Yavatmal Crime : यवतमाळ हादरलं! पोटच्या लेकरांना विष पाजून आईची आत्महत्या

3636 0

यवतमाळ : यवतमाळमध्ये (Yavatmal Crime) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये (Yavatmal Crime) एका आईने दोन मुलांना विष देऊन स्वतःदेखील आत्महत्या केली आहे. या हादरवणाऱ्या घटनेत आईसह दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर यवतमाळमध्ये मोठी खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतले आहेत.

हि घटना यवतमाळच्या ऊमरखेड तालुक्यातील निंगणुर या ठिकाणी घडली आहे. यामध्ये आईसह दोन्ही निरागस मुलांचा मृत्यू झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. रेश्मा नितीन मुडे असे मृत आईचे नाव आहे तर सहा वर्षीय श्रावणी आणि तीन वर्षीय सार्थक असे मृत बालकांची नावे आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच कुटुंबियांनी तिघांनाही तात्काळ सवना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचारदरम्यान तिघांही मृत्यू झाला. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

सोमवारी संध्याकाळी रेश्मा मुडे यांनी आधी दोन बालकांना विष पाजले. यानंतर त्यांनी स्वतःही विष प्यायले. तिघांचीही प्रकृती खराब झाल्यावर कुटुंबातील सदस्यांनी त्यांना सवना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्या आधीच दोघांचा मृत्यू झाला होता. तर श्रावणीला पुढील उपचारासाठी पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारदरम्यान तिचाही मृत्यू झाला.रेश्माने अचानक असे टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. बिटरगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Related Post

दूरदर्शनचा आवाज हरपला ! ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे निधन

Posted by - June 7, 2022 0
पुणे- दूरदर्शन वरील ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे (वय ६५) यांचं मुंबईत निधन झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते आजारी होते.…
CM EKNATH SHINDE

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘अक्षय तृतीया’ ‘रमजान ईद’च्या शुभेच्छा

Posted by - April 22, 2023 0
मुंबई: साडेतीन मुहूर्तांपैकी एक ‘अक्षय तृतीया’ अणि पवित्र अशा रमजान अर्थात ‘ईद-उल-फित्र’ या सणाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा…

Tourism Minister Mangalprabhat Lodha : पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी शासन आणि पर्यटन क्षेत्रातील भागधारकांचे सहकार्य घेणार

Posted by - October 14, 2022 0
पुणे : पुणे जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठा वाव असून शासन आणि या क्षेत्रातील भागधारक यांच्या संयुक्त प्रयत्नातून पर्यटनाच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण…

आव्हाडांच्या शुभेच्छांवर अण्णांचे सणसणीत उत्तर, काय म्हणाले अण्णा हजारे ?

Posted by - June 15, 2022 0
अहमदनगर – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा आज वाढदिवस. या निमित्त राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारे यांना…
Dhule Fire

Dhule Fire : धुळे शहरातील नामांकित प्रियांका स्पोर्ट्सला भीषण आग

Posted by - August 13, 2023 0
धुळे : धुळे (Dhule Fire) शहरातील जुन्या महानगरपालिकेच्या जवळ असलेल्या प्रबोधनकार ठाकरे संकुलात असलेल्या प्रियंका स्पोर्ट्स या दुकानाला भीषण आग…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *