Yavatmal Murder

Yawatmal Murder : यवतमाळ हादरलं ! पत्नीच्या चारित्र्यावरील संशयानंतर जावयाने बायकोसह संपवली संपूर्ण सासुरवाडी

746 0

यवतमाळ : यवतमाळमधून (Yavatmal Murder) एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील कळंबमधील तिरझडा पारधी बेड्यावर ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत घरघुती वादातून जावयाने सासरा, दोन मेहुणे आणि बायकोची हत्या केली. तर त्याची सासू जखमी झाली असून त्यांच्यावर यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.

काय घडले नेमके?
जावयाने केलेल्या हल्ल्यात सासरा पंडित घोसले, मेहुणा ज्ञानेश्वर घोसले आणि सुनील घोसले, बायको रेखा गोविंद पवार अशी मृतांची नवे आहेत. सासू रुखमा पंडित घोसले गंभीर जखमी असून त्यांच्यावर यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. गोविंद विरचंद पवार असे आरोपी जावयाचे नाव आहे. तो काही महिन्यांपूर्वी पत्नी रेखा सोबत सासुरवाडीत राहत होता. त्याला येथे सतत अपमानास्पद वागणूक मिळत होती.

यामुळेच दुखावलेल्या गोविंदने मंगळवारी मध्यरात्री संपूर्ण घरावरच सूड उगवला. तिरझडा गावात घरी झोपलेल्या पत्नी आणि मेहुण्याची हत्या केली. नंतर शेतात झोपलेल्या सासरा आणि दुसरा मेहुण्यावर हल्ला केला. यावेळी सासू थोडक्यात बचावली. मात्र तिची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Share This News

Related Post

लवकरच मुंबईमध्ये मान्सूनच्या सरी बरसणार! या दिवशी मान्सून धडकणार

Posted by - May 21, 2022 0
मुंबई- उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना लवकरच त्यामधून सुटका मिळणार आहे. यंदा मान्सूनची आगेकूच समाधानकारक असून मुंबई आणि पश्चिम किनारपट्टीवर पुढील…
Police News

Police News : दोन दिवसात प्रमोशन द्या नाहीतर…; हेड कॉन्स्टेबलच्या ‘त्या’ पत्राने पोलीस दलात उडाली खळबळ

Posted by - December 14, 2023 0
अहमदनगर : अहमदनगर पोलीस दलातून (Police News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये एका हेड कॉन्स्टेबलने वरिष्ठांना लिहिलेल्या एका…
shinde and uddhav

नैतिकता असल्यास शिंदे- फडणवीस यांनी राजीनामा द्यावा; ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया

Posted by - May 11, 2023 0
मुंबई : मागच्या काही महिन्यांपासून बहुचर्चेत असणारा राज्यातील सत्तासंघर्षाचा निर्णय आज सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) जाहीर केला आहे. हा निर्णय…
Kalamb Jail

Kolhapur News : मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीची निर्घृणपणे हत्या

Posted by - June 2, 2024 0
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातून (Kolhapur News) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा कारागृहात कैद्याचा खून करण्यात…

Pune News : यावर्षीही रंगणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि गुरुजी तालीम मंडळाच्या दहीहंडीचा थरार

Posted by - September 6, 2023 0
पुणे : श्रीमंत भाउसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि गुरुजी तालीम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीही भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *