Shubham Pawar

Maratha Reservation : ‘माझं बलिदान वाया जाऊ देऊ नका’; म्हणत मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

461 0

नांदेड : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा राज्यात पेटला आहे. या आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी सरकारला 40 दिवसांचा अल्टीमेटम देखील दिला आहे. एकीकडे अल्टीमेटम दिला असता दुसरीकडे मात्र आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजातील लोकांच्या आत्महत्या सुरु आहेत. याच आरक्षणासाठी नांदेडमध्ये एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे.

तीन दिवसांपूर्वीच सुनील कावळे या तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना याच मागणीसाठी एका तरुणाने आत्महत्या केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. शुभम पवार असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात ही घटना घडली आहे. त्याने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचे मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत लिहिले आहे. मुंबईवरून परत गावाकडे येत असताना विष पिऊन अर्धापूर गावाजवळ त्याने आत्महत्या केली. शुभमच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे.

24 वर्षीय शुभम पवार हा प्लंबर म्हणून काम करत होता. शनिवारी तो रेल्वेने मुंबईहून रेल्वेने नांदेड येथे आला होता. वडिलांना फोन करुन शुभमने आपण बहिणीकडे जाऊन फ्रेश होऊन गावी येतो असे सांगितले. मात्र संध्याकाळी सातपर्यंत शुभम घरी परतला नाही. वडिलांनी वारंवार त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्याने फोन उचलला नाही. त्यानंतर त्याच्या भावाने पुतणीला फोन करुन शुभमबाबत विचारणा केली. त्यावर शुभम इथे आला नसल्याचे त्यांनी सांगितले. शुभमच्या वडिलांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी शुभमचे मोबाईल लोकेशन तपासले असता ते नरहरी मंगल कार्यालयाच्या शेजारी आढळून आले. त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता शुभमचा मृतदेह आढळून आला.

यानंतर पोलिसांनी आजूबाजूच्या परिसराचा पंचनामा केला असता मृतदेहाशेजारी विषारी औषधाचा डब्बा, पावती आणि एक चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीमध्ये एक मराठा लाख मराठा, मराठा आरक्षण देण्यासाठी मी माझ्या जिवाचे बलिदान देत आहे. माझे बलिदान वाया जाऊ नये, असे लिहीले होते. यानंतर पोलिसांनी शुभमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी विष्णुपुरी रुग्णालयात पाठवला.

Share This News

Related Post

Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा समजाला ‘सरसकट’ कुणबी प्रमाणपत्र देण्यास अखिल भारतीय ओबीसी महासंघाकडून विरोध

Posted by - September 10, 2023 0
नागपूर : मराठा समजाला ‘सरसकट’ कुणबी जातीचे प्रमाणपत्र (Maratha Reservation) देण्याला अखिल भारतीय ओबीसी महासंघाकडून विरोध करण्यात आला आहे. शनिवारी…
Maratha Reservation

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या पुणे शहरातील मोर्च्याचा कशाप्रकारे असणार मार्ग

Posted by - January 24, 2024 0
पुणे : मराठा आरक्षणासह (Maratha Reservation) विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांचा अंतरवाली सराटी ते मुंबई मोर्चा 20 जानेवारीला सुरू…
Nashik Copy

मुन्नाभाई स्टाईल कॉपी करणाऱ्या पठ्ठ्याला नाशिक पोलिसांकडून अटक

Posted by - May 30, 2023 0
नाशिक : काही लोक परीक्षेत कॉपी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरत असतात. नाशिकमध्ये तर एका पठ्ठ्याने मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटात मुन्नाभाई…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *