Suicide News

Suicide News : महिला डॉक्टरने महिला दिनादिवशीच इंजेक्शन टोचून संपवले स्वतःचे आयुष्य; धक्कादायक कारण आले समोर

455 0

अहमदाबाद : वृत्तसंस्था – जगभरात आज जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. मात्र अहमदाबादमधून एक धक्कादायक घटना (Suicide News) समोर आली आहे. यामध्ये एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने जिल्ह्यत मोठी खळबळ उडाली आहे. या महिलेने गुन्हे शाखेच्या कार्यालयाच्या परिसरातच आयुष्य संपवल्याने पोलीस दलात देखील मोठी खळबळ उडाली आहे. मृत महिला डॉक्टरने 15 पानी सुसाइड नोट लिहिली असून त्यात पोलीस निरीक्षकावर छळाचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
बुधवारी सायंकाळी अहमदाबादच्या गुन्हे शाखेच्या कार्यालय परिसरात EOWच्या ऑफिसबाहेर एका बेंचवर महिलेचा मृतदेह आढळला. हा मृतदेह वैशाली जोशी नावाच्या महिला डॉक्टरचा होता. मृतदेहाजवळ इंजेक्शनही आढळून आले. यानंतर अनेक शंका व्यक्त केल्या गेल्या. खेडा जिल्ह्यातील बालासिनोरमध्ये राहणाऱ्या वैशाली जोशी हिने खासगी क्लिनिक सुरू केलं होतं. गेल्या 2आठवड्यापासून ती व्हीके खाचर नावाच्या पोलीस अधिकाऱ्याला भेटण्याचा प्रयत्न करत होती. वैशाली अहमदाबादमधील शिवरंजनी परिसरात भाड्याने राहत होती.

वैशालीच्या पर्समध्ये 15 पानी सुसाइड नोट आढळली आहे. सुसाइड नोटमध्ये गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व्हीके खाचर यांच्यावर छळाचा आरोप केला आहे. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुन्हे शाखेत असलेल्या पोलीस निरीक्षक खाचर आणि महिला डॉक्टर यांच्यात गेल्या चार पाच वर्षांपासून संबंध होते. त्यांच्या नात्यात काही महिन्यांपासून बिनसलं होतं. यामुळे महिला डॉक्टर नैराश्यात गेली होती. त्यातूनच तिने इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली. पोलीस निरीक्षक व्हीके खाचर यांच्याविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Kedar Shinde : बाईपण भारी देवा नंतर येतोय ‘आईपण भारी देवा’; केदार शिंदेकडून नव्या सिनेमाची घोषणा

Dolly Sohi : ‘हिटलर दीदी’ फेम अभिनेत्री डॉली सोही हिचं निधन

Mahashivratri : महाशिवरात्रीच्या निमिताने जाणून घेऊया भारतातील शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांबद्दल

Women’s Day Special : आज महिला दिनाच्या निमित्त महिलांच्या अधिकारांबद्दल जाणून घेऊया

Virabhadrasana : वीरभद्रासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Related Post

NIA

NIA : महाराष्ट्रासह NIA ची ‘या’ 4 राज्यात छापेमारी

Posted by - August 14, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा एनआयएकडून छापेमारी करण्यात आली आहे. दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)…
Manoj Jarange

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल

Posted by - February 26, 2024 0
मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी अंतरवाली (Manoj Jarange) सराटीमध्ये उपोषणाला बसलेल्या मनोज…
Pune News

Pune News : नव्या संसाराला सुरुवात होण्याआधीच नवदाम्पत्यासह तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - September 26, 2023 0
पुणे : पुण्यामधून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये पुण्याच्या धायरी इथून जेजुरीला देवदर्शनासाठी गेलेल्या नवदाम्पत्याचा अपघातात…
Nashik News

Nashik News : घोटी-सिन्नर महामार्गावर कार आणि बाईकचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Posted by - March 8, 2024 0
नाशिक : नाशिक जिल्ह्यातून अपघाताची (Nashik News) एक मोठी घटना समोर आली आहे. यामध्ये बाईक आणि स्विफ्ट कारमध्ये धडक झाल्याने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *