Ankita And Suraj

पिंपरी चिंचवडमधील ‘त्या’ तरुणाच्या हत्येचा बायकोनेच रचला कट; अशाप्रकारे झाला खुलासा

1312 0

पिंपरी चिंचवड : काल पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpari Chinchwad) भरदिवसा एका तरुणाची हत्या करण्यात आल्याने संपूर्ण जिल्हा हादरला होता. सूरज काळभोर (Suraj Kalbhor) असे मृत तरुणाचे नाव होते. त्याच्या सासुरवाडीतच त्याचा खून (Murder) करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पत्नी अंकिता काळभोर (Ankita Kalbhor) हिने पतीच्या जाचाला कंटाळून ही हत्या केली आहे.

खाकी पेशाला काळिमा ! निलंबीत पोलिस उपनिरीक्षकानेच टाकला जळगाव स्टेट बँकेवर दरोडा 

काय घडले नेमके?
पती सुरज काळभोर हा पत्नी अंकिता हिचे शारीरिक शोषण करायचा.या सगळ्या जाचाला कंटाळून अंकिता काळभोर हिने हे टोकाचे पाऊल उचलत आपल्या पतीच्या हत्येचा कट रचला. सुरुवातीला पतीच्या हत्येचा बनाव रचल्याचं पोलीस तपासात समोर आले होते. शनिवारी रात्री ही सूरज काळभोरने पत्नी अंकिता काळभोरचा शारीरिक छळ केला. मग ती चांगलीच संतापली, या त्रासाला कंटाळून पती अंकिताने आपल्या पतीचा काटा काढायचे ठरवले.

सख्खा भाऊ पक्का वैरी ! ‘या’ शुल्लक कारणातून भावानेच केली भावाची हत्या 

अशाप्रकारे काढला काटा?
आपल्या पतीचा काटा काढण्यासाठी तिने अंकिताने पतीला माहेरी म्हणजे गहूंजेला न्ह्यायचं ठरवले. यावेळी तिने घरातील सुरा सोबत घेतला. पिंपरी-चिंचवडच्या आकुर्डीतील सुरजच्या घरातून ते सकाळी निघाले. तिथून दोघांनी प्रति शिर्डीत साई बाबांचं दर्शन घेतलं. मग दुपारी गहूंजेतील घरी जायच्या आधी तेथीलचं शेतात पोहचले. पत्नी अंकिताने पती सूरज काळभोर चा गळा चिरला आणि जमिनीवर ढकलून दिले. त्यानंतर शेतातील टिकाव आणि दगड डोक्यात घातला. या हल्ल्यात पतीचा जागीच मृत्यू झाला. यानंतर तिने ही हत्या चार ते पाच अज्ञातांनी केल्याचा बनाव रचला. मात्र पोलिसांना तिच्यावर संशय आला यानंतर त्यांनी तिची कसून चौकशी केली असताना तिने आपला गुन्हा मान्य केला आहे. या प्रकरणी तळेगाव पोलिसांनी अंकिता काळभोरला अटक केली आहे.

Share This News

Related Post

Hadapsar News

Hadapsar News : पतीसमोरच पत्नीवर बलात्कार करणाऱ्या आरोपी सावकाराची भर पावसात हडपसर पोलिसांनी काढली धिंड !

Posted by - July 28, 2023 0
पुणे : 2 दिवसांपूर्वी पुण्यातील हडपसर (Hadapsar News) या ठिकाणी उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने खाजगी सावकाराने एका व्यक्तीच्या…
Murder

Pune Crime : धक्कादायक ! पत्नीने दिराच्या मदतीने पतीचा काढला काटा

Posted by - May 2, 2024 0
पुणे : पुण्यातील (Pune Crime) आळंदीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये पत्नीने दिराच्या मदतीने पतीचा काटा काढला आहे.…

इंदूर दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू, १० जणांना वाचवण्यात यश

Posted by - March 30, 2023 0
आज रामनवमीचा सण सर्वत्र उत्साहात सुरु असतानाच इंदूरच्या श्री बेलेश्वर महादेव झूलेलाल मंदिरात विहिरीवरील छत तुटल्यामुळे दर्शनासाठी आलेले २५ भाविक…
Ratnagiri News

Ratnagiri News : रत्नागिरीमध्ये जिलेटीनचा मोठा साठा जप्त; एकाला अटक

Posted by - January 19, 2024 0
रत्नागिरी : रत्नागिरीमधून (Ratnagiri News) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. रत्नागिरीतील मंडणगड शहरात ट्रॅक्टरमध्ये तब्बल 153 जिलेटिनच्या कांड्या आढळून…
Nashik Crime

अंधाराने घात केला ! बाईकवरून जाताना तरुणाचा पुलावरून कोसळून दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 25, 2023 0
नाशिक : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे. अशीच अपघाताची घटना नाशिकमध्ये (Nashik) घडली आहे. यामध्ये मोटारसायकलची धडक बसून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *