Jalgaon News

Jalgaon News : बहीण क्लासवरून घरी येताच भावाला ‘त्या’ अवस्थेमध्ये पाहून हादरली

20437 0

जळगाव : जळगाव शहरातील (Jalgaon News) मयूर कॉलनीमधील दुर्गेश भरत बारी (20) या तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी एक वाजता उघडकीस आली. त्याने जेव्हा आत्महत्या केली तेव्हा वडील कामावर, आई नातेवाईकांकडे आणि बहीण क्लासला गेलेली होती. बहीण क्लासवरून घरी परतली तेव्हा दरवाजा उघडताच भाऊ गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला.

काय घडले नेमके?
जळगाव शहरातील खंडेराव नगरातील रहिवासी असलेले भरत बारी आणि त्यांचे कुटुंबीय सध्या पिंप्राळामधील मयूर कॉलनीमध्ये राहतात. भरत बारी हे होमगार्ड असून इतर वेळी ते रिक्षा चालवितात. शुक्रवारी नेहमीप्रमाणे ते कामावर गेलेले होते. त्यांच्या पत्नी कविता या नातेवाईकांकडे गेल्या होत्या तर त्यांची मुलगी नंदिनी ही क्लासला गेलेली होती. त्याचवेळी त्यांचा मुलगा दुर्गेश हा घरात एकटाच होता. घरात कोणीही नसल्याची संधी साधत त्याने घराच्या छताला गळफास घेतला. दुपारच्या एक वाजेच्या सुमारास क्लासला गेलेली नंदिनी ही घरी आली त्यावेळी घराचा दरवाजा बंद होता. तिने आवाज दिला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

यानंतर तिने शेजारच्यांच्या मदतीने दरवाजा उघडला. त्यावेळी दुर्गेश हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. दुर्गेशने आयटीआय केले असून तो मिळेल ते काम करीत होता. दुर्गेशने आत्महत्या केल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. त्याने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी रामानंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Share This News

Related Post

Manoj Jarange Patil

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या मुंबई दौऱ्याची टाईमलाईन ठरली!

Posted by - January 15, 2024 0
जालना : मराठा आंदोलक (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आहे. अंतरवाली सराटीच्या नादी लागू नका,…
Ratnagiri Crime

Ratnagiri Crime : भावाला फोन करुन म्हणाली मी उद्या गावी येतेय, मात्र 2 दिवसांनी तरुणीचा आढळला मृतदेह

Posted by - August 2, 2023 0
दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri Crime) दापोली तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये दापोलीहून चिपळूण येथे आपल्या गावी…

महाराष्ट्राची पर्यटनात बाजी ; सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कारामध्ये दुसरा क्रमांक महाराष्ट्राला

Posted by - September 27, 2022 0
पुणे : भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयातर्फे आज जागतिक पर्यटन दिनी उपराष्ट्रपती जगदीप धानकर यांच्या हस्ते २०१८-१९ या वर्षासाठीच्या राष्ट्रीय पर्यटन…
Monsoon Update

Monsoon Update : शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! ‘या’ जिल्ह्यांत आज बरसणार पाऊस

Posted by - August 31, 2023 0
पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारल्याने (Monsoon Update) शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले…

पहिल्या पतीला सोडलं, केलं दुसरं लग्न; तिसऱ्यानेच पाठवले पत्नीला तसले व्हिडिओ, मोबाईल पाहून पतीची पायाखालची जमीनच सरकली…

Posted by - March 8, 2023 0
उत्तराखंड : हल्द्वानी मधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या महिलेने पहिलं लग्न केलं होतं. पण हे पहिलं लग्न…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *