घात ! गणेशभक्ताचा दुर्दैवी अंत

Posted by - September 20, 2023 0
कोल्हापूर : सध्या सगळीकडे गणपतीचे आगमन झाले आहे. यादरम्यान कोल्हापूरमधून (Kolhapur News) एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. गणेशोत्सव साजरा…
raj-thackeray

‘आपला आदेश आम्हाला शिरसावंद्य’; भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर सामान्य कार्यकर्त्याचे राज ठाकरेंना भावनिक पत्र

Posted by - April 12, 2024 0
मुंबई : नेहमीच सत्ताधारी पक्षांना आपल्या भाषणातून चपराक देणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदा झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात वेगळी भूमिका…

बिबवेवाडीत मध्यरात्री गोळीबाराचा थरार, तरुण थोडक्यात बचावला (व्हिडिओ)

Posted by - February 8, 2022 0
पुणे- किरकोळ वादातून दहा ते अकरा जणांच्या टोळक्याने राडा घालून तरुणावर गोळीबार केला. वेळीच पळ काढल्यामुळे संबंधित तरुण थोडक्यात बचावला.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *