Nanded News

Nanded News : चिमुकली झाली पोरकी ! पतीच्या अपघाती मृत्यूनंतर पत्नीनेदेखील संपवलं आयुष्य

553 0

नांदेड : नांदेडमधून (Nanded News) एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये पतीचे अपघातात निधन झाल्याची बातमी समजताच पत्नीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्नेहा बेंद्रीकर असं आत्महत्या केलेल्या पत्नीचं नाव आहे. त्यांच्या पतीचा शनिवारी रात्री घरी परतताना अपघाती मृत्यू झाला होता. यानंतर स्नेहा यांनी त्याच रात्री उशिरा गळफास घेऊन आत्महत्या केली.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
स्नेहा यांचे पती अरुण बेंद्रिकर हे विष्णुपुरी इथून घरी परत येत होते. त्यांच्या दुचाकीला कहाळा-गडगा इथं अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अरुण यांचा मृत्यू झाला. अरुण यांचे अपघातात जागीच निधन झाल्यानंतर त्यांच्या खिशात असणाऱ्या ओळखपत्राच्या आधारे माहिती घेऊन त्यांच्या पत्नीला याची माहिती देण्यात आली.

पत्नी स्नेहा यांना पती अरुण यांच्या निधनाची माहिती मिळताच जबर धक्का बसला. यातूनच त्यांनी रात्री उशिरा घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. स्नेहा यांचे पती अरुण हे महावितरणमध्ये कर्मचारी होते. दोघांना अडीच वर्षांची मुलगीसुद्धा आहे. पतीचं अपघाती निधन आणि पत्नीच्या आत्महत्येमुळे अडीच वर्षांची चिमुकली पोरकी झाली. या घटनेमुळे नायगाव तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अरुण यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन विष्णुपुरी शासकीय रुग्णालयांमध्ये करण्यात आलं. तर स्नेहा यांच्या मृतदेहावर नायगाव येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आले. या दाम्पत्याच्या पार्थिव देहांवर बेंद्री येथे आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pimpri Video : दारुच्या नशेत शर्ट काढून दहशत पसरवणाऱ्या गुंडाला पोलिसांनी घडवली अद्दल

Maharashtra Politics : वंचित बहुजन आघाडीकडून बीड लोकसभेसाठी अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी जाहीर

Chandrashekhar Bawankule : देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या विरोधात नाही; चंद्रशेखर बावनकुळेंच मोठं विधान

Delhi High Court : सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार होऊ शकत नाही; कोर्टाचा मोठा निर्णय

Lok Sabha : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ‘त्या’ निर्णयामुळे सीएम शिंदे आणि अजितदादांचं नाव भाजप स्टार प्रचारकांच्या यादीतून काढणार

Mumbai-Pune Expressway : वाहतूक कोंडीची समस्या सुटणार; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून प्रवास करणाऱ्यांसाठी प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Share This News

Related Post

Accident Video

Accident Video : मंत्र्याच्या ताफ्यातील वाहनानं IPS अधिकाऱ्याला चिरडलं; Video आला समोर

Posted by - March 13, 2024 0
हैदराबाद : वृत्तसंस्था – तेलंगणामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने राज्यात खळबळ उडाली (Accident Video) आहे. यामध्ये…

पूर्ववैमनस्यातून पुण्यात 21 वर्ष तरूणाची हत्या

Posted by - March 19, 2022 0
पुर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून चोघांनी मिळून 21 वर्षीय तरूणावर कोयत्यानं वार करून खून  केल्याची घटना बिबवेवाडीतील सुपर इंदिरानगरमधील  सुवर्णयुग मित्र…
Pune News

Pune News : पुण्यात आईच्या डोळ्यादेखत डंपरने लेकराला चिरडले; संतप्त जमावाने डंपर पेटवला

Posted by - December 28, 2023 0
पुणे : पुणे (Pune News) शहरातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये आईच्या डोळ्यादेखत एका 8 वर्षांच्या…

रघुनाथ कुचिक यांचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी प्रक्रिया सुरू – चित्रा वाघ

Posted by - June 11, 2022 0
पुणे- शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर एका तरुणीने बलात्कार केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी पुण्यात राजकारण तापले होते. भाजपच्या…
anil Ramod

रामोड कुटुंबीयांच्या खात्यात 47 लाखापेक्षा जास्त रक्कम; CBI तपासात आले समोर

Posted by - June 14, 2023 0
पुणे : पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड (Dr. Anil Ramod) व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाने असलेल्या 17 बँक खात्यांमध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *